लेखी पत्र दिल्यानंतर आमरण उपोषण आंदोलन स्थगित पुणे मेट्रो लाईव्ह : जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची त्रयस्त तपासणी चौकशी करून तपासणीचा अहवाल.पंधरा दिवसांमध्ये देण्याचे व अहवालामध्ये कामाबाबत काही गंभीर त्रुटी निदर्शनास आलेस ठेकेदारावर निविदा अटी व शर्तीनुसार कारवाई करण्यात येईल असे लेखी पत्र करवीर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष जयसिंगराव कांबळे यांना दिल्यानंतर आमरण उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले यांनी केली . यावेळी कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष अॅड . मुकुंद सनदे उपस्थित होते या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजय इंगळे, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख समीर विजापुरे इचलकरंजी महानगर जिल्हा अध्यक्ष त्र्यंबक दातार आधी सहभागी होते