Skip to main content

लोकभ्रम नवे - जुने


पुणे मेट्रो लाईव्ह : 

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८ ५०८ ३० २९०)

जून महिना कोरडा गेला आणि जुलैचा पहिला आठवडा कोसळू लागला आहे.असाच बदल महाराष्ट्राच्या राजकारणात ही झाला.त्यातूनअखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी  ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीपदी ना.देवेंद्र फडणवीस यांनी  शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटप आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत्या चार दिवसात होईल.उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. सत्ताधारी  आघाडीतील एका पक्षाचा एक मोठा गट विरोधकांबरोबर सत्ता स्थापावी ही भूमिका घेऊन करत असलेले नऊ दिवस आणि नऊ रात्री चाललेले नवनाट्य अखेर संपले.या साऱ्या वर्तमानाची व सत्ता बदलाची समीक्षा त्यातील पात्रेच कालांतराने स्वतःच करतील. वेषांतर ,अंधार भेटी वगैरेची चर्चा आता काही पात्रांच्या घरातून सुरू झालीच आहे.राजकारण ही गोष्ट बाजूला ठेवली तरी उद्धव ठाकरे यांनी ज्या शांततेने ,सहजपणाने,संयतपणे मुख्यमंत्री पदासह आमदारकीचाही राजीनामा दिला ते कौतुकास्पद आहे. सत्तेच्या राजकारणाचा प्रशासकीय अनुभव नसूनही त्यांनी असंख्य मनात कुटुंबप्रमुख म्हणून जे स्थान मिळविले तो राजकीय प्रगल्भपणा होता.राजकीय विरोधक असलेल्या नेत्यांनाही या राजीनाम्याचे  सेलिब्रेशन करू नये असे कार्यकर्त्यांना सांगावे लागले यातच सारे काही आले.आता नवे सरकार आलेय.या सरकारने भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांवर आधारित कारभार करावा. त्यांच्याकडून जात,पात,धर्म यापलीकडे जाऊन माणसाकडे माणूस म्हणून बघत काम व्हावे यासाठी येणाऱ्या सरकारला भरभरून शुभेच्छा.

अलीकडे राजकारण ,समाजकारण,अर्थकारण वास्तवापासून पासून भ्रामकतेकडे वेगाने वाटचाल करत आहे.चोविस तास व्यापून राहिलेल्या माध्यमांची त्याला सक्रिय साथ आहे. बातम्या,चर्चा, जाहिराती संवाद ,मुलाखती ,घोषणा अशा सार्‍यातूनच भ्रम पसरवला जात आहे. सुमार,बेताल, असत्य, ढोंगी,अविवेकी मंडळींची विभूती पूजा सातत्याने करत राहणे आणि विद्वत्तापूर्ण,सैद्धांतिक,सत्य, प्रामाणिक, विवेकी मंडळींना हिणवणे हे अलीकडील लोकभ्रमाचे लक्षण आहे. त्या नऊ -दहा दिवसात महाराष्ट्रात जे राजकारण सुरू होते व ते ज्या पद्धतीने मांडले जात होते ते या लोकभ्रमाचेच  उदाहरण आहे. अडीच वर्षे सत्ता भोगून आपण सत्तेतून का बाहेर पडत आहोत ? याची व्यक्तीनिहाय वेगवेगळी पण फार तकलादू कारणे सांगितली गेली. कोणाला ही आघाडी अनैसर्गिक असल्याचा अडीच वर्षांनी साक्षात्कार झाला,कोणाला निधीच मिळत नव्हता म्हणे,कोण नाममात्र मंत्री होते म्हणे, कोणाला बाळासाहेबांचे हिंदुत्व हवे होते पण म्हणजे काय ते सांगता येत नव्हते म्हणे अशी अनेक कारणे सांगितली गेली.पण न सांगितलेली कारणेही अनेक आहेत.ती आपोआप उघड होतील.

