पँथर आर्मी राष्ट्रीय महासचिव संतोष आठवले ( कांबळे ) यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्याचा जाहिर निषेधार्थ उद्या प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने व धरणे आंदोलन
पुणे मेट्रो लाईव्ह :
पँथर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेना राष्ट्रीय महासचिव संतोष एस .आठवले ( कांबळे ) हे त्यांच्या मुळ गावातील ( नवे दानवाड ता . शिरोळ जि. कोल्हापूर ) अवैद्य विषारी गावठी दारू व मटका बंद न झाल्यास ईच्छा मरणाची परवाणगी मिळावी अशी मागणी राज्याचे सन्मानीय मुख्यमंत्री नाम .एकनाथजी शिंदे यांना व आपले सरकार पोर्टल वर दि .3 / 10/2022 रोजी केली होती .ईच्छा मरणाच्या मागणीची दखल स्थानिक प्रशासनाने घेऊन नवे दानवाड गावाती विषारी गावठी हातभट्टी दारु मटका आदी बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्याची भुमिका घेतली होती तसेचे खोट्या ॲट्रॉसिटी गुन्हा नोंद होऊ नये याचीही मागणीचे निवेदन पोलिस अधिक्षक कार्यालय , कोल्हापूर यांच्या कडे दिनांक 27/09/2022 रोजी केली होती .खोट्या ॲट्रॉसिटी बद्दल व गावातील विषारी गावठी हातभट्टी दारू , मटका कायमस्वरुपी बंद व्हावी अन्याथा ईच्छा मरणाची परवाणगी मिळावी या मागणी साठी आंदोलनात्मक भुमिका संतोष आठवले यांनी घेतल्या बद्ल कोल्हापूर जिल्ह्यातील स्वयंघोषित नेता सतिश मधूकर माळगे, कांबळे ( रा. इंद्रजीत कॉलनी ,मणेर मळा उचगांव ता .करवीर जि. कोल्हापूर ) यांच्या ईशारा वर काम करणारा रणजित रावसो कांबळे रा .नवे दानवाड यांनी संतोष आठवले यांना गावातील अवैद्य विषारी गावठी हातभट्टी दारु व मटका बंद का करतो या कारणावरुन रसत्यावर गाडी अडवून लाथा बुक्यांनी मारहाण केली या घटने चा पँथर आर्मी जाहिर निषेध करत आहे
संतोष आठवले ( कांबळे . ) यांच्यावर प्राणघातक हल्ला करावयास लावणारा स्वंय घोषीत जिल्हा नेता सतिष मधूकर माळगे ( रा. उचगांव ता .करर्वार )व त्याला साथ देणारे रावसो कांळीगा कांबळे, रितेश रावसो कांबळे , सुनिल काळीगां कांबळे शुभम सुनिल कांबळ सर्व रा .नवे दानवाड ता . शिरोळ जि. कोल्हापूर यांच्या वर कडक कारवाई करून तात्काळ अटक या मागणीसाठी पँथर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेना शुक्रवार दिनांक 28 /10/ 2022 रोजी इचलकरंजी प्रांत अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने व धरणे आंदोलन करणार आहेत
अशी माहिती दिलीप भोसले शिरोळ तालुका अध्यक्ष यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिले आहे या आंदोलनाचे नेतृत्व सौ . चंदाताई पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष,सौ बानूबी पठाण,कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र ,मुकुंद सनदे जिल्हाध्यक्ष (शहर ),फिरोज मुजावर जिल्हाध्यक्ष ( ग्रामिण )त्रिंबक दातार जिल्हा कार्याध्यक्ष कोल्हापूर ,हरूण मुल्ला जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती कविता कांबळे तालुका अध्यक्षा हातकलंगले हे करणार आहेत
Comments
Post a Comment