18 बोगस अभियंत्यांना पदोन्नती देण्याचा पुणे महानगरपालिकेचा घाट ; मेगा पद भरतीच्या गडबडीत बोगस अभियंत्यांना नियुक्तीपत्र देण्याचा डाव
पुणे शहर खड्डेग्रस्त, नागरिक त्रस्त पण मनपा प्रशासन बोगस अभियंत्यांच्या प्रमोशनसाठी आग्रही ! आम आदमी पक्षाचे मनपा बाहेर तीव्र आंदोलन पुणे मेट्रो लाईव्ह ; संपूर्ण पुणे शहरांमध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झालेली असताना पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग आणि स्थापत्य विभाग हे बोगस अभियंत्यांना पदोन्नती देण्याच्या प्रयत्नांमध्ये व्यस्त आहेत. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची कोणतीही मान्यता नसताना जे आर एन राजस्थान विद्यापीठातून दूरस्थ पद्धतीने अभियांत्रिकी पदविका घेतलेल्या 18 बोगस अभियंत्यांवर फौजदारी कारवाई करण्याऐवजी त्यांच्या पदोन्नतीचा घाट महापालिकेमध्ये घातला जात आहे. सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये मेगा पद भरती चालू असून त्याबाबत होणाऱ्या गोंगाटाचा फायदा घेऊन निमुटपणे दिनांक 29 जुलै 2022 रोजी डीपीसी ( डिपार्टमेंट प्रमोशन कमिटी) बैठक आयोजित करून या 18 बोगस अभियंता पदोन्नती देण्याचा डाव पुणे महानगरपालिकेमध्ये शिजत आहे. या विरोधामध्ये आज आम आदमी पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या गेट बाहेर तीव्र आंदोलन करून याचा विरोध दर्शविण्यात आला. जोपर्यंत याबाबत आम आदमी पक्...