बेडकिहाळ येथील आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद, शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम. पुणे मेट्रो लाईव्ह : बेडकिहाळ, ता,१६, येथील कै बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शुक्रवार (ता १५) रोजी श्रीमती कुसुमावती मिर्जी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विविध रोग तपासणी शिबिरास बेडकिहाळ सह परिसरातिल नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्वागत शिंगाडे सेवाभावी संस्थेचे संस्थापक डॉ विक्रम शिंगाडे यांनी केले, तर अजित कांबळे यांनी प्रास्ताविकात शिंगाडे चॅरिटेबलच्या वतीने वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांनची सविस्तर पणे माहिती करून दिली. या शिबिरा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अनुराधा पाटील, पीएसआय (पालघर मुबंई,) डॉ सुनीता पाटील (सांगली ) कृषी पंडित सुरेश देसाई,, डॉ सुरेश कुराडे, (गडहिंग्लज) कारदगा ग्राम पंचायत अध्यक्ष राजू खिचडे, समाजकल्याण आधिकारी जे के पम्मार, आण्णा पाटील, आदी उपस्थीत होते. उपस्थीत सर्...