Skip to main content

गुरुवाणी हवी, गुरुबाजी नको

 गुरुवाणी हवी, गुरुबाजी नको


पुणे मेट्रो लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी  (९८ ५०८ ३० २९०)


५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी

ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)

prasad.kulkarni65@gmail.com


   सोमवार ता. ३ जुलै २०२३ रोजी गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा आहे.मानवी संस्कृती गुरुचे महत्व नेहमीच अन्यासाधरण राहिलेले आहे. जीवनात मार्गक्रमण करत असताना समस्यांना भिडण्यासह जीवन जगण्याची कला गुरु शिकवत असतात. भारतीय दर्शन परंपरेत आणि संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्च मानलेले आहे. बालकाचे पहिले गुरु हे त्याचे आई-वडील असतात. मात्र त्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक गुरु कारणीभूत ठरत असतो व प्रेरणादायी ठरत असतो. एक चांगला नागरिक बनवण्याचे काम गुरु आपल्या संस्कारातून करत असतात

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा 

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः

अशी गुरुची व्याख्या भारतीय संस्कृतीने केलेली आहे.आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरूंच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्याचा,त्यांच्यापुढे विनम्रतेने नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. कारण महाभारत लिहिणाऱ्या व्यासांचा जन्म या पौर्णिमेलाच झाला होता. 

ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना 'व्यासांचा मागोवा घे तू' असे व्यास ऋषी बद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

आज अनेकजण गुरुची माती सांगणारे लेख लिहितील.ते लिहिलेही गेले पाहिजेत या तीळमात्र शंका नाही.कारण शेवटी व्यक्ती घडवण्यामध्ये गुरु दिशादर्शक ठरत असतात. पण आजच्या वर्तमानात गुरुवाणी पेक्षा गुरुबाजी फार वाढलेली आहे. त्यातून सत्यार्थ प्रकाश मिळत नाही तर ढोंगबाजी दिसून येते. म्हणूनच आपल्या संतांनी या ढोंगीगुरुबाजी बाबत काय म्हटले आहे ते आज समजून घेण्याचा दिवस आहे. तोच खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेचा संदेश ठरेल.

अध्यात्मिक आणि सामाजिक जीवनामध्ये आपल्याकडे गुरुसंस्था परंपरागत अस्तित्वात आहे. हे कार्य असाधारण अथवा दुर्लक्षित करण्यासारखे नाही. तरीही संताना मात्र गुरुबाजीतील अनिष्ट  प्रकारांची चाहूल लागलेली होती. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ 'विवेकसिंधू 'पासून तुकारामांच्या अभंगापर्यंत भौंदूगिरीचा बुरखा फाडणारी अनेक उदाहरणे संत साहित्यात दिसून येतात.ढोंगी गुरुबाजी पासून दूर राहण्याचा संतांचा विचार आजच्या काळात जोपासणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण मोठमोठ्या राष्ट्रीय नेत्यापासून अगदी सर्वसामान्य कामगार वर्गापर्यंत अनेक जण या भोंदू गुरुजींच्या चक्रात गुरफटून गेले आहेत. जीवनाच्या इतर अंगापेक्षा पारंपारिक जीवनात चटकन प्रविष्ट होऊन आयुष्याचे सार्थक करू पाहणाऱ्या अनेक मंडळीत गुरूच्या बाह्य व्यक्तिमत्त्वाने अथवा अन्य गोष्टींच्या देखाव्यामुळे भारावून जाण्याने गुरुच्या पात्रापात्रतेचा विचार करण्याची शक्ती नष्ट झालेली असते. त्यामुळे साधुत्वाचे बाह्य अवडंबर माजवून आपण कोणाचाही उद्धार करायला समर्थ आहोत असे ठामपणे (?) सांगणाऱ्या भोंदू गुरूंचा सुळसुळाट आज समाजात वाढलेला आहे. ही मंडळी सर्वसामान्य माणसाच्या श्रद्धेशी खेळत असतात आणि आपली दुकानदारी चालवत असतात. गावोगाव चालणाऱ्या सप्ताह आणि पारायणापासून टीव्हीच्या अनेक चॅनेल पर्यंत हे सर्वत्र दिसून येते. एकीकडे स्वयंघोषित गुरूंची संख्या वाढत आहे आणि दुसरीकडे सामाजिक बकालपण वाढत आहे.हे दोन्ही एकाच वेळी घडत आहे .अस्वस्थ वर्तमानाचे हेही एक कारण आहे.

