शिवसैनिकांसह महिलांचाही उस्फूर्तपणे निष्ठा यात्रेत सहभाग दिसून आला.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : शिवसेने मध्ये झालेल्या अभूतपूर्व बंडाळी नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज 62 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांचा वाढदिवस शिवसैनिकांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.बाळासाहेबांच्या माघारी शिवसेना समर्थपणे सांभाळणारे उद्धव ठाकरे यांच्यासमोर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर मोठे आव्हान ठाकले आहे. संकटात असलेल्या उद्धव ठाकरे यांना प्रेम दाखवून देण्यासाठी शिवसैनिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली आहे.
कोल्हापूर मध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून निष्ठा यात्रा काढण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले शक्तीप्रदर्शन करत नेते जरी बाजूला झाले असले तरी आम्ही लढण्यासाठी कमी नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांसह महिलांचाही उस्फूर्तपणे निष्ठा यात्रेत सहभाग दिसून आला. फटाक्यांची आतषबाजी तसेच शिवसेना जिंदाबाद अशा घोषणांनी शिवसैनिकांनी यावेळी परिसर दणाणून सोडला. दसरा चौकातून प्रारंभ झाला. यावेळी उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाही यावेळी शिवसैनिकांनी दिल्या. शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले व सुनील मोदी यांनी रॅलीचे नेतृत्व केले.
Comments
Post a Comment