भिंतींना ओल आली आहे , तर खिडकी व दरवाजाला छपन्या नसल्याने घरात पाणी येऊ लागले आहे बांधकामाचा दर्जा तपासून दोषीवर कारवाई करण्याची मागणी. पुणे मेट्रो लाईव्ह : खिद्रापूर येथे ऐलान फाऊंडेशन तर्फे बांधण्यात आलेल्या अनेक असून आमची फसवणूक झाल्याचा सूर निघत आहे. या घरकुलांचा स्लॅब गळू लागला आहे. भिंतींना ओल आली आहे. तर खिडकी व दरवाजाला छपन्या नसल्याने घरात पाणी येत आहे. या कामाची फाऊंडेशनने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी लाभार्थी कडून होत आहे. दरम्यान, बांधकामासाठी ९५ हजार घेतले, काम वाढले म्हणून वरून आणखीन पैसे घेतले, खिडकी-दरवाजाला छपरी केली नाही. ही कामे निकृष्ट झाल्याचा आरोप लाभार्थीतून होत आहे , या बाबत दर्जा तपासून दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. खिद्रापूर येथे ऐलान फाऊंडेशन तर्फे बांधून देण्यात आलेल्या घराच्या बांधकामात कोणतीच नियमितता नसल्याने सध्या पडत असलेल्या पावसाचे पाणी छपरी नसल्याने खिडकीतून आत येत आहे. काही घरांच्या भिंतीला ओल आली आहे. याबाबत फाऊंडेशन प्रतिनिधीला सांगितल्यानंतर लाभार्थींनाच दमदाटी केल्याचे लाभार्थी दादाखान मोकाशी यांनी सांग...