Skip to main content

Posts

Showing posts with the label आपला जिल्हा

प्राचार्या श्रीमती आर.एल.निर्मळे मॅडम, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व छात्राध्यापक व छात्राध्यापिका यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप

प्रेस मीडिया लाईव्ह :  श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप , संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन ,(बी.एड) पेठ वडगाव .संस्थेचे संस्थापक श्री स्वर्गीय अशोकराव माने साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त सोमवार दिनांक 12.06 2023 रोजी "अवधूत विशेष मुलांची निवासी शाळा "अंबप येथे विद्यार्थ्याना कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड  महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती आर.एल.निर्मळे  मॅडम, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व छात्राध्यापक व छात्राध्यापिका यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.  यावेळी अवधूत विशेष मुलांच्या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शिंदे मॅडम यांनी मतिमंद मुलांबद्दल माहिती दिली. तसेच त्यांचे संगोपन, स्वच्छ्ता, आहार, त्यांची ट्रिटमेंट औषधे, त्याची राहण्याची सोय, मुलांच्या व पालकांच्या समस्या, 18 वर्षाखालील विद्यार्थी व 18 वर्षांवरील विद्यार्थी तसेच शिक्षकांची जबाबदारी व शाळेची सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयाच्या प्राचार्या  सौ आर.एल.निर्मळे- चौगुले यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणची माहिती घेतली.तसेच प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती घेवून त्यांना मार्गदर...

“जमणारच नव्हते माझे या माझ्या चोर पिढीशी, मी येणाऱ्या काळाची अनमोल आनामत होतो …

“जमणारच नव्हते माझे या माझ्या चोर पिढीशी, मी येणाऱ्या काळाची अनमोल आनामत होतो  असे म्हणणाऱ्या कविवर्य सुरेश भट यांचा शनिवार ता.१५ एप्रिल २०२३ रोजी ९१ वा जन्मदिन आहे.त्यानिमित्ताने.... लोकांच्या हृदयात प्रकाशणारा कवी सुरेश भट ------------------------------ प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) “उष :काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली “… अशी क्रांतीज्योत मनात पेटवणाऱ्या सुरेश भट यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे झाला.आणि १४ मार्च २००३ रोजी ते नागपुरात कालवश झाले.सुरेश भट हे त्यांच्या मित्रपरिवारात, शिष्य परिवारात आणि साहित्यवर्तुळात” दादा ” या नावाने ओळखले जात असत.अर्थात ते खऱ्या अर्थाने दादा माणूसच होते .मराठी कवितेत त्यांनी दिलेले योगदान अनमोल स्वरूपाचे आहे .मेंदीच्या पानावर, आज गोकुळात रंग ,मलमली तारुण्य माझे, गे माय भू तुझे मी ,आता जगायाचे असे ,तरुण आहे रात्र अजुनी यासारखी शेकडो अजरामर गाणी ,कविता ,भावगीते , पोवाडे त्यांनी लिहिले .पण त्यांची खरी ओळख आहे ती म्हणजे मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती हीच आहे.एखाद्या प्रतिभावंत आणि र...

भाजप शहर अध्यक्ष ॲड अनिल डाळ्या सह क्राॕ के एल मलाबादे जनता चौकात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आंदोलन केले.

पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी  : सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते, असे वक्तव्यकरुन ओ बी सी चा अपमान राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत केला होता. यासाठी सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याऐवजी राहुल गांधी व रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत, राहुल गांधीचा निषेध व  हाय हाय मुर्दाबाद च्या घोषणा देत भाजप शहर अध्यक्ष ॲड अनिल डाळ्या सह क्राॕ के एल मलाबादे जनता चौकात  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असताना पोलिस यंत्रणेचा बेकायदा वापर करून कित्येक नेतेवर  यांच्यावर कारवाई केली. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य न करता राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस व आघाडीचे अनेक पक्षांचे नेते न्यायालयाचा व डाॕ बाबासाहेब आंबेडकर च्या संविधानाचा अपमान करत आहेत.निषेध करत त्याविरोधात भाजपा  रस्त्यावर उतरली आहे. या वेळी  अमर कांबळे, अरविद शर्मा,ॲड भरत जोशी आरुण कुंभार  प्रविण पाटील उमाकांत दाभोळे , रामदास कोळी...

