पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी ता. ११ इचलकरंजीचे माजी नगरसेवक,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि समाजवादी प्रबोधिनीचे खजिनदार शशांक बावचकर यांच्या पत्नी आणि शहर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कालवश मल्हारपंत बावचकर यांच्या स्नुषा रमा शशांक बावचकर यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यामागे पती शशांक यांच्यासह दोन कन्या ,दोन जावई, दोन नातवंडे असा मोठा परिवार आहे.ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे ,आमदार प्रकाश आवाडे,सुरेशराव हाळवणकर,सचिन चव्हाण,रवींद्र माने,मदन कारंडे,सागर चाळके,नितीन जांभळे, संजय कांबळे,राहुल खंजिरे, अशोक स्वामी, अलका स्वामी, विठ्ठल चोपडे ,जयकुमार कोले ,शिवगोंड खोत,प्रा.रमेश लवटे यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक मान्यवर व कार्यकर्त्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.सोमवार ता.१३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता रक्षा विसर्जन आहे.