पुणे मेट्रो लाईव्ह : रायगड जिल्हा : सुनील पाटील भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मुंबईतील रायगड सहकारी बँकेवर निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे ठेवीदारांना खात्यातून फक्त 15 हजार रुपये काढता येणार आहेत.बँकेच्या रोख मूल्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ठेवीदारांचं आर्थिक हित जपण्यासाठी बँकेवर निर्बंध आणण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, रायगड सहकारी बँकेवरील निर्बंध हे सहा महिन्यांसाठी असतील. बँकेतील बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्याच्या ठेवीधारांना 15 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. रायगड सहकारी बँकेवर निर्बंध लागू केले म्हणजे त्या बँकेचा बँकिंग परवाना रद्द होणार असा त्याचा अर्थ होत नाही असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. बँकेची आर्थिक स्थिती निर्बंधांसह बँकेला बँकिंग व्यवसाय करता येऊ शकेल असेही आरबीआयने म्हटले. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवदेनानुसार, बँकेच्या आर्थिक परिस्थितीनुसार निर्बंधांच्या निर्देशात बदल होऊ शकतात. दरम्यान, आरबीआयने बीड येथील श्री छत्रपती राजर्ष...