Skip to main content

Posts

Showing posts from August 21, 2022

पुणे : आज बेटी पढाव बेटी बचावचा कार्येक्रम अत्यंत थाटात संपन्न .

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे :  आज बेटी पढाव बेटी बचावचा कार्येक्रम  अत्यंत थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पी ए इनामदार होते एम सी ई सोसायटी  चेअरमन होते .  तर  डॉ. अजय दूबेजी, mrs  गुरमीत कौर मॅडम,  राहुलजी भंडारी , भगवान वैराठीजी , मुस्लिम बँकेचे संचालक मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद , हाजी सईद सय्यद , हाजी फयाज मोमीन , युसुफ शेख , मंतशा शेख , व रामभाऊ जगदाळे प्रमुख उपस्थिती म्हणून हजर होते.

वीज मीटर रीडिंग मधील अचूकतेसाठी महावितरणने अतिशय गांभीर्याने धडक उपाययोजना सुरू केल्या

वीजमीटर रीडिंग मध्ये हलगर्जपणा करणार्‍या एजन्सींविरुद्ध तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकार्‍यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : वीज  मीटर रीडिंग मध्ये हलगर्जपणा करणार्‍या एजन्सींच्या कामांचे मूल्यांकन करीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारताच अस्पष्ट फोटोंचे प्रमाण 45 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात महावितरणला यश आले आहे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा नाहक मनस्ताप व वीजबिल दुरुस्तीच्या त्रासा सोबतच महावितरणच्या महसुलाचे नुकसान होत होते. हे लक्षात घेऊन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी राबविलेल्या मोहिमेमुळे महावितरणच्या वीजबिलांतील अचूकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एप्रिल ते जून 2022 या 3 महिन्यांत वीज विक्रीतही तब्बल 3 (825 द.ल.यु.) टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत वीज मीटरचे रीडिंग अचूकच झाले पाहिजे.वीज मीटर रीडिंग मधील अचूकतेसाठी महावितरणने अतिशय गांभीर्याने धडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अचूक रीडिंगसाठी सुधारणा न करणे, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही हेतुपुरस्सरपणे नादुरुस्तीचा (फॉल्टी) शेरा देणे, सरासरी क...

देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून उमेदवारी देऊन खासदार करावे,

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे: अखिल  भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून उमेदवारी देऊन खासदार करावे, अशी मागणी केली. त्यानंतर पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. त्यावर पुण्यातील भाजप खासदार गिरीश बापट यांनी मात्र सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांना खासदारकी दिली तर काहीच हरकत नसल्याचं त्यांनी माध्यामांशी बोलताना सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे हिरे आहेत. त्यांचं काम संपुर्ण महाराष्ट्राने जवळून पाहिलं आहे. गेले दोन महिने त्यांच्यात असलेली हिंमत देखील आपण सगळ्यांनीच अनुभवली. काही संघटनेकडून त्यांना पुण्याचे खासदार करा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी माझी काहीच हरकत नाही आहे. त्यांना खासदारकी दिली तर मला आनंदच होईल. कारण पुणे, पश्चिम महाराष्ट्राने त्यांच्या कामाची दृष्टी पाहिली आहे. त्यामुळे या गोष्टीचा आनंद असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पक्षाच्या कोणत्याच आदेशाच्या बाहेर आम्ही दोघेही नाही. त्यामुळे पक्षाचा निर्णय अंतिम असेल. पक्ष सांगेत त्याप्रमाणे पुढची वाटचाल करु. भाज...