भारतीय राजकारणात अलीकडे पक्षीय विचारधारा आणि निष्ठावंत कार्यकर्ते जे करू शकत नाहीत ते काम केंद्रीय सत्तेतून हातात आलेल्या संस्था करत आहे. ईडीपासून सीबीआय पर्यंतची अनेक उदाहरणे दिसून येत आहेत.जोडीला   प्रचंड पैसा आहे.साम,दाम,दंड,भेद यांचा मुबलक वापर सुरू आहे हे नाकारता कसे येईल ? काहींन याची खात्री असावी की, केंद्रशक्ती बरोबर  सत्ता स्थापन केली तर आपले केलेले  सर्व गुन्हे माफ होतील. इडी पासून सीआयडी पर्यंतचे सर्व ससेमिरे थांबले जाऊन पावन करून घेतले जाईल. शिवाय पुढच्या कैक पिढ्यांची लक्ष्मीदर्शनाची सोयही होणार आहे.कारण तशी उदाहरणे स्पष्टपणे समोर आहेत.'आम्ही पक्ष बदल केल्याने आता आम्हाला ईडीची भीती नाही ' असे मत एका मोठ्या नेत्याने जाहीरपणे व्यक्त केलेले सर्वानी ऐकले आहे. त्यामुळे आता बरबटलेपणाला स्वच्छतेचे प्रमाणपत्र मिळणे सहज शक्य आहे.पक्ष कार्यालये आता पावनकेंद्रे बनली आहेत.

 'व्यक्तीला धर्म असेल पण राष्ट्राला धर्म असणार नाही ' असे सांगणाऱ्या राज्यघटनेची शपथ घेऊन राजकारण करणारे, सभाग्रहात त्याची हमी देणारे जेव्हा  विशिष्ट धर्मासाठी एकत्र येतो म्हणतात तेव्हा त्यांनी धर्माच्या व्यापक वास्तवतेपासून पळ काढलेला असतो.किंबहुना धर्मधारणेशी द्रोह केलेला असतो. भारताच्या प्राचीन संस्कृतीला ,धर्माच्या व्यापकपणाला काळे फासलेले असते.अर्थात एक माणुस म्हणून स्वतःचेही तोंड काळे केलेले असते.पण भ्रामक विचार व वास्तव स्वार्थ यांच्याआड ते लपवले जात असते. आम्ही बुद्धिवंत आहोत,आम्ही विचार करू शकतो अशा भ्रमात असणाऱ्यांच्या बुद्धीवर धर्मांध परधर्मद्वेषाची पुटं कधी चढली व त्यातून आपण कसे  गंजलो हेही या भ्रामकतेने कळू दिलेले नाही.

त्याच प्रकारे अडीच वर्षांपूर्वी मी पुन्हा येईन ,मी पुन्हा येईन असा घोषा लावणाऱ्या व त्यासाठी उतावीळ झालेल्यांनी त्या  नऊ  दिवसात पुन्हा येण्याची प्रतिक्रिया न देणे, थांबा व पहा ही भूमिका घेणे, बंडखोरांना सर्व रसद पुरवून नामानिराळे राहण्याची सावध भूमिका घेणे आणि लोकांना तो पटणे, आक्रस्ताळेपणाने मौनात जाणे हाही लोकभ्रमी प्रकारच आहे. गेल्या काही वर्षात आपण भारत वेगाने आर्थिक प्रगती करतो आहे ,भारताची जगात प्रतिमा उंचावलेली आहे, भारतीय नेतृत्व विश्वगुरू बनले आहे, नोटाबंदीने काळा पैसा परत येणार आहे ,जीएसटीतून उद्योग आणि व्यापाराला चालना मिळणार आहे, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या मिळणार आहेत ,दहशतवाद संपणार आहे ,गटारीतून गॅस  तयार केला जातो व त्यावर वडे तळले जातात,गणपती हे प्लास्टिक सर्जरिचे वा अवयव रोपणाचे पहिले उदाहरण होते,डॉलरच्या तुलनेत रुपया ऐंशीच्या घरात गेला तरी आपण सक्षमच, घरगुती गॅस  सिलेंडर हजारी पार व पेट्रोल सव्वाशे जवळ गेले तरी महागाई नाहीच यासारखे अनेक भ्रम जोपासले आहेत.