आपल्या सर्वांचा जन्म शिवसेनेत झाला आहे, ट्यूब बेबी लोकांकडे लक्ष देऊ नका, .संजय राऊत

  आपल्या सर्वांचा जन्म शिवसेनेत झाला आहे, ट्यूब बेबी लोकांकडे लक्ष देऊ नका, .संजय राऊत पुणे मेट्रो लाईव्ह : मुरलीधर कांबळे :  कोल्हापूर : आपल्या सर्वांचा जन्म शिवसेनेत झाला आहे, त्यामुळे या टेस्ट ट्यूब बेबी लोकांकडे लक्ष देऊ नका, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्ला चढवला. ते म्हणाले की, जे महानाट्य सुरू केलेय ते यशस्वी होणार आहे. खासदार संजय राऊत शिवगर्जना मेळाव्यातून पुन्हा एकदा शिंदे गटावर हल्लाबोल केला. संजय पवार महाराष्ट्राला शिवसेनेवरच्या निष्ठेसाठी माहीत आहेत. आपल्या सर्वांचा जन्म शिवसेनेत झाला आहे, त्यामुळे या टेस्ट ट्यूब बेबी लोकांकडे लक्ष देऊ नका, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्ला चढवला. ते म्हणाले की, जे महानाट्य सुरू केलेय ते यशस्वी होणार आहे. कोल्हापूरची भूमी परिवर्तन करणारी भूमी आहे. बाळासाहेबांची महानता मोठी होती. त्यांनी माकडाची माणसे केली, माणसांचे सरदार केले आणि यातील काहींनी खंजीर खुपसला. या लोकांनी आपल्या आईला विकले. जे महाराष्ट्र आणि शिवसैनिक विसरणार नाही. ते पुढे म्हणाले की, संजय राऊत संपूर्ण देशाला माहीत आहेत हे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे. दिशा देण्यासाठी बा...

कोल्हापूर जिल्ह्यात पाऊसाची उघडीप..

पुणे मेट्रो लाईव्ह : कोल्हापूर :   कोल्हापूर जिल्ह्यात पाऊसाने उघडीप दिल्याने गेल्या आठ दिवसांपासून इशारा पातळीवर वाहत असलेली पंचगंगा नदी आज पात्रात परतण्याची शक्यता आहे. पंचगंगेची पातळी 32 फुटांवर आली आहे. जिल्ह्यातील बंधाऱ्यांवरील पाणी वेगाने कमी होत असून आता केवळ 29 बंधाऱ्यांवर पाणी आहे. गेल्या 24 तासांमध्ये सहा फुटाने खाली आली.  तर दुसरीकडे राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र.6 हा एकमेव खुला असून सध्या धरणातून 3028 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदी गेल्या आठ दिवसांपासून इशारा पातळीवर वाहत असल्याने महापूराची टांगती तलवार होती. मात्र, चार दिवसांपासून दिलेल्या उघडीपमुळे संकटातून सुटका झाली आहे. दुसरीकडे अलमट्टी धरणातून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग सुरु आहे. खालील बंधारे पाण्याखाली आहेत पंचगंगा नदी-शिंगणापूर,राजाराम,सुर्वे,रुई,इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ भोगावती नदी-हळदी,सरकारी कोगे,राशिवडे, शिरगांव,खडक कोगे कासारी नदी- यवलूज,पुनाळ तिरपण,ठाणे आळवे वेदगंगा नदी- बस्तवडे व चिखली वारणा नदी- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी दुधगंगा नदी- दत्तवाड...

कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड पेठ वडगाव व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व जूनियर कॉलेज पेठवडगाव, वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी व कॉलेज ऑफ फार्मसी पेठ वडगाव येथे "15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिना निमित्त" महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले...

