पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी : तारदाळ राम मंदीर, पाटील गल्ली, खोत गल्ली ते कोळी मळ्या पर्यंत जाणारा रस्ता पूर्ण पणे चिखलमय झाला आहे. गेली दोन वर्ष या रस्त्याचे काम वर्क ऑर्डर असूनही अद्यापि प्रलंबित आहे लोकप्रतिनिधींच्या व संबंधित मक्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे केवळ या रस्त्याबाबत वारंवार मक्तेदाराने आश्वासने देवून परिसरातील नागरिकांची दिशाभूल करत आहेत त्यामुळे या भागातील महिला व नागरिकांतून संबंधित मक्तेदार व लोकप्रतिनिधीं चा निषेध व्यक्त केला जात आहे आठवड्याभरात काम न सुरू केल्यास या भागातील महिला रस्त्यावर उतरतील असा इशारा या भागातील महिलांनी दिला आहे याबाबत संबंधित मक्तेदारांना गावातील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी फोन केला असता जाणीवपूर्वक चालढकल करण्यात येत आहे. सध्या सुरू असणाऱ्या पावसामुळे भागातील रस्त्यावर मोठ मोठ खड्डे पडले आहेत यातूनच महिला वर्गांना ज्येष्ठ नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागत आहे प्रसंगी एखादे वाहन जोरात गेल्यास अंगावर चिखल उडतो. कोरोची- तारदाळ - निमशिरगाव पर्यंतचा रस्त्यासाठी शासनाने निधी मंजूर केला...