संतवाङ्मयात सद्गुरु म्हणजेच महामानव असे सांगितले गेले आहे. आद्य ग्रंथकार मुकुंदराज यांनी विवेकसिंधूत म्हटले आहे की, ज्याच्या ठायी समबुद्धीचा प्रकर्ष झाला आहे त्याला सद्गुरु म्हणावे. संत ज्ञानेश्वरांनी गुरुची योग्यता पासून घ्यावी असे सांगितले आहे. एकनाथांनी तर अशा भोंदू गुरुबाजांवर चांगलाच प्रहार केला आहे. केवळ काढाऊ वृत्ती, धनाचा लोभ आणि स्वतःचे स्तोम माजवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न हीच लक्षणे आजकालच्या तथाकथीत गुरूंमध्ये दिसत असतात.असे हे गुरु स्वतःच चंगळबाज असतात मग त्यांच्यापासून परमार्थ काय शिकणार ? लोभी गुरुपासून घडला तर पारमार्थिक अपघातच घडेल असे सांगताना एकनाथी भागवतात ते म्हणतात,

जे का अपेक्षूनिय वित्त , चतुवर्ण उपदेशीत

ते धनलोभे लोलुप पथ,नाही घेईजेत गुरुत्वे l

जेथ गुरूशिष्य सलोभता, तेथे शिष्याची बुडे विरक्तता

ऐशिया ठायी उपदेश घेता ,परमार्थता अपघात !!

असा परमार्थिक अपघात घडवणाऱ्या ढोंगी गुरुची हजेरी घेताना एकनाथ पुढे म्हणतात ,

अंगा लावूनिया राख, करी भलतेची पाप 

मेळवी शिष्यांचा मेळा,अवघा भांगेचा घोटाळा,

नामा परी सांगे मंत्र ,नेणे विधी अपवित्र

 नकळे ज्ञानाची हातवटी,सदा परदार रहाटी

 एका जनार्दनी सोंग,तेथे नाही पांडुरंग !!

अंगाला राख फासून स्वतःला संन्याशी म्हणवून घेणारी अनेक ढोंगी मंडळी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन सर्वसामान्य माणसाला लुबाडत असतात हे एकनाथांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

एकनाथां प्रमाणेच संत नामदेवानीही  भोंदू गुरुविरोधात लेखणी झिजवली आहे. जगाला सांगे ब्रह्मज्ञान ,आपण कोरडे पाषाण असणारे हे लोक टीपे टोपी माळा असली भक्ती शिकवतात. ही खोटी कर्मकांडी भक्ती म्हणजेच कांचनिक भक्ती आहे असे संत नामदेव म्हणतात.

कांचनिक भक्ती सर्वकाळ करी, बहुतांंचे वैरी हीत नेणें 

लोकांपुढे सांगे आम्ही हरिभक्त,न होय विरक्त स्थिती त्याची !!

असे सांगून संत नामदेव एका अभंगात म्हणतात,


पोटासाठी जरी करी हरीकथा, जन रंजविता फिरतसे 

तेणे केला घात एकोत्तर शतकूळाचा ,पाहुणा यमाचा श्रेष्ठ थोर,

 द्रव्याचीये आशे हरिकथा करी ,तया यमपुरी नित्यवास

  नामा म्हणे ऐसे होते जे रे कोणी, ते नर नयनी पाहू नये !!

संत तुकारामांनी तर अशा गुरूंबाबत ' मुखे सांगे ब्रह्मज्ञान ,जनलोकांची कापितो मान ' असेच म्हटले आहे .

तुकारामांनी अनेक अभंगातून या भोंदुंची चांगलीच रेवडी उडवली आहे. ते म्हणतात,

डोई वाढवले केश, भुते आणीती अंगास

तरी ते नव्हती संतजन ,तेथे नाही आत्मखुण,

मेळवून नरनारी, शकुन सांगती नानापरी

 तुका म्हणे मैंद, नाही त्यापासी गोविंद 

 दया धर्म चित्ती नाही, ते जाणावे भोंदुजन !!

नशेबाजी आणि पोटासाठी चाललेली ही भोंदूगिरी आहे संत तुकाराम म्हणतात.

कली युगी घरोघरी, शब्द झाले फार

 वितभर पोटासाठी, हिंडती दारोदार 

 .......ऐसे  संत जाले कळी ,तोंडी तमाखूची नळी 

 स्नानसंध्या बुडविली , पुढे भांग वोडवली,

 भांग भूर्का हे साधन,पची पडे मद्यपान

 तुका म्हणे अवघे सोंग, तेथे पैसा पांडुरंग !!

