Skip to main content

18 बोगस अभियंत्यांना पदोन्नती देण्याचा पुणे महानगरपालिकेचा घाट ; मेगा पद भरतीच्या गडबडीत बोगस अभियंत्यांना नियुक्तीपत्र देण्याचा डाव

पुणे शहर खड्डेग्रस्त, नागरिक त्रस्त पण मनपा प्रशासन बोगस अभियंत्यांच्या प्रमोशनसाठी आग्रही !

आम आदमी पक्षाचे मनपा बाहेर तीव्र आंदोलन


पुणे मेट्रो लाईव्ह ;

संपूर्ण पुणे शहरांमध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झालेली असताना पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग आणि स्थापत्य विभाग हे बोगस अभियंत्यांना पदोन्नती देण्याच्या प्रयत्नांमध्ये व्यस्त आहेत. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची कोणतीही मान्यता नसताना जे आर एन राजस्थान विद्यापीठातून दूरस्थ पद्धतीने अभियांत्रिकी पदविका घेतलेल्या 18 बोगस अभियंत्यांवर फौजदारी कारवाई करण्याऐवजी त्यांच्या पदोन्नतीचा घाट महापालिकेमध्ये घातला जात आहे. सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये मेगा पद भरती चालू असून त्याबाबत होणाऱ्या गोंगाटाचा  फायदा घेऊन निमुटपणे दिनांक 29 जुलै 2022 रोजी डीपीसी ( डिपार्टमेंट प्रमोशन कमिटी) बैठक आयोजित करून या 18 बोगस अभियंता पदोन्नती देण्याचा डाव पुणे महानगरपालिकेमध्ये शिजत आहे. या विरोधामध्ये आज आम आदमी पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या गेट बाहेर तीव्र आंदोलन करून याचा विरोध दर्शविण्यात आला.

जोपर्यंत याबाबत आम आदमी पक्षाने घेतलेला आक्षेपांची पूर्तता होत नाही तोपर्यंत याप्रकरणी डीपीसी बैठक घेण्यात येऊ नये आणि नियुक्तीपत्र देण्यात येऊ नये अशी आम आदमी पक्षाची मागणी आहे. 2015 वर्षीच्या यादीतील 11 बोगस अभियंते, 2018 वर्षीच्या यादीतील 4 बोगस अभियंते, 2019 वर्षीच्या यादीतील 9 बोगस अभियंते आणि 2021 वर्षीच्या यादीतील 18 बोगस अभियंते अशा एकूण 42 बोगस अभियंत्यांची बडतर्फी करून त्यांच्यावर पुणे मनपाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने केली गेली. 

माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि पंजाब - हरयाणा उच्च न्यायालयाने याबाबत दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. 

आंदोलनात आम आदमी पक्षाच्या वतीने राज्य प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे, शहर संघटक एकनाथ ढोले, विद्यानंद नायक, वैशाली डोंगरे, किरण कांबळे, प्रथमेश बेलदरे, रोहन रोकडे, सुजित अग्रवाल, जयश्री डिंबळे, मीरा बीघे, कुमार धोंगडे, किरण कद्रे, अमोल काळे, निरंजन आडागले, सचिन कोतवाल, अशोक हरफळे, नरेंद्र देसाई, माधुरी गायकवाड, फेबियन सॅमसन, दत्तात्रय भांगे, अंजली इंगळे, सुनील वाल्हेकर आणि अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

"संपूर्ण पुणे शहरांमध्ये खड्ड्यांमुळे नागरिकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत असताना पुणे महानगरपालिकेचे प्रशासन पालिकेमधील बोगस अभियंत्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात आहे, ही विद्यानगरी पुणे शहरासाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. पुणे महानगरपालिकेच्या भ्रष्ट प्रशासनामुळेच संपूर्ण शहर खड्ड्यात गेलेले आहे. ठेकेदारांच्या कामाची गुणवत्ता तपासण्याची गुणवत्ता, ज्ञान देखील पालिकेच्या अभियंत्यांमध्ये नाही. भ्रष्ट, अकार्यक्षम, कोणतीही पात्रता नसणारे बोगस अधिकारी जर शहर चालवू लागले तर ती पुणेकरांसाठी धोक्याची घंटा आहे. यातील सर्व 42 बोगस अभियंत्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम आदमी पक्ष या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे", असे मत आपचे राज्य प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे यांनी यावेळी व्यक्त केले.

