पूरग्रस्तांसाठी नियोजित निवारागृहांची जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून पाहणी
संभाव्य पूरबाधितांच्या निवारागृहांमधील सेवा- सुविधांमध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये.... जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचना प्रशासनाला सहकार्य करण्याचे नागरिकांचे आश्वासन पुणे मेट्रो लाईव्ह : कोल्हापूर : (जिमाका): संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत सलग वाढ होत असून पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य पूरबाधितांसाठी नियोजित निवारागृहांमधील सेवा सुविधांमध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शिरोळ तालुक्यातील संभाव्य पूरग्रस्तांसाठीच्या नियोजित निवारागृहांची जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिवसभर पाहणी करुन पदाधिकारी, नागरिक, ग्रामस्थांशी संवाद साधला. यानंतर शिरोळ तहसीलदार कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली पूरपरिस्थिती नियोजन बैठक घेण्यात आली, यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, निवारागृहांमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय, आरो...