 भारत गेल्या दशकात अतिशय वेगाने कर्जबाजारी होतोय,चीन तर सोडाच पण छोटे देशही भारतावर नजर रोखून वाचाळ प्रवक्त्याना बदलायला लावत आहेत,बेरोजगारीचा दर उच्चांक गाठतो आहे,उद्योग धंदे बंद पडले आहेत,नोटबंदीने अर्थव्यवस्था खड्यात घातली आहे,चोर व दरोडेखोर बँका लुटून  देश सोडून पळून जात आहेत, त्यातील फोलपणा लक्षात येऊनही त्याविरुद्ध  ब्र काढला जात नाही. याचे कारण या लोकभ्रमाने एक अंधभक्ती संप्रदाय निर्माण केला आहे. त्याचे सारे शहाणपण मेंदू गहाणटाकी परधर्म द्वेषाशी जोडून दिलेले आहे. त्याची विचार करण्याची कुवत इतकी गोठवून टाकलेली आहे की त्याला आपल्याच धर्मातील तळागाळातील अब्जावधी लोकांचें या साऱ्या निर्णयामुळे, व्यवस्थेमुळे हाल हाल होत आहेत हेही कळत नाही.

लोकभ्रम पूर्वीपासून आहेत. पण त्यांचे स्वरूप इतके विखारी व विनाशी नव्हते. आजच्या आधुनिक काळातील लोकभ्रम हे व्यक्ती ,कुटुंब, समाज व राष्ट्र या सर्वच पातळ्यावर विकलांग बनवणारे आहेत. याचे भान सर्वांनी ठेवण्याची गरज आहे. आज आपण जात्यात नाही याकडे सुपात असलेल्यांनी दुर्लक्ष केले तर उद्या त्यांचेही दळणकांडण अटळ आहे. समाजाकडे डोळे उघडे ठेवून पाहिले की आपल्याला अनेक प्रकारचे लोकभ्रम दिसतात. जगामधील सर्वच समाजात ते दिसतात. मनाची दुर्बलता हेच या लोकभ्रमाचे मूळ आहे. माणूस विशेषतः संकटकाळी मानसिक तणाव कमी करण्यासाठी या भ्रमाचा आधार घेताना दिसतो.करुणा भाकणे, नामस्मरण करणे, जपजाप्य करणे यांचा संकटाशी काहीही कार्यकारण भाव नसतो. मात्र मनाच्या समृद्धीसाठी हे सारे चाललेले असते.हा सर्व प्रकार म्हणजे लोकभ्रम असतो. माणूस जितका अज्ञानी तेवढा त्याच्यावर लोकभ्रमाचा पगडा जास्त. अलीकडे शिक्षित माणसेही लोकभ्रमात अडकल्याचे अनेकदा दिसते. याचे कारण ती शिकलेली जरुर असतात पण ज्ञानी असतातच अस नाही.ज्ञान आणि शहाणपण या वेगवेगळ्या बाबी आहेत.

प्रत्येक समाजाच्या विशिष्ट संस्कृतीक परंपरा असतात. त्यांना अनुसरून त्या त्या समाजाचे लोकभ्रम तयार होत असतात. ते परंपरेने पुढच्या पिढीत पोहोचवले जातात.मंत्रतंत्र ,मंतरलेले ताईत यासारखे लोकभ्रम समाजात मोठ्या प्रमाणात दिसतात. माणसाचे भूतलावरील अस्तित्व संपल्यानंतरही त्याचे आत्मारुपाने अस्तित्व मागे राहते अशी समजूत अनेक धर्मांमध्ये आहे. त्यातूनच भूत,प्रेत ,पिशाच्च वगैरे भ्रामक समजुती रूढ झाल्या. वास्तविक भूत वगैरे कोणीही प्रत्यक्ष पाहिलेले नसते. पण त्याच्या अभासावर सगळे चाललेले असते. मृत्यूनंतरच्या अस्तित्वाच्या सर्वच कल्पनांना विज्ञानाने भोळसट ठरवले आहे. पण माणसाचे मन कमकुवत असते. त्याचा फायदा तांत्रिक, मांत्रिक भगत वगैरे मंडळी घेताना दिसतात. संत ज्ञानेश्वर ,तुकाराम ते  संत गाडगेबाबा आदी अनेक संतांनी हे सर्व थोतांड आहे हे वारंवार स्पष्ट केलेले आहे.