पुणे मेट्रो लाईव्ह :   आज दिनांक 15ऑगस्ट 2022 रोजी श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड पेठ वडगाव व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व जूनियर कॉलेज पेठवडगाव, वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी व कॉलेज ऑफ फार्मसी पेठवडगाव  येथे "15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिना निमित्तमहाविद्यालयाच्या  प्रांगणात  ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण : श्री बाबासाहेब शिंदे .(माजी सैनिक अंबप.). यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजपूजन सुधाकर गजानन वाटेगावे व नितिन बळवंत ढमणगे रा,वाठार यांच्या हस्ते करण्यात आले.वृक्षारोपण  प्राचार्य निर्मळे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.ध्वजा रोहणानंतर सॅक्सोफोन वर "ए मेरे वतन के लोगो" हे गाणे कु. रिया जाधव ने उत्कृष्टरित्या सादर केले. तर कु. सुप्रिया दाभाडे ने "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" या विषयावर भाषण केले.   या वेळी'कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड) पेठ वडगावच्या  प्र.प्राचार्य सौ.निर्मळे आर्. एल् , इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज चे मुख्याध्यापक कोंडेकर सर, वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य जडगे सर, कॉलेज ऑफ फा...

हुपरी-कोल्हापूर राज्य मार्गावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत

शिवसेना करवीर तर्फे  बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांना निवेदन दिले.   हुपरी-कोल्हापूर रस्त्यावर उचगाव येथील पूल ते गडमुडशिंगी कमान मार्गावर मोठे खड्डे पडले असून रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. येथे २ दिवसांपूर्वी खड्ड्यांत पडून १२ अपघात झाले आहेत. असे छोटे-मोठे अपघात प्रतिदिन येथे होत आहेत. या भागातून हुपरी, पट्टणकोडोली, गडमुडशिंगी, तसेच कर्नाटक येथे जाण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने वाहतूक चालू असते. तरी हुपरी-कोल्हापूर राज्य मार्गावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत, या मागणीचे निवेदन शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांना देण्यात आले.  या वेळी अभियंता पाटील म्हणाले,''कोल्हापूर-हुपरी राज्यमार्ग या रस्त्यावर संपूर्ण डांबरीकरणासाठी संमती मिळाली आहे. काम चालू होईपर्यंत जेथे खड्डे पडले आहेत, तेथे तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून ते खड्डे बुजवून घेऊ, तसेच गटारांची स्वच्छता करू.'' या प्रसंगी सर्वश्री अवधूत साळोखे, पोपट दांगट, दीपक पाटील, कैलास जाधव, भूषण चौगुले, निती...

पूरग्रस्तांसाठी नियोजित निवारागृहांची जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून पाहणी

संभाव्य पूरबाधितांच्या निवारागृहांमधील सेवा- सुविधांमध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये....    जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचना   प्रशासनाला सहकार्य करण्याचे नागरिकांचे आश्वासन पुणे मेट्रो लाईव्ह : कोल्हापूर :  (जिमाका): संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत सलग वाढ होत असून पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य पूरबाधितांसाठी नियोजित निवारागृहांमधील सेवा सुविधांमध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.  शिरोळ तालुक्यातील संभाव्य पूरग्रस्तांसाठीच्या नियोजित निवारागृहांची जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिवसभर पाहणी करुन पदाधिकारी, नागरिक, ग्रामस्थांशी संवाद साधला. यानंतर शिरोळ तहसीलदार कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली पूरपरिस्थिती नियोजन बैठक घेण्यात आली, यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या.  जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, निवारागृहांमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय, आरो...

कोल्हापूर : 55 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1350 क्युसेक विसर्ग

पुणे मेट्रो लाईव्ह :   कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 137.11 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे व शिरगांव, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव, कडवी नदीवरील-सवते सावर्डे, शिरगांव, सरुड पाटणे व कोपार्डे, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे व गारगोटी, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी, शिगांव, खोची, मांगले सावर्डे, चावरे व दानोळी, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली, सुळंबी, कसबा वाळवे व तुरंबे, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडूकली, तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी व चंदगड, धामणी नदीवरील-  सुळे, पणुंद्रे व आंबर्डे असे 55 बंधारे पाण्याखाली आहेत.  आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसा...

