पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : कोंढवा परिसरातील वीजेचा लपंडाव, वीज मंडळ कर्मचाऱ्यांच्या अरेरावी विरोधात महावितरणच्या रास्ता पेठ येथील मुख्य कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप तसेच कोंढवाच्या स्थानिक नागरीकांच्या माध्यमातून महावितरण मुख्य कार्यालय पावर हाऊस रास्तापेठ येथे कोंढवा भागातील भाग्योदयनगर, मिठानगर, साईबाबानगर,नवाजिश पार्क आक्सा पार्क येथील विज लपंडाव तसेच वीजमंडळ कर्मचारी,लाईनमन,वायरमन यांच्या अरेरावी विरूध्द आंदोलन करण्यात आले . या आंदोलनाचे निवेदन देताना इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान, इब्राहिम शेख,रियाज बंगाली,इसाक शेख,शहबाज पंजाबी यांनी या भागातील समस्या मांडल्या . यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता,कार्यकारी अभियंता,ग्राहक निवारण अधिकारी, सेंट मेरीज विभागाचे आभियंता उपस्थित होते. कार्यकारी अभियंता घुगे यांनी तीन - चार दिवसात येथील समस्येचे निवारण करण्याचे,लाईनमन व वायरमन यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विविध संघटना,पक्ष कार्यकर्ता, स्थानिक नागरीक उपस्थित होते.