दिनांक 3 डिसेंबर 2021 रोजी कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदावर पदोन्नतीने नियुक्ती देण्यासाठी प्रारूप सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीचे अवलोकन केले असताना आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते डॉ अभिजीत मोरे यांना असे आढळले की, तब्बल 18 अर्जदार हे पुणे महानगरपालिकेचे पूर्णवेळ कर्मचारी (बिगारी कामगार, लिपिक, आरोग्य निरीक्षक, बत्तीवाला इत्यादी) असून देखील त्यांनी जे आर एन राजस्थान विद्यापीठ येथून अभियांत्रिकी पदविका मिळवल्याचा दावा केला आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या नियमानुसार अभियांत्रिका पदवी अथवा पदवीका हा पूर्णवेळ कोर्स असून कोणत्याही पद्धतीने दुरुस्थ/ऑनलाइन पद्धतीने हे शिक्षण घेता येत नाही आणि त्याला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची परवानगी मिळत नाही. एकाच वेळी पुणे महानगरपालिका आणि जे आर एन राजस्थान विद्यापीठांमध्ये तब्बल दोन वर्ष राहण्याची अद्भुत कला पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना कशी काय अवगत झाली याचे अवलोकन केले असता या सर्व पदविका अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या नियमानुसार बोगस आहेत हे स्पष्ट झाले. याबाबत आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेऊन आणि पुणे महानगरपालिका आयुक्तांना लेखी तक्रार देऊन आक्षेप नोंदवले. तसेच पुणे शहर पोलीस कमिशनर आणि अँटी करप्शन ब्युरो यांचेकडे देखील आम आदमी पक्षाच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे त्यांची पदोन्नतीची प्रक्रिया थांबवण्यात आली. 

जानेवारी 2022 च्या सुरुवातीला याबाबत उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांकरवी चौकशी केली जाईल असे पुणे महानगरपालिकेतर्फे पत्रकारांना कळवले. यासंदर्भातील बातम्या देखील छापून आल्या होत्या. आम आदमी पक्षाचे डॉ अभिजीत मोरे यांच्या तक्रारीनंतर चौकशी करत असलेल्या पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यालयाला देखील "ही अंतर्गत प्रशासकीय बाब असून याबाबत प्रशासन चौकशी करत आहे" असे कारण देत पुणे महानगरपालिकेने पोलिसांच्या कारवाईला विरोध दर्शवला होता. परंतु गेली सात महिने याबाबत कोणतीही प्रगती झाली नाही. आम आदमी पक्षाने याबाबत वारंवार निवेदन देऊन, भेट घेऊन विचारणा केली असता चौकशी चालू आहे असे पालुपद मनपा प्रशासन देत होते. याबाबत चौकशी आदेशाच्या लेखी पत्राची मागणी केली असता ते देखील देण्यास मनपा प्रशासनाने टाळाटाळ केली होती. याबाबत आम आदमी पक्षाने चौकशी केली असता आढळले की, अशा पद्धतीने कोणत्याही माजी न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात आलेली नव्हती. गेले सात महिने या प्रकरणात चौकशीच्या नावाखाली केवळ बनाव रचला जात आहे आणि त्याद्वारे पुणेकरांची, माध्यमांची, शासनाची घोर फसवणूक केली जात आहे. 

आयुक्तांना भेटलेले आप शिष्टमंडळ*: श्री अभिजीत मोरे, श्री विद्यानंद नायक, श्री एकनाथ ढोले, घनशाम मारणे, किरण कद्रे, किरण कांबळे, सुजित अगरवाल, सौ वैशाली डोंगरे, सौ जयश्री  डिंबळे, नरेंद्र देसाई, उमेश बागडे, सुनील वाल्हेकर.