शकुन व अपशकुनांचे लोकभ्रमही मोठ्या प्रमाणात आढळतात.मांजर आडवे जाणे ,पाल चूकचुकणे ,विधवा स्त्रीचे दर्शन होणे वगैरे बाबी अशुभ मानल्या गेल्या.तर सकाळी कोल्हा दिसणे ,स्त्रीचा उजवा डोळा लवणे, सुवासिनी पाण्याची घागर घेतलेली दिसणे वगैरे बाबी शुभ मानल्या आहेत. वास्तविक या घटनांचा एखादे काम होण्याशी अथवा न होण्याची काहीही संबंध नाही .पण तरीही या लोक भ्रमावरील श्रद्धा कमी होत नाही. फलज्योतिष, जन्मपत्रिका, मुहूर्त, मंगळाचे प्रबल्य ,चंद्र सूर्याची ग्रहणे ,उल्कापात यासारख्या अनेक शुभाशु लोकभ्रमांच्या गोष्टी आपल्याला सांगता येईल.माणसाच्या जीवनात अनेकदा संकटे उद्भवतात. अशा वेळी त्याला काहीतरी आधार हवा असतो. नवस बोलणे हा त्यासाठीचाच एक लोक भ्रम आहे. एखाद्या विशिष्ट दैवताला साकडे घालणे ,अभिषेक करणे अथवा विशिष्ट दुःखाचे निवारण केल्यास मंदिराला कळस चढवण्यासारखा नवस बोलणे यांचा आणि प्रत्यक्ष दुःख निवारणाचा काहीही संबंध नसतो. त्यासाठी वैद्यकीय उपचार अथवा तसे उपायच आवश्यक असतात.वास्तविक कोणत्याही घटनेमागील कार्यकारणभाव समजून घेऊन तर्कशुद्ध विचार आणि योग्य उपाययोजना करणे ही शास्त्रीयदृष्टी असते. पण अशा पद्धतीत लोकभ्रमाला अवसरच नसतो. मानवी मनातील अज्ञानजन्य भीती पूर्णतः अजूनही गेलेली नाही. म्हणूनच आजही अनेक लोकभ्रम  सुशिक्षित समाजातही प्रचलित असताना दिसतात. मानवी मनातील अज्ञानजन्य भीती जेव्हा जाईल तेव्हाच लोकभ्रम कमी होतील.हिंदुत्ववादी विचारांचा जप करणारे सरकार सत्तेवर आल्यावर आपल्या दैनंदिन जीवनात फार सकारात्मक बदल होईल व ते सुसह्य होईल हाही एक सर्वात मोठा  लोकभ्रम आहे.


     (लेखक समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने गेली तेहेतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत )

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीर व अवैध व्यवसाय धंदे , लोकांना होणारा त्रास व गुंडगिरीबाबत कठोर कारवाई होणे बाबत पुजारी मळा येथील नागरिकांचे निवेदन.

