Skip to main content

Posts

Showing posts from July 5, 2023

लेखी पत्र दिल्यानंतर आमरण उपोषण आंदोलन स्थगित

लेखी पत्र दिल्यानंतर आमरण उपोषण आंदोलन स्थगित  पुणे मेट्रो लाईव्ह :  जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची त्रयस्त तपासणी चौकशी करून तपासणीचा अहवाल.पंधरा दिवसांमध्ये  देण्याचे व अहवालामध्ये कामाबाबत काही गंभीर त्रुटी निदर्शनास आलेस ठेकेदारावर निविदा अटी व शर्तीनुसार कारवाई करण्यात येईल असे लेखी पत्र करवीर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष जयसिंगराव कांबळे यांना दिल्यानंतर आमरण उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले यांनी केली .   यावेळी कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष अॅड . मुकुंद सनदे उपस्थित होते या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजय इंगळे, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख  समीर विजापुरे इचलकरंजी महानगर जिल्हा अध्यक्ष त्र्यंबक दातार आधी सहभागी होते

पॅंथर आर्मी स्वराज क्रांती सेनेचे करवीर पंचायतीसमोर उपोषण आंदोलन

  पॅंथर आर्मी स्वराज क्रांती सेनेचे करवीर पंचायतीसमोर उपोषण आंदोलन पुणे मेट्रो लाईव्ह : कोल्हापूर प्रतिनिधी :  जल जीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचारातील अधिकाऱ्यांना बडतर्फ करा या मागणी करिता पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे करवीर पंचायत समिती कार्यालयासमोर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयसिंगराव कांबळे ,कोल्हापूर जिल्हा महानगर अध्यक्ष अॅड . मुकुंद सनदे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी अकरा वाजले पासून उपोषण सुरू करण्यात आले . जल जीवन मिशन अंतर्गत बोलोली तालुका करवीर येथे काम सुरू आहे सध्या या गावांमध्ये पाईपलाईन टाकल्यात आले आहेत व त्याच्या बिलांची उचल ही केली आहे तसेच म्हारुळ तालुका करवीर या गावांमध्ये पाईपलाईन टाकण्यात आलेली आहेत निविदा कागदपत्राप्रमाणे पाईपलाईन टाकण्यात आलेले नाही मुरूम बिडींग डॉक्युमेंट प्रमाणे पाईपलाईनची डेप्थ किती पाईपलाईन टाकण्यात आली याची नोंद एमबी मध्ये दाखवण्यात आले आहेत त्या सर्व स्पॉट वरती दाखवण्यात यावीत व या कामातील भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार उपअभियंता शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करावे तसेच ठ...