मनपा भवना बाहेर आंदोलनात उपस्थित होते अमोल काळे, माधुरी मठ, ऋषिकेश मारणे, निरंजन आढागळे, अजय पैठणकर, पियुष हिंगणे, अनिल कोंढाळकर, असगर बेग, फेबियन अण्णा सॅमसन, गणेश मोरे, किर्तीसिंग चौधरी, सचिन कोतवाल  संतोष चौधरी, सुभाष जाधव, अशोक हरपळे, रोहन रोकडे, ॲड. दत्तात्रेय भांगे, मिरा भिगे, शिवाजी डोलारे, ॲड. मनोज माने, सतीश यादव, अनिरुद्ध दिवाने, अभिजीत गायकवाड, ऋषी भागवत, धर्मेंद्र डोंगरे, विकास चव्हाण, सुभाष थोरात, रोहित आंधळे, रामभाऊ इंगळे, अंजली इंगळे, समीर आरवडे, ॲड. गणेश थरकुडे, मनोज कदम, प्रशांत फरताडे, संजय कोने, कुमार धोंगडे, शंकर वीर, इरफान रोड्डे, आरती करंजावणे, श्रीकांत आचार्य, शैलेश मोहिते, निलेश वांजळे, रमेश मते, सुशील बोबडे, अनिकेत गागडे, प्रथमेश बेलदरे, शेखर ढगे व हर्शल साळुंखे.

          आजच्या आंदोलनाचे यश

आज रोजी मा. आयुक्त व मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) यांचेसोबत आपले समक्ष झालेल्या चर्चेस अनुसरून पदविकाधारकांचे आक्षेपानुसार दुरुस्थ शिक्षणाद्वारे पदविकाधारकांचे अर्हतेबाबतीत निर्णय करणे आवश्यक असलेने *कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाची दि. २९/०७/२०२२ रोजी आयोजित करण्यात येणारी मा. पदोन्नती समितीची बैठक आक्षेपाचे निराकरण होईपर्यंत रद्द करण्यात येत आहे.

F) आपल्या दि. १०/१२/२०२१, दि. ३०/१२/२०२१ व दि. २५/०७/२०२२ अन्वये केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने दुरुस्थ अभ्यास क्रमाद्वारे *पदविका धारकांचे अर्हतेबाबत कायदेशीर बाबी तपासून आपले उपस्थित मुद्यावर पंधरा दिवसात उचित कार्यवाही करणेत येईल.




Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीर व अवैध व्यवसाय धंदे , लोकांना होणारा त्रास व गुंडगिरीबाबत कठोर कारवाई होणे बाबत पुजारी मळा येथील नागरिकांचे निवेदन.

 संदेश राजाराम हत्तीकर, संतोष राजाराम हत्तीकर,राजाराम हरीबा हत्तीकर व अली खान यांचे वर कारवाई  करण्याची मागणी. पुणे मेट्रो लाईव्ह :  इचलकरंजी  येथील  श्री. संदेश राजाराम हत्तीकर, संतोष राजाराम हत्तीकर,राजाराम हरीबा हत्तीकर व अली खान यांनी पुजारी मळा, वॉ.नं. १७ शिवशक्ती चौक, झपाटे दवाखान्याजवळ, इचलकरंजी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर  पुजारी मळा परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने हत्तीकर यांचे सदर परिसरात दारूच्या बाटल्या स्वच्छ करणेचे केमिकल गोडाऊन असून सदर गोडाऊन मध्ये हत्तीकर कुंटूबिय बेकायदेशीर व्यवसाय धंदे करतात म्हणजेच अनाधिकृत पणे, विनापरवाना व बेकायदेशीर देशी, विदेशी स्वरुपाचे मद्य विक्री करणे तसेच  परिसरात बेकायदेशीर  अवैध जुगार, तीनपानी पत्ते पैसे लावुन खेळणे तसेच अनेक बेकायदेशीर  व्यवसाय,धंदे तसेच लोकांना होणारे त्रास व गुंडगिरीबाबत कठोर कायदेशीर कारवाई  करण्याची मागणी या परिसरातील महिला नागरीक  शांता बाबासाहेब धुमाळ , सरस्वती फाल्गुन पुजारी व पद्मजा  मुरारी नराते चंचंदा भिमराव नराटे. सौ. चंदाकिमराव नरोट ,रेखा संजय मुधाळ...

