वाकड येथील घटनेत मृत पावलेल्या तरुणास न्याय मिळवून देण्यासाठी तृतीयपंथी समाजाकडून गुरुवारी पोलीस आयुक्तालयावर आंदोलन
पुणे मेट्रो लाईव्ह अन्वरअली शेख पिंपरी, पुणे ( दि. १ ऑगस्ट २०२२) - वाकड येथील "द बार हिस्ट हॉटेल" येथे हॉटेल मालक, त्यांची पत्नी तसेच त्यांचे साथीदाराने केलेल्या मारहाणीत एका युवकाला जीव गमवावा लागला. सदर प्रकरण दडपून टाकण्यासाठी आरोपींवर सौम्य कलमे लावून पोलिसांकडून अन्याय केला जात असल्याने त्या विरोधात तृतीयपंथी समाजाच्या विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने रिपब्लिकन युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली गुरुवारी ( दि. ४ ऑगस्ट २०२२) सकाळी ११ वाजता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय येथे निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन युवा सेनेचे राहुल डंबाळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तृतीया फाऊंडेशनच्या प्रेरणा वाघेला, कशीश, कादंबरी, पिडिता मन्नत, राहुल गजवी, उडान ट्रस्टचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. दि. २६/७/२०२२ रोजी मध्यरात्री किरकोळ वादातून अभय मनोज गोंडाणे या २१ वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला. त्याबाबत सदर आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनात तृतीया फाऊंडेशन , उडान ट्रस्ट, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, पुणेरी प्राइड फाऊंडेशन, महालक्ष्मी जनजाती ...