ऐलान फाऊंडेशन तर्फे बांधून देण्यात आलेली घरे ही मदत आहे की पूर्ग्रास्थांची थट्टा केली आहे या प्रकरणा कडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही हे खरोखरच दुर्दैवी आहे . पुणे मेट्रो लाईव्ह : खिद्रापूर येथे ऐलान फाऊंडेशन तर्फे बांधून देण्यात आलेल्या घरांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले असून या केलेल्या बांधकामात कोणतीच नियमितता नसल्याने सध्या पडत असलेल्या पावसाचे पाणी छपरी नसल्याने खिडकीतून आत येत आहे. काही घरांच्या भिंतीला ओल आली आहे . ऐलान फाउंडेशन कडून पूरग्रस्तांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. इतके सगळे झाले असताना देखील या प्रकरणा कडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही हे खरोखरच दुर्दैवी आहे . मदत केली की थट्टा..? ऐलान फाऊंडेशन तर्फे बांधून देण्यात आलेली घरे ही मदत आहे की पूर्ग्रास्थांची थट्टा केली आहे असा प्रश्न पडला आहे. हे सर्व पाहून माणुसकीच संपत चाललेली आहे हे मात्र नक्की.