जामेतुल बनात दारुल फलाह नेहरू नगर पिंपरी का सालाना जलसा कामयाब हर मोहल्ले मे बालिग लडकीयो का मक्तब मुस्लिम समाज की जरूरत ; मुफ्ती रईस कोंढवा

  पुणे मेट्रो लाईव्ह :  अन्वरअली शेख :  पिंपरी चिंचवड ता. 3 नेहरू नगर मे लडकीयो का दिनी मक्तब जिस मे कुरान,उर्दू और इस्लामी तालीम,अदब, तेहजिब की तालीम   देने का  काम मोलाना एहसान फैजी पिछले तीन सालो से अंजाम दे रहे है. आज मुस्लिम समाज की  सब से बडी जरुरत शिक्षा की हे ! इस्लाम धर्म मे शिक्षा,तालीम को बहुत महत्व दिया गया है,  https://youtu.be/10kl07GK6rA इस्लाम धर्म शिक्षा और तालीम के मामले में किसी भी तरह स्त्री और पुरुष मे भेदभाव नही करता हे, मेहमाने खास मुफ्ती रईस कोंडवा ने अपने मुख्य भाषण मे विचार प्रकट कीये. आगे मुफ्ती रईस ने कहा की आज मुस्लिम समाज की सब से बडी जरुरत बडी,बालीग लडकीयो के लिये हर मोहल्ले मे दिनी तालीम देने के लिये मक्तबो का इंताजाम करना बहुत ही जरुरी है,    मोलाना ऐहसान फैजी ने आये हुवे सभी मेहमानो का स्वागत किया, मुख्य मेहमान आमिना जी पानसरे (चाची ) कारी इकबाल उस्मानी, मदरसा फैजुल उलूम दापोडी, हाफीज अन्वरअली देहूरोड मदद फाऊंडेशन आदी मेहमान  कार्यक्रम मे मौजुद रहे,     मक्तब की छोटी बाच्चियो मे अपने इस्ला...

पेठवडगाव : श्री.बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप,संचलित,”कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी.एड) पेठ वडगांव”येथे “एक दिवसीय TET,CTET,TAIT कार्यशाळा” संपन्न

पुणे मेट्रो लाईव्ह : पेठवडगाव : श्री.बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप,संचलित,”कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी.एड) पेठ वडगांव”येथे “एक दिवसीय TET,CTET,TAIT कार्यशाळा” आयोजित केली होती या या कार्यशाळेचे प्रमुख व्याख्याते  प्र.प्राचार्य.श्री.सचिन शिवाजी पाटील(कै.रामराव निकम शिक्षणशास्त्र महाविद्यालय,इंदोली) होते. या कार्यशाळेच्या वेळी कॉलेजच्या प्र.प्राचार्या.सौ.निर्मळे.आर.एल(कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड),पेठ वडगांव) आणि प्र.प्राचार्य.भोसले.एस.एम(इचलकरंजी शिक्षणशास्त्र महाविद्यालय इचलकरंजी) उपस्थित होते.    कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राध्यापक सोरटे एस के यांनी केले.कार्यशाळेमध्ये प्र.प्राचार्या.श्री. सचिन शिवाजी पाटील सरांनी स 'TET,CTET आणि TAIT 'या परीक्षां विषयी  बी.एड.च्या छात्राध्यापकांना मार्गदर्शन केले. परीक्षेच्या वेळी प्रश्न सोडविताना येणाऱ्या अडचणीवर मार्ग कसे काढावेत हे सांगितले.  तसेच प्रश्न सोडवण्याच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना येणाऱ्या शंकांचे निरसन त्यांनी केले.या कार्यक्रमाच्या वेळी प्रा. सोरटे, प्रा. शिरतो...

पुणे : येवलेवाडी येथे 63 वा महाराष्ट्र दिन वर्धापन सोहळा संपन्न

पुणे : येवलेवाडी येथे 63 वा महाराष्ट्र दिन वर्धापन सोहळा संपन्न पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे :  येवलेवाडी येथे आज दिनांक एक मे 2023 रोजी नवजीवन अंध अपंग कल्याण मंडळ संचालित प्रशिक्षण केंद्र येवलेवाडी येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रपती पदक विजेते माननीय श्री प्रकाश पाटील, ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री मुक्तार भाई सय्यद, सोल्जर आय यु फाउंडेशन माननीय श्री. तुषार बाळासाहेब कदम हे सन्माननीय पाहुणे उपस्थित होते.