 संदेश राजाराम हत्तीकर, संतोष राजाराम हत्तीकर,राजाराम हरीबा हत्तीकर व अली खान यांचे वर कारवाई  करण्याची मागणी. पुणे मेट्रो लाईव्ह :  इचलकरंजी  येथील  श्री. संदेश राजाराम हत्तीकर, संतोष राजाराम हत्तीकर,राजाराम हरीबा हत्तीकर व अली खान यांनी पुजारी मळा, वॉ.नं. १७ शिवशक्ती चौक, झपाटे दवाखान्याजवळ, इचलकरंजी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर  पुजारी मळा परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने हत्तीकर यांचे सदर परिसरात दारूच्या बाटल्या स्वच्छ करणेचे केमिकल गोडाऊन असून सदर गोडाऊन मध्ये हत्तीकर कुंटूबिय बेकायदेशीर व्यवसाय धंदे करतात म्हणजेच अनाधिकृत पणे, विनापरवाना व बेकायदेशीर देशी, विदेशी स्वरुपाचे मद्य विक्री करणे तसेच  परिसरात बेकायदेशीर  अवैध जुगार, तीनपानी पत्ते पैसे लावुन खेळणे तसेच अनेक बेकायदेशीर  व्यवसाय,धंदे तसेच लोकांना होणारे त्रास व गुंडगिरीबाबत कठोर कायदेशीर कारवाई  करण्याची मागणी या परिसरातील महिला नागरीक  शांता बाबासाहेब धुमाळ , सरस्वती फाल्गुन पुजारी व पद्मजा  मुरारी नराते चंचंदा भिमराव नराटे. सौ. चंदाकिमराव नरोट ,रेखा संजय मुधाळ...

जमीयत उलमा हिंद महाराष्ट्र के अध्यक्ष हजरत मौलाना मुस्तकीम अहसन आजमी साहब का इंतकाल

आजमी साहब की कमी हमेशा मेहसुस होगी ; हाजी गुलजार अध्यक्ष जमीयत पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो लाईव्ह :    अन्वरअली शेख  :  पिंपरी चिंचवड- जमियेत उलमा हिंद  महाराष्ट्र के अध्यक्ष हजरत मौलाना मुस्तकीम अहसन आजमी | साहब का कल  २० जून को सुबह की नमाज से कुछ वक्त पहले इंतकाल हो गया.  जनाजे की नमाज असर के बाद  नारियलवाडी कब्रस्तान मुंबई में अदा की गयी और उसी कब्रस्तान में सुपुर्द खाक किया गया. हजरत मौलाना मुस्तकीम साहब सदर महाराष्ट्र जमीयत के साथ समाजसेवा में ५६ साल से लगे रहे और आप उलेमाये दिन में एक बेहतरीन मुकर्रार थे. आपके पुणे शहर मे कई सफर हुवे हे. जमियेत के लिये आप का बहुत महत्व पूर्ण योगदान रहा है, आप जमीयत उलेमा के प्रोग्राम में २५-३० वर्षो से जुडे रहे. हाजी गुलजार अध्यक्ष पिंपरी चिंचवड जमियेत उलमा ने आपके इंतकाल पर दुख व्यक्त किया है और अल्लाह से दुआ कि है कि मरहूम को जन्नते फिरदौस आला मकाम अता फरमाएं.  

शिवसेना पुणे शहर .... रास्ता रोको आंदोलन ... झुकेंगे नही ...

पुणे मेट्रो लाईव्ह : शिवसेना नेते, खा संजय राऊत साहेब यांच्यावर राजकीय सुडाने केंद्र सरकारने ईडी मार्फत कारवाई केली. आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राऊत साहेबांची तपास व चौकशी सुरू होती. पहिली नोटीस दिड महिन्यापूर्वीच दिली, चौकशी केली मग तेव्हाच का अटक केली नाही ? भाजपच्या विरोधात बोलणार त्याच्यावर ईडीची कारवाई.. भाजप मधे प्रवेश केला आणि काहीही गुन्हा असो तरीपण नो कारवाई .. ही कुठली हिटलरशाही ...  पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख बाळा  ओसवाल, डाॅ अमोल देवळेकर, आनंद गोयल, भरत कुंभारकर, विधानसभाप्रमुख अशोक हरणावळ, विशाल धनवडे, राजेंद्र बाबर, उत्तम भुजबळ, अर्जुन जानगवळी, राजेश मोरे, दिलीप पोमण, रूपेश पवार, मारूती ननावरे, चेतन चव्हान, अक्षय माळकर शशिकांत,दिपक घुबे, सचिन जोगदंड, सुरज लोखंडे, गौरव पापळ ,मदन गाडे, नितिन निगडे, सनि गवते, अतुल दिघे, निरंजन कुलकर्णी, अनिकेत थोरात, शंकर साठे, स्वाती कथलकर, श्रुती नाझीरकर, सरोज कारवेकर, रोहीणी कोल्हाळ, सिमा मगर, सलमा भाटकर, सिमा गायकवाड, पद्मा सोरटे, गायत्री गरूड, मुकुंद लालबिगे, अनिल माझिरे, रोहीत सांडभोर,

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटची सर्वात मोठी अभिवादन मिरवणूक काढण्यात आली.

