शिवजयंतीदिनाची अभिवादन मिरवणूक ठरली आहे .एकूण ९ हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे विशेष आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष तसेच 'डॉ.पी.ए. इनामदार विद्यापीठा 'चे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. एम.सी.ई सोसायटीचे सचिव प्रा. इरफान शेख , एस.ए. इनामदार, शाहीद इनामदार, वहाब शेख, साबीर शेख , असीफ शेख,शाहीद शेख, बबलू सय्यद,तसेच विश्वस्त, पदाधिकारी, प्राद्यापक -शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सेंटर, गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट, डेक्कन मुस्लीम इन्स्टिट्यूट अॅण्ड लायब्ररी, अवामी महाझ या संस्थांनी सहभाग घेतला.पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थी यांचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी शिवजयंतीदिनाची अभिवादन मिरवणूक ठरली आहे .एकूण...