शिरढोण नांदणी रस्त्यावर ओढ्याचे पाणी आल्याने हा मार्गही वाहतुकी साठी बंद झाला शिरढोण : गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शिरढोण- कुरुंदवाड दरम्यानच्या पंचगंगा नदीवरील शिरढोण पुलावर बुधवारी सकाळी पाणी आले आहे. त्यामुळे शिरढोण कुरुंदवाड संपर्क तुटला आहे. तर शिरढोण नांदणी रस्त्यावर ओढ्याचे पाणी आल्याने हा मार्गही वाहतुकी साठी बंद झाला आहे. दरम्यान पुराच्या पाण्याला गती असल्याने व त्या पाण्यातून वाहतूक सुरु असल्याने कुरुंदवाड पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरीकेटस लावून वाहतूकीसाठी रस्ता बंद केला आहे. वाहतूक रोखण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, मंडल अधिकारी डी. बी. गायकवाड, तलाठी रवी कांबळे, पोलिस पाटील अनुराधा जाधव, सरपंच बाबू हेरवाडे रस्त्यावर गस्त घालत होते.इंचलकरंजीहून कुरुंदवाडला जाण्यासाठी शिरढोण मार्ग जवळचा असल्याने या मार्गावरून मोठी वाहतूक असते. मात्र पुलावर पाणी आल्याने व पोलिसांनी वाहतूक बंद केल्याने प्रवाशांना पुन्हा दहा ते बारा किलोमीटर परत जावून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे क...