जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप प्रसंगी रवि रजपुते, रविद्र माने, विलास गाताडे, भाऊसो आवळे व इतर मान्यवर. पुणे मेट्रो लाईव्ह : मनु फरास : इचलकरंजी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतनिमित्त येथील रवी रजपूते सोशल फौंडेशन तर्फे कामगार चाळ मध्ये डॉ आंबेडकर भवनात रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिवाय प्रभाग बारा मधील जेष्ठ नागरीकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. विलासराव गाताडे, माजी नगरसेवक रवी माने, भाऊसाहेब आवळे, कामगार नेतेशिवाजी जगताप,के. के. कांबळे, धनंजय पळसुले, हरी माळी, आगसर, सदा मालाबादे, भाऊसाहेब कसबे यांच्या हस्ते तसेच माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रभाग १२ मधील नागरीकांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा लोकोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आल्याचे रवी रजपूते यांनी स्पष्ट केले.