  शिवजयंतीदिनाची  अभिवादन मिरवणूक ठरली आहे .एकूण ९ हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे विशेष आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि. १९ फेब्रुवारी  २०२३ रोजी सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष तसेच 'डॉ.पी.ए. इनामदार विद्यापीठा 'चे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. एम.सी.ई सोसायटीचे सचिव प्रा. इरफान शेख , एस.ए. इनामदार, शाहीद इनामदार, वहाब शेख, साबीर शेख , असीफ शेख,शाहीद शेख, बबलू सय्यद,तसेच विश्वस्त, पदाधिकारी, प्राद्यापक -शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सेंटर, गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट, डेक्कन मुस्लीम इन्स्टिट्यूट अॅण्ड लायब्ररी, अवामी महाझ या संस्थांनी सहभाग घेतला.पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थी यांचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी शिवजयंतीदिनाची अभिवादन मिरवणूक ठरली आहे .एकूण...

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये योगदिन उत्साहात साजरा

  श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये योगदिन उत्साहात साजरा इचलकरंजी : प्रतिनिधी :   21 जून हा दिवस संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये योगदिन साजरा करण्यात आला.  प्रारंभी मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर यांनी योगदिनाचे महत्त्व विषद केले. यावेळी राज्यस्तरीय योगासनपटू कु. हर्षदा करंबेळकर, कु. शर्वरी माळी व त्यांच्या सहकारी विद्यार्थिनींनी प्रार्थना, सूर्यनमस्कार, योगासने अशा क्रमाने प्रात्यक्षिके करीत उपस्थित मुलींकडून आसने करवून घेतली. यामध्ये प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर तसेच उपप्राचार्य आर. एस. पाटील, पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे, एस. व्ही. पाटील हे सारे स्वतः सहभागी झाले व त्यांनी सर्व योगासनेही केली. काही शिक्षक-शिक्षिकांनीही योगासने केली.  सौ. अर्चना रानडे यांनी कार्यक्रमाला साजेसे गीत सादर केले. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडाविभाग प्रमुख प्रा. शेखर शहा यांच्या नेतृत्वाखाली योगदिन प्रमुख आर. पी. कुलकर्णी यांनी केले.

कारण मागे भट नावाचा उभा हिमालय आहे.....

  पुणे मेट्रो लाईव्ह : प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) “उष :काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली “… अशी क्रांतीज्योत मनात पेटवणाऱ्या सुरेश भट यांचा मंगळवार ता. १४ मार्च २०२३ रोजी विसावा स्मृतिदिन आहे.त्यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे झाला .आणि १४ मार्च २००३ रोजी ते नागपुरात कालवश झाले.सुरेश भट हे त्यांच्या मित्रपरिवारात, शिष्य परिवारात आणि साहित्यवर्तुळात” दादा ” या नावाने ओळखले जात असत.अर्थात ते खऱ्या अर्थाने दादा माणूसच होते .मराठी कवितेत त्यांनी दिलेले योगदान अनमोल स्वरूपाचे आहे .मेंदीच्या पानावर, आज गोकुळात रंग ,मलमली तारुण्य माझे, गे माय भू तुझे मी ,आता जगायाचे असे ,तरुण आहे रात्र अजुनी यासारखी शेकडो अजरामर गाणी ,कविता ,भावगीते , पोवाडे त्यांनी लिहिले .पण त्यांची खरी ओळख आहे ती म्हणजे मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती हीच आहे.एखाद्या प्रतिभावंत आणि रसिकमान्य कवीने एखाद्या काव्य प्रकाराबाबत संपूर्ण आयुष्य वाहून घेणे आणि त्यात नव्या पिढ्या निर्माण करण्याचे जिवनध्येयी काम करणे हे फार दुर्मिळ असते.सुरेश भट उर्फ दादा हे त्य...

