पुणे मेट्रो लाईव्ह इचलकरंजी : प्रतिनिधी : इचलकरंजी महापालिकेने शहरातील रस्ते डांबरीकरण व इतर कामांबाबत निविदा काढली असून पावसाळयाच्या काळात सदर कामे सुमार दर्जाची होण्याची शक्यता आहे. यातून महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असून सदर कामांचे कार्यादेश पावसाळ्यानंतर देण्यात यावेत ,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव व माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की , इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत विविध ८४ कामांची निविदा दि. ११ मे रोजी प्रसिध्द केली आहे. सदर भरलेली निविदा सादर करण्याची अंतिम मुदत दि. ५ जून अखेर होती. तसेच दि. ६ जून रोजी सदरच्या निविदा उघडण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तथापी निविदा प्राप्त झाल्यानंतर सर्व भरलेल्या निविदांच्या कागदपत्रांची छाननी करण्यास व सदर कामाचे कार्यादेश देण्यास विलंब होणार असल्याचे दिसते. सदर कालावधीत पावसाळा सुरु होत असून सद...