Skip to main content

Posts

Showing posts from August 23, 2022

आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’चा साडेदहा लाख रुपयांचा साठा जप्त

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे, दि. २३: अन्न व औषध प्रशासन, पुणे कार्यालयातर्फे आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’ विक्रेत्यांवर कारवाई करुन १० लाख ५८ हजार ३८० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.  मार्केट यार्ड पुणे येथे अचानक छापे टाकून घाऊक विक्रेत्यांकडून विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या वनस्पती हा अन्न पदार्थ आरोग्यास अपायकारक असल्याचा अहवाल प्राप्त होताच घाऊक विक्रेते व वितरकांकडील उर्वरित साठा जप्त करण्यात आला. पफ वनस्पती (ग्रेड शेफ ब्रँड) या अन्न पदार्थाचे घाऊक विक्रेत्याकडे तपासणी करुन नमुना घेऊन उर्वरित ३ लाख ५२९ रुपये किंमतीचा १ हजार २८८ किलो साठा, तसेच वनस्पती पफ (सेंच्युरी ब्रँड) चा ४ जाख ३७ हजार ९६६ रुपये किंमतीचा २ हजार ५३ किलो साठा असा एकूण ७ लाख ३८ हजार ४९५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.  त्याच दिवशी सदर वनस्पतीच्या वितरकाकडे तपासणी केल्यानंतर पफ वनस्पती (ग्रेड शेफ ब्रँड) चा नमुना घेवुन उर्वरित ६६ हजार ९७६ रुपये किंमतीचा ४७८ किलो साठा तसेच पफ (सेंच्युरी ब्रँड)चा २ लाख ५२ हजार ९०९ रुपये किंमतीचा १ हजार ८७३ किलो साठा असा ३ लाख १९ हजार ८८५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आल...

सांस्कृतिक सभागृहे उघडण्याचा निर्णय झाल्याने उपोषण मागे

 असलम इसाक बागवान यांच्या उपोषणाची सांगता  पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : कोंढव्यातील इमाम अबु हनिफा,डॉ. आंबेडकर सभागृहे नागरिकांच्या कार्यक्रमांना खुली करण्याची मागणी पुणे महानगरपालिकेच्या समाज  विकास विभागाने  मान्य केल्याने इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान आणि सहकाऱ्यांचे पालिकेसमोर सुरू असलेले उपोषण स्थगित करण्यात आले. २२ ऑगस्ट रोजी उपोषणाची सांगता पालिकेचे समाज विकास अधिकारी रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आली.   स्थानिक माजी नगरसेवकानी ही सभागृहे बंद ठेवण्यासाठी महानगर पालीका अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. त्यात माजी नगरसेवक रईस सुंडके यांचाही सहभाग होता.  ही सभागृहे उघडण्यासाठी  आणी शिवनेरीनगर येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हॉल  येथे गरीबांच्या हाताला रोजगार तसेच महिला रोजगार प्रशिक्षण केंद्र (लाईट हाऊस) सूरू करण्यासाठी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप गेली  दोन वर्ष प्रयत्न करीत होते . या प्रयत्नांना यश आले आहे.  उपोषणामध्ये असलम इसाक बागवान,इब्राहिम शेख, रियाज बंगाली,अब्दुल बागवान,सादिक पानसरे,अ...