उत्कृष्ट काव्य सादरीकरणाने उपस्थितांची मिळवली वाहवा. पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी / प्रतिनिधी इचलकरंजी येथे इचलकरंजी पञकार मंचच्या वतीने नवोदित कवी - कवयिञींसाठी आयोजित केलेल्या काव्य संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी सहभागी कवींनी सामाजिक आशयावर आधारित उत्कृष्ट काव्य सादरीकरण करत उपस्थितांची वाहवा मिळवली. इचलकरंजी शहर परिसरातील नवोदित कवी - कवयिञींसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे,या उद्देशाने इचलकरंजी येथे श्रमिक पत्रकार संघ व इचलकरंजी प्रेस क्लब या दोन्ही संघटनांच्या वतीने इचलकरंजी पञकार कवी मंचच्या माध्यमातून महापालिकेच्या पञकार कक्षामध्ये काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर स्वागत व प्रास्ताविकात श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रामचंद्र ठिकणे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत चांगले साहित्यिक व कलाकार घडवण्यासाठी यापुढेही निश्चित प्रयत्न राहिल ,अशी ग्वाही दिली. यानंतर सहभागी कवी - कवियञींनी महापुर , शेतकरी , कष्टकरी ,वृक्षतोड , माणुसकी,शिक्षण , स्वच्छता , पाऊस, स्वातंत्र्य , दुरावलेले नात...