यूटय़ूब पाहून तरुणी आणि महिलांचे व्हॉट्सऍप हॅक करून त्यांना अश्लील मेसेज पाठवणाऱयाला अखेर अंधेरी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या.
पुणे मेट्रो लाईव्ह : यूटय़ूब पाहून तरुणी आणि महिलांचे व्हॉट्सऍप हॅक करून त्यांना अश्लील मेसेज पाठवणाऱयाला अखेर अंधेरी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. रवी बनावर्स दांडू असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सात मोबाईल आणि 11 सीमकार्ड जप्त केले आहेत. रवी ज्या बँकेत काम करायचा तेथील महिलांना देखील त्याने अश्लील मेसेज पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. अंधेरी येथे राहणाऱ्या तरुणीला फेब्रुवारी महिन्यात एक फोन आला. फोन करणाऱयाने आपण कॉलेजचा शिक्षक बोलत असल्याचे भासवले. शिक्षणासाठी कॉलेजचा व्हॉट्सऍप ग्रुप तयार करायचा आहे असे सांगून तरुणींकडून ओटीपी घेतला. ओटीपी घेतल्यानंतर त्याने तरुणीचे व्हॉट्सऍप हॅक केले. त्यावरून अश्लील फोटो आणि मेसेज पाठवले. याप्रकरणी तरुणीने अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. परिमंडळ-10 चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी अधिकाऱयांना सूचना दिल्या. सहाय्यक निरीक्षक दिगंबर पगार यांच्या पथकातील राजेंद्र पेडणेकर, सूर्यवंशी, जाधव आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सीडीआर काढला. त्यावरून पोलिसांनी रवीला धारावी येथून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल हस्तगत केला असून तो लवकरच फॉर...