Skip to main content

सेल्स गर्ल ते उद्योजक

पुणे:  नुकताच व्यवसाय क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आला. यामध्ये सांगवी, पुणे येथील श्रीमती संध्या दीपक फाकटकर यांना" उद्योगिनी व्यवसाय गौरव पुरस्कार  २०२२" ने सन्मानित करण्यात आले.

 श्रीमती संध्या फाकटकर या गेले १८  ते  २० वर्ष फर्निचरच्या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण एम. ए .हिंदी व बी.एड.आहे.त्यानंतर त्यांचे लग्न झाले. एकत्रित कुटुंब व्यवस्था असल्याने व पती एकटेच कंपनीमध्ये नोकरी करीत असल्याने घरामध्ये आर्थिक अडचण होती. परंतु स्वतःच्या शिक्षणाचा कुटुंबासाठी काहीतरी उपयोग व्हावा ही  देखील इच्छा होती.  सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांनी शिक्षक पदासाठी नोकऱ्यांचा शोध सुरू केला. परंतु यामध्ये अपयश आले. या अपयशामुळे खचून न जाता घरामध्ये पाचवी ते दहावी शिकवण्या सुरू केल्या. आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांची व पालकांची परिस्थिती देखील बेताचीच. त्यामुळे अगदी अल्प प्रमाणात शिकवणीचे शुल्क घेतले जायचे. महिन्याकाठी त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यास ५०  रुपये शुल्क आकारले जायचे. परंतु एक- दोन वर्ष असेच चालत राहिले. संसाराचा आर्थिक गुंता काही  सुटेना. म्हणून फर्निचरच्या दुकानांमध्ये पार्ट टाइम सेल्स गर्ल चे काम सुरू केले. कालांतराने या व्यवसायात थोडे प्राविण्य मिळू लागले. मग पूर्ण वेळ फर्निचरच्या दुकानात सेल्स गर्ल चे काम करू लागल्या. वर्ष २००४  ते २०११  या कालावधीत सेल्स गर्लचे काम केले . त्यानंतर वर्ष २०१२  मध्ये स्वतःचा फर्निचरचा अक्षय एंटरप्राइजेस नावाचा  स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्याकडे ५०  ते ६० कारागीर काम करीत आहेत. त्यांचा टर्नओव्हर ४०  ते ४५ लाख रुपये एवढा आहे. ५०  रुपये मासिक शुल्क घेऊन शिकवणी घेणाऱ्या श्रीमती संध्या फाकटकर यांचा जीवन प्रवास नक्कीच इतरांना प्रबोधन पर ठरेल असे वाटते.

शब्दांकन;- डॉ. तुषार निकाळजे

Comments

  1. आमच्या ओतूर गावच्या व आमच्या गल्लीतील रहिवासी असलेल्या संध्या ताईंचे त्यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल मनःपुर्वक अभिनंदन... 💐💐

    ReplyDelete

Post a Comment