Skip to main content

Posts

Showing posts from July 26, 2022

अगर चुनाव आयोग मुफ्त में सामान बांटने वाले दलों का कुछ नहीं कर सकती तो फिर उसे भगवान ही बचाए

              केंद्र सरकार से मांगा जवाब पुणे मेट्रो लाईव्ह : सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को इलेक्शन से पहले फ्रीबीज यानी मुफ्त में सामान बांटने या फिर उसका वादा करने वाले दलों पर रोक लगाने को लेकर एक याचिका पर सुनवाई करते हुए चुनाव आयोग पर तल्ख टिप्पणी की। सीजेआई एनवी रमण के नेतृत्व वाली तीन जजों की पीठ ने कहा कि अगर चुनाव आयोग मुफ्त में सामान बांटने वाले दलों का कुछ नहीं कर सकती तो फिर उसे भगवान ही बचाए। इसके साथ ही कोर्ट ने केंद्र सरकार से इस विषय पर उसके द्वारा उठाए जा रहे जरूरू कदमों पर जवाभ भी मांगा है। सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को इस मामले में वित्त आयोग से पूछा कि क्या राज्यों को आवंटित होने वाले राजस्व में गैर जरूरी खर्चों का भी ख्याल रखा जाता है। चीफ जस्टिस ऑफ इंडिया इससे पहले भी कई गहरी बाते कर चुके हैं। भारत के चीफ जस्टिस एनवी रमण ने कहा कि दुनिया के सभी नागरिकों के लिए यह जरूरी है कि वे स्वाधीनता, स्वतंत्रता और लोकतंत्र को बरकरार रखने और आगे बढ़ाने के लिए लगातार प्रयासरत रहें, जिसके लिए हमारे पूर्वजों ने संघर्ष किया है। न्यायमूर्ति रमण ने अमेर...

प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर प्लास्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा

पुणे मेट्रो लाईव्ह :    मुंबई, दि. २६ :- प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदीचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.             केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली असून राज्यात या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र हे सिंगल युज प्लास्टिक बंदी करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.             राज्यात प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक शक्तिप्रदत्त समिती नेमण्यात आली होती. या समितीने ७ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीत महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकॉल उत्पादने अधिसूचना २०१८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य शासनाने १५ जुलै २०२२ रोजीच्या अधिसू...

लोकांचे प्रश्न सोडवितांना सकारात्मकता ठेवा कामासाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना सचिवांनी भेटले पाहिजे

विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना मुंबई, दि. २६ : लोकांचे प्रश्न सोडवतांना सकारात्मकता ठेवा,  राज्यभरातून मंत्रालयात  कामासाठी येणाऱ्या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र पुरस्कृत तसेच राज्याच्या योजना गतीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा असे निर्देश दिले.  मुख्यमंत्री आज मंत्रालयात सर्व विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रशासन संवेदनशील, सचोटीचे, प्रामाणिक हवे अशी जनतेची अपेक्षा आहे.   महाराष्ट्राची देशात एक चांगली प्रतिमा आहे. खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्य शासनाच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली आहे.  तसेच इतर केंद्रीय मंत्री देखील राज्याला सहकार्य करण्यासाठी उत्सुक आहेत. अशा वेळी नावीन्यपूर्ण योजना देखील आपण मांडल्या पाहिजेत. नवनवीन  उपक्रमांचे स्वागत आहे.  केंद्राचा जास्तीत जास्त निधी कसा मिळेल हे पाहून तात्काळ असे प्रस्ताव सादर करावेत . विशेषत: रेल्वे, महामार्ग याबाबतीत केंद्राकडील पाठपुरावा वाढ...

