पीठ, पनीर आणि दही यांसारख्या प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. ज्यावर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होईल. नवी दिल्ली : जीएसटी कौन्सिलच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर आजपासून (18 जुलै) अनेक खाद्यपदार्थ महाग होणार ( आहेत. या मध्ये पीठ, पनीर आणि दही यांसारख्या प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. ज्यावर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होईल. अशाप्रकारे, 5,000 रुपयांपेक्षा जास्त भाड्याने घेतलेल्या हॉस्पिटलच्या खोल्यांवरही जीएसटी भरावा लागेल. याशिवाय दररोज 1,000 रुपयांपेक्षा कमी भाड्याने देणाऱ्या हॉटेलच्या खोल्यांवर 12 टक्के दराने कर आकारण्याचे सांगण्यात आले आहे. त्यावर सध्या कोणताही कर नाही. १८ जुलैपासून बदल लागू : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या GST कौन्सिलने गेल्या आठवड्यात आपल्या बैठकीत कॅन किंवा पॅकेज केलेले आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखना, सुका सोयाबीन, मटार, यांसारख्या उत्पादनांना मान्यता दिली आहे...