सिंगल युज प्लास्टिक विरोधात गडहिंग्लज नगरपरिषदेची कारवाई

  पुणे मेट्रो लाईव्ह :   कोल्हापूर :  (जिमाका): गडहिंग्लज नगरपरिषदेअंतर्गत धडक कारवाईत 1200 किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आल्याची माहिती गडहिंग्लज नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी दिली     गडहिंग्लज नगरपरिषदमध्ये सिंगल युज प्लास्टिक विरोधात गेले एक महिना मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत श्री. खारगे यांना नदी वेस परिसरात एका व्यक्तीकडे सिंगल युज प्लास्टिकचा साठा असून त्याच्यामार्फत शहरात इतरत्र विक्री होत असल्याची टीप मिळाली. यानंतर श्री. खारगे यांनी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता अनिल गंदमवाड यांना डमी गिऱ्हाईक बनवून त्या व्यक्तीच्या घरी पाठवले. तिथे प्लास्टिक मिळत असल्याची खात्री पटताच श्री. खारगे यांच्या नेतृत्वात प्लास्टिक विरोधी पथकाने धडक कारवाई करत त्या व्यक्तीच्या घराची झाडाझडती घेतली. तपासणी अंती घरामध्ये व दुकानात असे एकूण 1200 किलो सिंगल युज प्लास्टिक सापडले. त्या व्यक्तीचे दुकान सील करण्यात आले असून सर्व प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.           सिंगल युज प्लास्टिक विरोधातील कारवाई अशीच सुरू राहण...

गगनबावडा येथे काल 82.2 मिमी पाऊस

पुणे मेट्रो लाईव्ह:  कोल्हापूर, दि. 11 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 82.2 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 4.2 मिमी, शिरोळ -1.4 मिमी, पन्हाळा- 18.5 मिमी, शाहूवाडी- 46.8 मिमी, राधानगरी- 54.8 मिमी, गगनबावडा-82.2 मिमी, करवीर- 20.8 मिमी, कागल- 17 मिमी, गडहिंग्लज- 11.8 मिमी, भुदरगड- 41.1 मिमी, आजरा-30.1  मिमी, चंदगड- 52.6  मिमी  पाऊस पडल्याची नोंद आहे.

इचलकरंजीत गुरुवारी कवी संमेलनाचे आयोजन

पञकार संघातर्फे रामचंद्र ठिकणे यांची माहिती पुणे मेट्रो लाईव्ह :   इचलकरंजी येथे इचलकरंजी शहर पञकार संघातर्फे शहर परिसरातील ज्येष्ठ व नवोदित कवींसाठी गुरुवार दिनांक १४ जुर्ले रोजी पञकार कक्षामध्ये कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रामचंद्र ठिकाणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. इचलकरंजी शहरातील पञकार संघातर्फे दरवर्षी पञकार दिन साजरा करण्याबरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते.याशिवाय विविध सामाजिक उपक्रम राबवण्यावर देखील विशेष भर देण्यात येतो.याच अनुषंगाने इचलकरंजी शहर परिसरातील ज्येष्ठ व नवोदित कवींसाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने 

27 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग

 कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 100 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर. धामणी नदीवरील- सुळे व अंबार्डे,  दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील- बीड व वारणा नदीवरील- चिंचोली असे 27 बंधारे पाण्याखाली आहेत.  आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 44.98 दलघमी, वारणा 414.18 दलघमी, दूधगंगा 255.21 दलघमी, कासारी 40.18 दलघमी, कडवी 29.86 दलघमी, कुंभी 38.95 दलघमी, पाटगाव 48.09 दलघमी, चिकोत्रा 20.50 दलघमी, चित्री 20.38 दलघमी, जंगमहट्टी 18.27 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, आंबेआहोळ 20.85, जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.    तसेच बंधाऱ्यांची ...