पुणेकर जनतेच्या वतीने उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीच महाआरतीचे आयोजन ना. डॉ. नीलम गोऱ्हे

  शिवसेनेचा महावृक्ष आणखी विशाल होण्याची प्रार्थना; श्री चरणी केला ६२ किलोंचा मोदक अर्पण पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे, ता. २६ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे केवळ पुणेकरांचे नव्हे तर देशभरातल्या असंख्य गणेश भक्तांचे आराध्य दैवत आहे. शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री उद्धवजी ठाकरे यांच्या दिनांक २७ जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त आज येथे पुणे शहर शिवसेनेच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने मा. श्री उद्धवजी ठाकरे यांचे सर्व संकल्प पूर्ण होवोत आणि राज्यातील जनतेच्या मनातील सर्व संभ्रम दूर होण्यासाठी आशीर्वाद मिळावेत. शिवसेनेचा वटवृक्ष विशाल महावृक्षात रुपांतरीत होवो, अशी प्रार्थना केल्याचे शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे सांगितले.  त्या म्हणाल्या, " *शिवसेना हा पक्ष शिवसैनिकांच्या भावनांवर आणि विचारांवर चालत असलेल्या पक्ष आहे. अनेक वेळा लोकांनी पक्षातून बाहेर जाण्याचा प्रसंग येऊन गेला. मात्र भगवद्गीतेच्या शिकवणीप्रमाणे जे गेले त्यांचा शोक करायचा नाही आणि आपले काम सातत्याने पुढे चालू ठेवायचे या तत्त्वानुसार मा.  उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ...

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे, दि. २६:- जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीबाबत १९ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता अमलांत आली असून निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी ११ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला ११ ऑगस्टपर्यंत स्वतःजवळ परवाना प्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास‍ मनाई करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांनी निवडणूक कालावधीमध्ये त्यांच्याकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित बँक, संस्थेच्या प्रमुखावर राहील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ मधील तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

समाज मंदिराची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा

  विश्वकर्मा सुतार समाजाच्या मागणीचे प्रांत कार्यालयास निवेदन सादर पुणे मेट्रो लाईव्ह :  इचलकरंजी : कबनूर मधील विश्वकर्मा सुतार समाजाच्या समाज मंदिराची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी ,या मागणीचे निवेदन विश्वकर्मा सुतार समाजाच्या वतीने इचलकरंजी प्रांत कार्यालयात शिरस्तेदार संजय काटकर यांच्याकडे सादर करण्यात आले.तसेच यासंदर्भात तातडीने कार्यवाही व्हावी ,अन्यथा विश्वकर्मा सुतार समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. कबनूर येथील चंदूर रोडवर असलेल्या सुतार गल्लीत विश्वकर्मा सुतार समाजाचे समाज मंदिर ३५ वर्षापासून वापरात आहे.मात्रपरिसरातील काही समाज कंटकांकडून23 जुलै रोजी रात्री 1 च्या सुमारास सदर समाज मंदिराची तोडफोड करण्याचा प्रकार घडला. समाज मंदिराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित समाजकंटकांविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र  सदरची तक्रार मागे घेण्यासाठी मोठा दबाव आणत असून धमक्या देण्यात येत आहेत. त्यामुळे सुतार समाजबांधवांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.हे समाज मंदिर विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाची अस्मिता आहे. ...

7 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग

पुणे मेट्रो लाईव्ह :  कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 177.44 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई,  इचलकरंजी व तेरवाड, वारणा नदीवरील- चिंचोली असे एकूण 7 बंधारे पाण्याखाली आहेत.  आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 177.44 दलघमी, तुळशी 75.63 दलघमी, वारणा 758.21 दलघमी, दूधगंगा 478.61 दलघमी, कासारी 55.37 दलघमी, कडवी 60.24 दलघमी, कुंभी 53.53 दलघमी, पाटगाव 77.23 दलघमी, चिकोत्रा 34.19 दलघमी, चित्री 47.20 दलघमी, जंगमहट्टी 34.43 दलघमी, घटप्रभा 40.37 दलघमी, आंबेआहोळ 30.98 जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.    तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 18 फूट, सुर्वे 19 फूट, रुई 46 फूट, इचलकरंजी 44 फूट, तेरवाड 41 फूट, शिरोळ 31.6 फूट, नृसिंहवाडी 29.6 फूट, राजापूर 17.4 फूट तर नजीकच्या सांगली  8.8 फूट व अंकली 11.4 फूट अशी आहे.