दि.मुस्लिम को ऑप बँक पुणे शाखा श्रीरामपूर या शाखेचा कार्येक्रम डॉ. पी ए इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली व व्हाइस चेअरमन एस ए इनामदार ,सी ई ओ मोहम्मद शाहिद यांनी यशस्वीरिता पार पाडला

श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला . पुणे मेट्रो लाईव्ह :    पुणे : दि मुस्लिम को  ऑप बँक लि. शाखा श्रीरामपूर या शाखेमध्ये  नुकताच कार्येक्रमचे  संपन्न झाला .  या कार्यक्रमचे अध्यक्ष श्री गणी हाजी शेख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक , ज्येष्ठ वकील बाबा शेख , ज्येष्ठ वकील. युसुफ कादर शेख , नगरसेवक मुख्तार शाह साहेब , सी ए एजाज शेख , सय्यद मोहम्मद  गौस उर्फ बबलू सय्यद (संचालक  दि मुस्लिम को  ऑप बँक ) , अजमत फातिमा इंग्लिश स्कूल संचालक  मुबिन शेख , मतीन शेख व कुरेशी समाजाचे सदर मेहबूब कुरेशी , इंजि. सलीम मणियार , सलीम दस्तगीर , पि एस आय इब्राहीम शेख , इरफान शेख, इम्रान सय्यद आदी उपस्थित होते. या वेळी  श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला . सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रांच मॅनेजर शकील कुरेशी , स्टाफ एजाज सय्यद , वसीम  शेख , साजिद खान या सर्वांनी   विशेष परिश्रम घेतले. श...

प्रवाशांची गैरसोय झाल्याने काॅंग्रेसने अधिका-यांना धरले धारेवर

  पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी : प्रतिनिधी :  शासन आपल्या दारी अभियानासाठी आज मुख्यमंत्र्याचा कोल्हापूर दौरा आहे. या कार्यक्रमासाठी इचलकरंजी बसस्थानकातून बहुतांश एसटी बसेस गेल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बसस्थानकात धाव घेऊन अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अधिकार्‍यांनी शासन आदेशानुसार बसेस नियोजित कार्यक्रमासाठी गेल्या असल्या तरी प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतल्याचे सांगितले. शासन अपल्या दारी या अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंगळवारी कोल्हापूर दौर्‍यावर आहेत. त्यामुळे शासन आदेशानुसार इचलकरंजी बसस्थानकातील बहुतांश एसटी बसेस या कार्यक्रमाला नागरीकांना ने- आण करण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज सकाळी 8 वाजल्यापासून बसस्थानकात प्रवाशांची गर्दी दिसत होती. अनेकांनी बसेसबाबत विचारणा केली असता बसेस नसल्याचे सांगण्यात अले. त्यामुळे लांब पल्यावरून आलेले प्रवाशी तसेच इचलकरंजी बसस्थानकातून पुढील प्रवास करण्यासाठी आलेल्या प्रवाशांतून संताप व्यक्त होता. याबाबत माहिती मिळताच कॉग्रेसचे पदाधिकारी, कार...

कोण होणार चिंचवडचा आमदार...? आज जाहीर होणार

  चिंचवड : सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या चिंचवड आणि कसबा पेठ  पोटनिवडणुकीची आज मतमोजणी पुणे मेट्रो लाईव्ह : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण :  मतमोजणी आज सकाळी 8 वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार असून मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी 1 टेबल असे एकूण 15 टेबल असणार आहेत. 18 पर्यवेक्षक, 18 सहायक आणि 18 सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संगणकीय प्रणालीने सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या टेबलवरील कामकाज त्या कर्मचाऱ्यांना सोपवले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तसेच मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया होईल. टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला टपाली आणि ईटीपीबीएसची मतमोजणी होईल....