पूर्व MLA सिमरजीत सिंह बैंस ने अदालत के सामने किया आत्मसमर्पण

 पूर्व विधायक और लोक इंसाफ पार्टी के प्रमुख सिमरजीत सिंह बैंस रेप का आरोप  सिमरजीत सिंह बैंस सहित 6 अन्य लोग भी आरोपी. पुणे मेट्रो लाईव्ह : लुधियाना :  और लोक  पार्टी के प्रमुख सिमरवजीत सिंह बैंस ने अदालत के सामने आत्मसमर्पण कर दिया है। इसकी पुष्टि संयुक्त आयुक्त रावचरण सिंह बराड़ ने की है। बता दें, 10 जुलाई 2021 को थाना डिविजन नंबर 6 पर बैंस और उनके साथियों के खिलाफ मामला दर्ज हुआ था। इस मामले में पीड़ित महिला ने पूर्व विधायक बैंस पर दुष्कर्म करने के आरोप लगाए थे। जिसके बाद बैंस पर धारा 376, 354, 354-A, 506 और 120/B के तहत मामला दर्ज किया गया था।  सिमरजीत की फैक्ट्री में छापेमारी पूर्व विधायक सिमरजीत सिंह बैंस सहित 6 अन्य लोग जिनमें कर्मजीत सिंह बैंस, परमजीत सिहं बैंस, सुखचैन सिंह, प्रदीप कुमार उर्फ गोगी, बलजिंदर कौर और जसबीर कौर आरोपी हैं। कर्मजीत सिंह,  सिमरजीत सिंह बैंस का भाई है जिसे इसी महीने 2 जुलाई को पुलिस ने गिरफ्तार कर लिया था। पुलिस ने कर्मजीत को सिमरजीत की फैक्ट्री में छापेमारी कर पकड़ा था। इस दौरान सिमरजीत सिंह फरार हो गया था।    ...

जल्द ही शिंदे गुट और उद्धव गुट में होगी सुलह: दीपाली

पुणे मेट्रो लाईव्ह : शिवसेना नेता दीपाली सय्यद ने ट्विटर पर बड़ा दावा किया है। उन्होंने कहा है कि जल्द ही शिंदे गुट और उद्धव गुट में सुलह हो जाएगी और इसमें बीजेपी मदद कर रही है। मराठी भाषा में किए गए ट्वीट में दीपाली ने लिखा, ' आने वाले दो दिनों मे उद्धव ठाकरे और एकनाथ शिंदे शिवसैनिकों की भावनाओं का आदर करते हुए पहली बार चर्चा के लिए एक साथ आएंगे, यह जानकर बहुत अच्छा लगा। एकनाथ शिंदे ने शिवसैनिकों की भावना समझी और उद्धव ठाकरेने परिवार के मुखिया होने के नाते ये बात दिल से निभाई, यह स्पष्ट हो गया है। इस मध्यस्थता के लिए भाजपा नेताओं ने मदद की, इसके लिए भी धन्यवाद। चर्चा कहां होगी अब उस जगह का इंतजार रहेगा । शिवसेना के बागी विधायकों ने गुवाहाटी में गुजारा बेहद मुश्किल समय: शिंदे बता दें कि इससे पहले महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने शनिवार को कहा था कि उनके साथ गुवाहाटी गए शिवसेना के बागी विधायकों ने बेहद मुश्किल और तनावपूर्ण समय बिताया। शिंदे ने कहा कि विधायकों ने जब अपने विद्रोह के बाद विभिन्न घटनाओं से संबंधित खबरें टीवी पर देखीं तो वे बेहद तनाव में आ गए और उनका वह समय बेहद ...

