पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी : प्रतिनिधी इचलकरंजी शहराची जीवनदायिनी पंचगंगा अमृतवाहिनी करण्यासाठी व जनआयोग नियुक्त करण्यासाठी पर्यावरण दिनानिमित्त समाजवादी प्रबोधिनी येथे प्रांताधिकरी मोसमी चौगुले-बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. पंधरा दिवसांपूर्वी जलपुरुष डॉ राजेंद्रसिंह राणा यांनी नदी, पर्यावरण समस्या सोडवणुकीसाठी जनआयोग नेमण्याची सूचना इचलकरंजीत पर्यावरण कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये केली होती. त्या अनुषंगाने समाजवादी प्रबोधिनी येथे कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेण्यात आली.पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी जनआयोग गठीत करण्यासाठी झालेल्या बैठकीत प्रदूषित घटकांचा शोध घेणे,कारणे शोधून उपाययोजना करणे,राज्य व केंद्र सरकारकडे नदी स्वास्थ टिकविण्यासाठी प्रयत्न करून पर्यावरण समस्या सोडवण्याच्या उद्देशाने ठोस कार्य करणे आणि हा विषय लोक चळवळीचा बनवणे आदी निर्णय घेण्यात आले.प्रारंभी प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.त्यातून जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीच्या आयोजना मागील भूमिका मांडली.मंचावर अरविंद धरणगुत्तीकर,संदीप चोडणकर,अभिजीत पटवा,र...