भाजप शहर अध्यक्ष ॲड अनिल डाळ्या सह क्राॕ के एल मलाबादे जनता चौकात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आंदोलन केले.
पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी : सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते, असे वक्तव्यकरुन ओ बी सी चा अपमान राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत केला होता. यासाठी सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याऐवजी राहुल गांधी व रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत, राहुल गांधीचा निषेध व हाय हाय मुर्दाबाद च्या घोषणा देत भाजप शहर अध्यक्ष ॲड अनिल डाळ्या सह क्राॕ के एल मलाबादे जनता चौकात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असताना पोलिस यंत्रणेचा बेकायदा वापर करून कित्येक नेतेवर यांच्यावर कारवाई केली. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य न करता राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस व आघाडीचे अनेक पक्षांचे नेते न्यायालयाचा व डाॕ बाबासाहेब आंबेडकर च्या संविधानाचा अपमान करत आहेत.निषेध करत त्याविरोधात भाजपा रस्त्यावर उतरली आहे. या वेळी अमर कांबळे, अरविद शर्मा,ॲड भरत जोशी आरुण कुंभार प्रविण पाटील उमाकांत दाभोळे , रामदास कोळी...