बेडकिहाळ येथे डॉ. विक्रम शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त हजारोंच्या उपस्थितीत दिमाखात साजरा

बेडकिहाळ येथील आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद,            शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम. पुणे मेट्रो लाईव्ह :   बेडकिहाळ, ता,१६,  येथील कै बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या  वतीने शुक्रवार (ता १५) रोजी श्रीमती कुसुमावती  मिर्जी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विविध रोग तपासणी शिबिरास बेडकिहाळ सह परिसरातिल नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.        स्वागत शिंगाडे सेवाभावी संस्थेचे  संस्थापक डॉ विक्रम शिंगाडे यांनी केले, तर अजित कांबळे यांनी प्रास्ताविकात शिंगाडे चॅरिटेबलच्या वतीने  वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांनची सविस्तर पणे माहिती करून दिली.   या शिबिरा प्रसंगी  प्रमुख पाहुणे म्हणून  अनुराधा पाटील, पीएसआय (पालघर मुबंई,) डॉ सुनीता पाटील (सांगली )  कृषी पंडित सुरेश देसाई,, डॉ सुरेश कुराडे, (गडहिंग्लज) कारदगा ग्राम पंचायत अध्यक्ष राजू खिचडे, समाजकल्याण आधिकारी जे के पम्मार, आण्णा पाटील, आदी उपस्थीत होते.     उपस्थीत सर्...

शिवसेना पुणे शहर .... रास्ता रोको आंदोलन ... झुकेंगे नही ...

पुणे मेट्रो लाईव्ह : शिवसेना नेते, खा संजय राऊत साहेब यांच्यावर राजकीय सुडाने केंद्र सरकारने ईडी मार्फत कारवाई केली. आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राऊत साहेबांची तपास व चौकशी सुरू होती. पहिली नोटीस दिड महिन्यापूर्वीच दिली, चौकशी केली मग तेव्हाच का अटक केली नाही ? भाजपच्या विरोधात बोलणार त्याच्यावर ईडीची कारवाई.. भाजप मधे प्रवेश केला आणि काहीही गुन्हा असो तरीपण नो कारवाई .. ही कुठली हिटलरशाही ...  पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख बाळा  ओसवाल, डाॅ अमोल देवळेकर, आनंद गोयल, भरत कुंभारकर, विधानसभाप्रमुख अशोक हरणावळ, विशाल धनवडे, राजेंद्र बाबर, उत्तम भुजबळ, अर्जुन जानगवळी, राजेश मोरे, दिलीप पोमण, रूपेश पवार, मारूती ननावरे, चेतन चव्हान, अक्षय माळकर शशिकांत,दिपक घुबे, सचिन जोगदंड, सुरज लोखंडे, गौरव पापळ ,मदन गाडे, नितिन निगडे, सनि गवते, अतुल दिघे, निरंजन कुलकर्णी, अनिकेत थोरात, शंकर साठे, स्वाती कथलकर, श्रुती नाझीरकर, सरोज कारवेकर, रोहीणी कोल्हाळ, सिमा मगर, सलमा भाटकर, सिमा गायकवाड, पद्मा सोरटे, गायत्री गरूड, मुकुंद लालबिगे, अनिल माझिरे, रोहीत सांडभोर,

प्रा सौ प्रमोदिनी माने यांना पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आल

प्रा सौ प्रमोदिनी माने  यांना  पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले  पुणे मेट्रो लाईव्ह : सौ.प्रमोदिनी माने  कोडोली येथे  दिनांक ३१मे रोजी अहिल्या देवी होळकर जयंती निमित्त महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रतेक ग्राम पंचायत मधील दोन कर्तबगार महिलांचा सत्कार आयोजित केला होता .  कोडोली ग्रामपंचातमध्ये प्रा सौ प्रमोदिनी माने मॅडम यांनी तनिष्का ग्राहक पंचायत प्रविणा फोडेंशन या माध्यमातून समाजात महिलांसाठी अहोरात कोणताही मोबदला न घेता स्वखर्चाने सामाजिक कार्याची दखल घेतली व शासनाने जाहीर केलेला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुरस्कार त्यांना मिळाला .  याप्रसंगी ग्रामपंयात सर्व सदस्य सरपंच सौ भारती पाटील ग्रामविकास अधिकारी उपसंरपंच मा श्री प्रविण जाधव . अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात उपस्थीत होत्या या स्वीच्याउपस्थीत प्रा सौ प्रमोदिनि माने मॅडम व सौ शिर्के मॅडम यांना पुरस्कार देण्यात आला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ संध्या पाटील यांचे मार्गदर्शन लाभले माने मॅडम यांनी आपल्या सामाजिक कार्य...