Skip to main content

Posts

Showing posts with the label मुंबई

मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात अर्पण करण्याच्या चांदीच्या पादुकांची मा. उध्दव साहेबांनी आणि रश्मीवहिनींनी पूजा करून केले वंदन : ना. डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे मेट्रो लाईव्ह : मुंबई :  मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसनिमित्त शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी तुळजापूर येथे श्री. तुळजाभवानी मंदिरात अर्पण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चांदीच्या पादुकांचे आज मा. श्री. उद्धव साहेबांनी आणि रश्मी वहिनींनी पूजा करून वंदन केले. लवकरच या पादुका भवानी मातेला अर्पण करण्याचा संकल्प डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केला आहे.  काल दिनांक २६ जुलै २०२२ रोजी पुण्यात उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहर शिवसेनेच्यावतीने केलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात केलेल्या महाआरतीचा प्रसाद मंदिराचे विश्वस्त श्री. महेश सूर्यवंशी यांनी मा. उद्धव साहेबांसाठी दिला होता. तो आज मा. साहेबांनी आणि रश्मी वहिनींनी मनोभावे ग्रहण केला. या आरतीच्या निमित्ताने पुण्यात खास तयार केलेला सव्वा किलोचा विशेष मोदकही यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे कुटुंबियांना दिला.  मा. श्री. उद्धव साहेबांना उदंड आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे. शिवसेनेची वाटचाल अधिक दिमा...

प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर प्लास्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा

पुणे मेट्रो लाईव्ह :    मुंबई, दि. २६ :- प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदीचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.             केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली असून राज्यात या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र हे सिंगल युज प्लास्टिक बंदी करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.             राज्यात प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक शक्तिप्रदत्त समिती नेमण्यात आली होती. या समितीने ७ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीत महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकॉल उत्पादने अधिसूचना २०१८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य शासनाने १५ जुलै २०२२ रोजीच्या अधिसू...

लोकांचे प्रश्न सोडवितांना सकारात्मकता ठेवा कामासाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना सचिवांनी भेटले पाहिजे

विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना मुंबई, दि. २६ : लोकांचे प्रश्न सोडवतांना सकारात्मकता ठेवा,  राज्यभरातून मंत्रालयात  कामासाठी येणाऱ्या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र पुरस्कृत तसेच राज्याच्या योजना गतीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा असे निर्देश दिले.  मुख्यमंत्री आज मंत्रालयात सर्व विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रशासन संवेदनशील, सचोटीचे, प्रामाणिक हवे अशी जनतेची अपेक्षा आहे.   महाराष्ट्राची देशात एक चांगली प्रतिमा आहे. खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्य शासनाच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली आहे.  तसेच इतर केंद्रीय मंत्री देखील राज्याला सहकार्य करण्यासाठी उत्सुक आहेत. अशा वेळी नावीन्यपूर्ण योजना देखील आपण मांडल्या पाहिजेत. नवनवीन  उपक्रमांचे स्वागत आहे.  केंद्राचा जास्तीत जास्त निधी कसा मिळेल हे पाहून तात्काळ असे प्रस्ताव सादर करावेत . विशेषत: रेल्वे, महामार्ग याबाबतीत केंद्राकडील पाठपुरावा वाढ...

मुंबईतील फौजदारी न्यायालयांची अधिकृत भाषा मराठीच आहे

असा महत्त्वपूर्ण निर्वाळा विशेष 'मोक्का' न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे.  पुणे मेट्रो लाईव्ह : मुंबईतील फौजदारी न्यायालयांची अधिकृत भाषा मराठीच आहे. 25 वर्षांपूर्वीच्या जुन्या अधिसूचनेत याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यानुसार कनिष्ठ न्यायालयांचे कामकाज मराठी भाषेतच चालेल  इंग्रजी किंवा उर्दू भाषेत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा विशेष 'मोक्का' न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. 2011 च्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीने खटल्याशी संबंधित कागदपत्रांच्या इंग्रजी भाषांतरासाठी केलेली विनंती विशेष न्यायालयाने यावेळी धुडकावून लावली. 25 वर्षांच्या जुन्या अधिसूचनेचा दाखला देत न्यायालयाने बॉम्बस्फोटातील आरोपी नदीम अख्तरची याचिका फेटाळून लावली. आरोपीने 2011 मधील तिहेरी बॉम्बस्फोटांच्या खटल्याशी संबंधित कागदपत्रांच्या तब्बल 1,800 पानांचे इंग्रजी भाषांतर उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याच्या या याचिकेवर सुनावणी करताना विशेष 'मोक्का' न्यायालयाने जुन्या अधिसूचनेतील मराठी भाषेसंबंधित तरतुदीवर बोट ठेवले. मराठी भाषेत असलेल्या कागदपत्रांचे इंग्रजीत भाषांतर करणे अत्यंत वे...

मुंबई के पूर्व पुलिस कमिश्नर संजय पांडे को ईडी ने आज को गिरफ्तार कर लिया

  पुणे मेट्रो लाईव्ह : मुंबई के पूर्व पुलिस कमिश्नर संजय पांडे को ईडी  ने आज  को गिरफ्तार कर लिया है। उन्हें मनी लॉन्ड्रिंग एक्ट के तहत गिरफ्तार किया गया है। संजय पांडे नेशनल स्टॉक एक्सचेंज  के कर्मचारियों के फोन टैपिंग से जुड़े मनी लॉन्ड्रिंग के मामले में पूछताछ के लिए आज ईडी के सामने पेश हुए थे। उनसे बीते दिन सोमवार को भी पूछताछ की गई थी। ईडी ने सोमवार को उनसे 3 घंटे तक पूछताछ की थी।  संजय पांडे 1986 बैच के भारतीय पुलिस सेवा (आईपीएस) के अधिकारी हैं। वे 30 जून को रिटायर हुए थे। मुंबई के पुलिस आयुक्त के रूप में अपने चार महीने के कार्यकाल से पहले उन्होंने महाराष्ट्र के कार्यवाहक पुलिस महानिदेशक के रूप में भी सेवाएं दीं। उन पर आरोप है कि 2009-17 के बीच एनएसई कर्मचारियों की अवैध फोन टैपिंग की गई, जिसमें 'आईसेक सिक्योरिटीज प्राइवेट लिमिटेड' नामक कंपनी की कथित तौर पर संलिप्तता है। जांच में यह पाया गया कि संजय पांडे कंपनी के कामकाज और गतिविधियों से निकटता से जुड़े हैं। इस कंपनी ने एनएसई का सिक्योरिटी ऑडिट किया था। आईसेक सिक्योरिटीज कंपनी में मार्च 2001 में संजय पांडे ...

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलिस महासंचालक , आयुक्तांना निर्देश             वाहनचालकांचा खोळंबा नको  मुंबई दि 8: मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.  याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून याबाबतचे निर्देश दिले आहेत. यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गीकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी घ्या अशी सूचना त्यांनी दिली आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य असल्याचे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी  स्पष्ट केले. मुख्यमंत्री या नात्याने सतत प्रवास करावा लागतो. त्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रवास मार्गावरील वाहतुक रोखण्यात येते. त्या...