Skip to main content

Posts

Showing posts with the label पश्चिम महाराष्ट्र. इचलकरंजी

इचलकरंजी पञकार कवि मंचच्या काव्य संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्कृष्ट काव्य सादरीकरणाने उपस्थितांची मिळवली वाहवा. पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी / प्रतिनिधी इचलकरंजी येथे इचलकरंजी पञकार मंचच्या वतीने नवोदित कवी - कवयिञींसाठी आयोजित केलेल्या काव्य संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी सहभागी कवींनी सामाजिक आशयावर आधारित उत्कृष्ट काव्य सादरीकरण करत उपस्थितांची वाहवा मिळवली. इचलकरंजी शहर परिसरातील नवोदित कवी - कवयिञींसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे,या उद्देशाने इचलकरंजी येथे श्रमिक पत्रकार संघ व इचलकरंजी प्रेस क्लब या दोन्ही संघटनांच्या वतीने  इचलकरंजी पञकार कवी मंचच्या माध्यमातून महापालिकेच्या पञकार कक्षामध्ये काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर स्वागत व प्रास्ताविकात श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रामचंद्र ठिकणे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत चांगले साहित्यिक व कलाकार घडवण्यासाठी यापुढेही निश्चित प्रयत्न राहिल ,अशी ग्वाही दिली. यानंतर सहभागी कवी - कवियञींनी   महापुर , शेतकरी , कष्टकरी ,वृक्षतोड , माणुसकी,शिक्षण , स्वच्छता , पाऊस, स्वातंत्र्य , दुरावलेले नात...

लेटेस्ट अपडेट :पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

इचलकरंजी : मनु फरास : इचलकरंजी :    पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी ३२ फुटांपर्यंत पोहचली (इशारा पातळी ३९ तर धोका पातळी ४३ फुट). तर आज पंचगंगा नदीची पातळी सकाळी 8.00  वाजता  58 फुटावर आहे , इशारा पातळी 68, धोका पातळी 71 आहे. आम. प्रकाश आवाडे यांचे कडून पूरस्थितीची पाहणी   इचलकरंजी : राधानगरी, कोयना धरणातून सुरु असलेला पाण्याचा विसर्ग आणि पंचगंगा नदी पाणी पातळीत होत असलेली वाढ या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी पंचगंगा नदीकाठी भेट देत पूर परिस्थितीची माहिती घेतली. पाणी पातळीत वेगाने वाढ होत चालल्याने पंचगंगा नदीला आलेल्या पुराची पाहणी करून सुचना करताना नदीक ाठावरील तसेच मळेभागातील नागरिकांनी सतर्क रहावे, अशा सूचनाही आमदार आवाडे यांनीय या वेळी केल्या.यावेळी केल्या.

लोकभ्रम नवे - जुने

पुणे मेट्रो लाईव्ह :  प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) जून महिना कोरडा गेला आणि जुलैचा पहिला आठवडा कोसळू लागला आहे.असाच बदल महाराष्ट्राच्या राजकारणात ही झाला.त्यातूनअखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी  ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीपदी ना.देवेंद्र फडणवीस यांनी  शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटप आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत्या चार दिवसात होईल.उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. सत्ताधारी  आघाडीतील एका पक्षाचा एक मोठा गट विरोधकांबरोबर सत्ता स्थापावी ही भूमिका घेऊन करत असलेले नऊ दिवस आणि नऊ रात्री चाललेले नवनाट्य अखेर संपले.या साऱ्या वर्तमानाची व सत्ता बदलाची समीक्षा त्यातील पात्रेच कालांतराने स्वतःच करतील. वेषांतर ,अंधार भेटी वगैरेची चर्चा आता काही पात्रांच्या घरातून सुरू झालीच आहे.राजकारण ही गोष्ट बाजूला ठेवली तरी उद्धव ठाकरे यांनी ज्या शांततेने ,सहजपणाने,संयतपणे मुख्यमंत्री पदासह आमदारकीचाही राजीनामा दिला ते कौतुकास्पद आहे. सत्तेच्या राजकारणाचा प्रशासकीय अनुभव नसूनही त्यांनी असंख्य मनात कुटुंबप्रमुख म्हणून जे स्थान मिळविले तो राजकीय प्रगल्भपणा...