पुणे: नुकताच व्यवसाय क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आला. यामध्ये सांगवी, पुणे येथील श्रीमती संध्या दीपक फाकटकर यांना" उद्योगिनी व्यवसाय गौरव पुरस्कार २०२२" ने सन्मानित करण्यात आले. श्रीमती संध्या फाकटकर या गेले १८ ते २० वर्ष फर्निचरच्या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण एम. ए .हिंदी व बी.एड.आहे.त्यानंतर त्यांचे लग्न झाले. एकत्रित कुटुंब व्यवस्था असल्याने व पती एकटेच कंपनीमध्ये नोकरी करीत असल्याने घरामध्ये आर्थिक अडचण होती. परंतु स्वतःच्या शिक्षणाचा कुटुंबासाठी काहीतरी उपयोग व्हावा ही देखील इच्छा होती. सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांनी शिक्षक पदासाठी नोकऱ्यांचा शोध सुरू केला. परंतु यामध्ये अपयश आले. या अपयशामुळे खचून न जाता घरामध्ये पाचवी ते दहावी शिकवण्या सुरू केल्या. आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांची व पालकांची परिस्थिती देखील बेताचीच. त्यामुळे अगदी अल्प प्रमाणात शिकवणीचे शुल्क घेतले जायचे. महिन्याकाठी त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यास ५० रुपये शुल्क आकारले जायचे. परंतु एक- दोन वर्ष असेच चालत राहिले. संसाराचा आर्थिक गुंता काही...