Skip to main content

Posts

Showing posts with the label शिरोळ तालुका

श्री गुरु ज्ञानयोगी सिद्धेश्वर स्वामीजी... गुरुपरंपरेतील एक मानबिंदु: डॉ कुमार पाटील

  पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे  गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा!!  गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः!! तस्मै श्री गुरवे नमः !! आज व्यासपोर्णिमा त्यालाच आपण  गुरुपौर्णिमा असेही म्हणतो.भारत अर्थात हिंदुस्थान म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातील जागतिक मार्गदर्शक देश! अवघ्या विश्वाला वेद, उपनिषद, रामायण,महाभारत,भगवत गीता, म बसवेश्वरांचे व शरणांचे वचन, महानुभाव पंथ, वारकरी संप्रदायातील विविध संतांचे अभंग, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली घटना समितीने तयार केलेले संविधान, विविध साहित्यिकांनी लिहिलेले साहित्याद्वारे ज्ञानाचा भांडार खुला करणारा विश्वगुरु म्हणजे हिंदुस्थान!!  याच भुमीत अनेक साधुसंत,महर्षी जन्माला आले म्हणूनच आपल्या देशाला देवभुमी असेही म्हंटले जाते. आज सर्व प्रकारच्या गुरुंना वंदन करण्याचा दिवस!! आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक गुरुपरंपरा या देशात उदयास आल्या. याच गुरुपरंपरेतील एक महान गुरु म्हणजेच चालता बोलता देव अशी ज्यांची ख्याती होती ते ज्ञानयोगी परमपुज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी होय. श्री सिद...

पँथर आर्मी राष्ट्रीय महासचिव संतोष आठवले ( कांबळे ) यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्याचा जाहिर निषेधार्थ उद्या प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने व धरणे आंदोलन

पुणे मेट्रो लाईव्ह : पँथर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेना राष्ट्रीय महासचिव संतोष एस .आठवले ( कांबळे ) हे त्यांच्या मुळ गावातील ( नवे दानवाड ता . शिरोळ जि. कोल्हापूर ) अवैद्य विषारी गावठी दारू व मटका बंद न झाल्यास ईच्छा मरणाची परवाणगी मिळावी अशी मागणी राज्याचे सन्मानीय  मुख्यमंत्री नाम .एकनाथजी शिंदे यांना व आपले सरकार पोर्टल वर दि .3 / 10/2022 रोजी केली होती .ईच्छा मरणाच्या मागणीची दखल स्थानिक प्रशासनाने घेऊन नवे दानवाड गावाती विषारी गावठी हातभट्टी दारु मटका आदी बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्याची भुमिका घेतली होती तसेचे खोट्या ॲट्रॉसिटी गुन्हा नोंद होऊ नये याचीही मागणीचे निवेदन पोलिस अधिक्षक कार्यालय , कोल्हापूर यांच्या कडे दिनांक 27/09/2022 रोजी केली होती .खोट्या ॲट्रॉसिटी बद्दल व गावातील विषारी गावठी हातभट्टी दारू , मटका कायमस्वरुपी बंद व्हावी अन्याथा ईच्छा मरणाची परवाणगी मिळावी या मागणी साठी आंदोलनात्मक भुमिका संतोष आठवले यांनी घेतल्या बद्ल कोल्हापूर जिल्ह्यातील स्वयंघोषित नेता सतिश मधूकर माळगे, कांबळे ( रा. इंद्रजीत कॉलनी ,मणेर मळा उचगांव ता .करवीर जि. कोल्हापूर ) यांच्या ईशारा...

