— प्रोविडेंट फंड की वजहसे 42 साल चल रहा एमएसएमई यूनिट 100%डिफेन्स सप्लायर बंद होने जा रहा है घोर अन्न्याय आयोजक पुणे उद्योग एस वी मोहिंद्रा पुणे
पुणे मेट्रो लाईव्ह : एका निरपराध ज्येष्ठ नागरिकावर भविष्य निर्वाह निधी विभागाने केलेली जबर कारवाई नुकतीच निदर्शनास आली आहे.भोसरी औद्योगिक वसाहतीमधील पूना उद्योग नामक एका इंजिनीअरिंग युनिटला, जे गेल्या 42 वर्षांपासून सुरु असून भारतीय संरक्षणासाठी 100 टक्के पुरवठा करत आले आहे, त्याला सन 1997 पासून व्याज (interest) आणि विलंब नुकसानीसाठी (demurrages) समन्स बजावण्यात आले होते. यांत सुमारे 22 वर्षांचा रेकॉर्ड विचारण्यात आला होता.युनिटने चलनाच्या प्रतीसह तपशीलवार माहिती सादर केली. पण या सर्व रेकॉर्ड ची पीएफ विभागाकडून अजिबात दखल घेतली गेली नाही. पीएफला केलेल्या व्याजाची देयके पीएफ विभागाकडे सुपूर्द करून सुद्धा त्यांनी त्यांची दखल घेतली नाही. पीएफच्या मुख्य कार्यालयाने दि. 28.08.2019 रोजी विवेकानंद विद्या विहार प्रकरणात थकबाकीचा दावा न करण्याच्या सूचना सर्व प्रादेशिक कार्यालयांना जारी केल्या. मुख्य कार्यालयाच्या या सूचनांकडे दुर्लक्ष करून दि 31.10.2019 रोजी, PF आयुक्तानी (पुणे) रु. 8,69,901/- च्या वसुलीचे आदेश जारी केले. एवढेच नाही तर दि 22.10.2021 रोजी मा. मद्रास उच्च न्यायालयाने आदेश दि...