पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे: अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून उमेदवारी देऊन खासदार करावे, अशी मागणी केली. त्यानंतर पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. त्यावर पुण्यातील भाजप खासदार गिरीश बापट यांनी मात्र सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांना खासदारकी दिली तर काहीच हरकत नसल्याचं त्यांनी माध्यामांशी बोलताना सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे हिरे आहेत. त्यांचं काम संपुर्ण महाराष्ट्राने जवळून पाहिलं आहे. गेले दोन महिने त्यांच्यात असलेली हिंमत देखील आपण सगळ्यांनीच अनुभवली. काही संघटनेकडून त्यांना पुण्याचे खासदार करा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी माझी काहीच हरकत नाही आहे. त्यांना खासदारकी दिली तर मला आनंदच होईल. कारण पुणे, पश्चिम महाराष्ट्राने त्यांच्या कामाची दृष्टी पाहिली आहे. त्यामुळे या गोष्टीचा आनंद असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पक्षाच्या कोणत्याच आदेशाच्या बाहेर आम्ही दोघेही नाही. त्यामुळे पक्षाचा निर्णय अंतिम असेल. पक्ष सांगेत त्याप्रमाणे पुढची वाटचाल करु. भाज...