सैनिक टाकळीच्या अनिकेत सुतार याची दिल्ली येथे युथ नॅशनल गेम्समध्ये धावणे या स्पर्धेत सिल्वर कामगिरी

पुणे मेट्रो लाईव्ह : नामदेव निर्मळे : विशेष प्रतिनिधी :    २३ जुलै व २४ जुलै २०२२ या दिवशी दिल्ली येथे युथ नॅशनल गेम्स येथे पार पडल्या. यामध्ये शिरोळ तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून लौकिक असणाऱ्या सैनिक टाकळीचा धावपटू अनिकेत संजय सुतार यांनी सिल्वर मेडल मिळवून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याचं नाव लौकिक केले आहे. नॅशनल युथ गेम्स मध्ये अनिकेतने २०० मीटर धावणे या  खेळात द्वितीय क्रमांक प्राप्त करून  सिल्वर कामगिरी केली आहे.        अनिकेत सध्या देवचंद कॉलेज निपाणी, तालुका :-चिकोडी जिल्हा:- बेळगाव येथे बी.कॉम.भाग -२ या वर्गात शिक्षण घेत आहे. मुळात अनिकेचे वडील संजय सुतार हे सैनिक टाकळी गावामध्ये सुतार काम करीत असून आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. अशा बिकट परिस्थितीत आई वडिलांनी दिलेली साथ व गुरुवर्यांनी दिलेले प्रशिक्षण या जोरावर त्यांनी सुयश संपादन केले आहे.    तो लहानपणापासून धावण्याचा सराव करत असतो.आता त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधून देशाचं नाव उज्ज्वल करावयाचे आहे. त्या दृष्टिकोनातून तो कसून सराव करत आहे.    अनिकेतला प्रशिक्ष...

पंचगंगा नदीवरील पाणी पुलावर आल्याने शिरढोण कुरुंदवाड संपर्क तुटला

शिरढोण नांदणी रस्त्यावर ओढ्याचे पाणी आल्याने हा मार्गही वाहतुकी साठी बंद झाला शिरढोण : गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शिरढोण- कुरुंदवाड दरम्यानच्या पंचगंगा नदीवरील शिरढोण पुलावर बुधवारी सकाळी पाणी आले आहे. त्यामुळे शिरढोण कुरुंदवाड संपर्क तुटला आहे. तर शिरढोण नांदणी रस्त्यावर ओढ्याचे पाणी आल्याने हा मार्गही वाहतुकी साठी बंद झाला आहे. दरम्यान पुराच्या पाण्याला गती असल्याने व त्या पाण्यातून वाहतूक सुरु असल्याने कुरुंदवाड पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरीकेटस लावून वाहतूकीसाठी रस्ता बंद केला आहे. वाहतूक रोखण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, मंडल अधिकारी डी. बी. गायकवाड, तलाठी रवी कांबळे, पोलिस पाटील अनुराधा जाधव, सरपंच बाबू हेरवाडे रस्त्यावर गस्त घालत होते.इंचलकरंजीहून  कुरुंदवाडला जाण्यासाठी शिरढोण मार्ग जवळचा असल्याने या मार्गावरून मोठी वाहतूक असते. मात्र पुलावर पाणी आल्याने व पोलिसांनी वाहतूक बंद केल्याने प्रवाशांना पुन्हा दहा ते बारा किलोमीटर परत जावून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे क...

अकिवाट येथे उद्या शुक्रवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

   अकिवाट :  डॉ.व्यंकटेश पत्की व डॉ.प्रविण जैन यांचे "संजीवन हॉस्पिटल ॲण्ड क्रिटिकल केअर युनिट, जयसिंगपूर"* यांच्या वतीने आपल्या अकिवाट गावामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत  पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक रुग्णांसाठी ठराविक आजारांच्या उपचारासाठी सोय संजीवनी हॉस्पिटल , जयसिंगपूर येथे उपलब्ध केली आहे.या संदर्भात जनजागरण व्हावे म्हणून हा शिबीर आयोजित केला आहे. या शिबिरात दम्याचे आजार, फुफ्फुसाचे आजार, लिव्हरचे आजार, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार यांची मोफत तपासणी होणार आहे. स्थळ :- "श्री" हॉस्पिटल,बस स्टॉण्ड जवळ अकिवाट वेळ :- शुक्रवार दिनांक ०८/०७/२०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी संपर्क :- विनोद आवटी 9975398236, इर्शाद नदाफ 9860888968