होनहार भारत -पोटँशियल युनिकॉर्नस ऑफ इंडिया ' विषयावर परिषद डी वाय पाटील युनिव्हर्सिटी कडून आयोजन उद्यमशीलतेतील योगदानाबद्दल कंपन्या आणि मान्यवरांचा सत्कार पुणे मेट्रो : पुणे : डी वाय पाटील युनिव्हर्सिटी(आंबी ,पुणे ) च्या वतीने 'होनहार भारत -पोटँशियल युनिकॉर्नस ऑफ इंडिया ' विषयावर एक दिवसीय परिषदेचे आयोजन शनिवार दि १५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत करण्यात आले आहे.हॉटेल रामी ग्रँड येथे होणाऱ्या या परिषदेत भविष्यातील उद्यमशीलतेसंदर्भात ४ विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या योगदानाबद्दल कंपन्या आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे . त्यात बांबू इंडिया,फ्लुईड व्हेंचर्स ,स्प्रेन्ग एनर्जी ,लेन्स्कर्ट ,९ युनिकॉर्नस ,स्वरा ,डोमिनिक्स ग्लोबल ,सेंट्रम वेल्थ ,फार्म इझी,किटो टेक या सारख्या कंपन्यांचा आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक पद्मश्री डॉ मिलिंद कांबळे,एस एम ई चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांचा समावेश आहे . डी वाय पाटील युन...