Skip to main content

Posts

Showing posts with the label मॉन्सून

27 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग

 कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 100 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर. धामणी नदीवरील- सुळे व अंबार्डे,  दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील- बीड व वारणा नदीवरील- चिंचोली असे 27 बंधारे पाण्याखाली आहेत.  आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 44.98 दलघमी, वारणा 414.18 दलघमी, दूधगंगा 255.21 दलघमी, कासारी 40.18 दलघमी, कडवी 29.86 दलघमी, कुंभी 38.95 दलघमी, पाटगाव 48.09 दलघमी, चिकोत्रा 20.50 दलघमी, चित्री 20.38 दलघमी, जंगमहट्टी 18.27 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, आंबेआहोळ 20.85, जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.    तसेच बंधाऱ्यांची ...

गगनबावडा येथे काल 80.6 मिमी पाऊस

  पुणे मेट्रो लाईव्ह :  कोल्हापूर, दि. 7 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 80.6 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आज सकाळी 10.57 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.  जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 7 मिमी, शिरोळ -4.1 मिमी, पन्हाळा- 28.8 मिमी, शाहूवाडी- 24.6  मिमी, राधानगरी- 35.1 मिमी, गगनबावडा-80.6 मिमी, करवीर- 15.2 मिमी, कागल- 18 मिमी, गडहिंग्लज- 19.1 मिमी, भुदरगड- 44.3 मिमी, आजरा-42.5  मिमी, चंदगड- 32.3  मिमी  पाऊस पडल्याची नोंद आहे.

लेटेस्ट अपडेट :पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

इचलकरंजी : मनु फरास : इचलकरंजी :    पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी ३२ फुटांपर्यंत पोहचली (इशारा पातळी ३९ तर धोका पातळी ४३ फुट). तर आज पंचगंगा नदीची पातळी सकाळी 8.00  वाजता  58 फुटावर आहे , इशारा पातळी 68, धोका पातळी 71 आहे. आम. प्रकाश आवाडे यांचे कडून पूरस्थितीची पाहणी   इचलकरंजी : राधानगरी, कोयना धरणातून सुरु असलेला पाण्याचा विसर्ग आणि पंचगंगा नदी पाणी पातळीत होत असलेली वाढ या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी पंचगंगा नदीकाठी भेट देत पूर परिस्थितीची माहिती घेतली. पाणी पातळीत वेगाने वाढ होत चालल्याने पंचगंगा नदीला आलेल्या पुराची पाहणी करून सुचना करताना नदीक ाठावरील तसेच मळेभागातील नागरिकांनी सतर्क रहावे, अशा सूचनाही आमदार आवाडे यांनीय या वेळी केल्या.यावेळी केल्या.

पुणे शहरात मुसळधार पावसामुळे शहरात पाच तासातच 13 जागी झाडे पडल्याच्या नोंदी

कोकणाला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे मेट्रो लाईव्ह : पुण्यात सलग दोन दिवसांपासून पावसाने माध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना आणि बळीराजाला दिलासा मिळाला आहे. पाच तासातच या दरम्यान 13 ठिकाणी झाडे पडल्याची घटना घडली आहे. काही ठिकाणी या झाडांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे. अनेकदा या प्रकरणामुळे नागरिकांचं मोठं नुकसान होतं. मात्र यावर्षी अजून असं कोणतंच प्रकरण समोर आलं नाही आहे. त्यामुळे सध्यातरी नागरिकांना दिलासा आहे. पुणे शहरात मुसळधार पावसामुळे शहरात पाच तासातच 13 जागी झाडे पडल्याच्या नोंदी अग्निशमन दलाकडे आल्या होता. अग्निशमन दलाच्या जवानांकडून झाडे हटविण्याचे काम सुरू आहे. पुण्यातील दत्तवाडी (पोलिस चौकीजवळ), शिवणे,(शिंदे पुलाजवळ), टिंगरेनगर (गल्ली क्रमांक 6), लुल्लानगर, भवानी पेठ (मनपा वसाहत क्र 10), औंध (आंबेडकर चौक), प्रभात रोड (लेन नं 14), नवीन सर्किट हाऊसजवळ, नाना पेठ (अशोका चौक), कळसगाव (जाधव वस्ती), हडपसर, कोथरुड, (मयुर कॉलनी), एरंडवणा (गुळवणी महाराज रस्ता) या सगळ्या परिसरात झाडे पड...