भिकेचे डोहाळे लागलेले जुने लागीर वाणी असते असे संत तुकाराम म्हणतात. पोटासाठी गुरुबाजीचा बाजार मांडणारी मंडळी स्वतः अतिशय अज्ञानीअसतात मग त्यांच्याकडून दुसऱ्यांना ज्ञान काय मिळणार? अर्थ न कळणाऱ्या व नुसती घोकंपट्टी अथवा पोपटपंची करणाऱ्यांबद्दल तुकाराम महाराज म्हणतात,

अर्थाविना पाठांतर कासया करावे, व्यर्थ ची मरावे घोकुनिया

 घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे, अर्थरूप राहे होऊनिया

 तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी, नाही तरी गोष्टी बोलू नका !!

तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनीही ढोंगी गुरूंच्या संदर्भात अनेक अभंग लिहिलेले आहेत.बहिणाबाई म्हणतात ,जे गुरु स्वतःच काम,क्रोध, लोभ, द्वेष यांच्या आहारी गेले आहेत ते इतरांना कसले मार्गदर्शन करणार ?ज्यांच्याकडे सदसदविवेक बुद्धी नाही ते इतरांना सुखी कसे ठेवणार ?जे स्वतःच मायेच्या मोहाने ग्रासले आहेत ते इतरांना या मोहपाशातून काय बाहेर काढणार ?

संतांनी असे ढोंगी गुरूबाजी वर कोरडे ओढलेले आहेत .तरीही या समाजात धनलोभी व स्वार्थी असे अनेक विषयासक्त गुरु संतवाणीचे प्रवचन ,कीर्तन आपल्या सोयीनुसार रंगवून सांगताना दिसतात.तसेच भोळ्या भक्तांना पारमार्थिक सुखाचे आमिष दाखवून ज्ञानेश्वरी पासून दासबोधापर्यंतच्या ग्रंथांची पारायणेही करून घेतात. ही पारायणे त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठीच असतात.संतवाङ्मयाचा आशय समजून न घेता आणि संतांच्या चळवळीचा अर्थ न समजल्याने या पारायणातून भक्तांच्याही हाती काही पडत नाही. संतांनी काय सांगितले आणि हे तथाकथित गुरु काय सांगत आहेत याचा विचार शिष्य,अनुयायी मंडळी करतच नाहीत.

ज्ञातेपणाचा आभास निर्माण करणारी ही ढोंग बाजी  समाजाला लागलेली कीड आहे असे म्हणावे लागेल. अशी अनेक ज्ञातेपणाचा आव आणणारी माणसे संतवाणीचे  स्वतःच्या बुद्धीनुसार निरूपण करून माऊली, सद्गुरु, महाराज वगैरे प्रकारची विशेषणा लावून समाजाचे शोषण  करतांना दिसतात .त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. खरे गुरु आपला शिष्य सुद्धा परीक्षेतून पारखून घेतात.तर हे भोंदू गुरु दिसेल त्याला आपला शिष्य करायला स्वतःच धावतात. मारून मुटकुंन शिष्यत्व पत्करायला लावण्याचाच हा प्रकार आहे. असे गुरु एखाद्याची इच्छा नसली अथवा तो दुसऱ्या एखाद्याला गुरु मानत असला तरीही त्याच्यापेक्षा मीच कसा' पावरफुल्ल ' गुरु आहे असे सांगून आपला गंडा बांधण्याचा आग्रह धरतात .त्यामुळे गुरु करायचा असेल तर त्याची निवडही पात्रापात्रतेच्या विचारानेच केली पाहिजे. पूर्वी सरदारांच्या जवळ जसे त्यांचे हुजरे असत तसे या तथाकथित महाराजांजवळ त्यांची शिष्य मंडळी असतात.अशा एकूणच पार्श्वभूमीवर संतांनी आपल्या वाङ्मयातून ढोंगी गुरुबाजीवर हल्ला चढवला. त्यातून आपण कोणता बोध घ्यायचा आणि त्याचा प्रसार व प्रचार कसा करायचा याचा गांभीर्याने विचार करायला हवा. कारण आज अशा गुरूंचे रूप लाखोंच्या संख्येने असलेल्या बैरागी, गोसावी ,जोगी ,साधू ,साध्वी, योगी यांनी घेतलेलेआहे. हे लोक समाजात दारिद्र्य ,आळस ,अज्ञान आणि व्यसने यांची मोठ्या प्रमाणात वाढ करतात.तरीही लोक त्यांच्या आशीर्वाद मागत असतात. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवाणी आणि गुरुबाजी यातील फरक समजून घेण्याची नितांत गरज आहे.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासून कार्यकर्ते आहेत.तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

Comments

Popular posts from this blog

जमीयत उलमा हिंद महाराष्ट्र के अध्यक्ष हजरत मौलाना मुस्तकीम अहसन आजमी साहब का इंतकाल

आजमी साहब की कमी हमेशा मेहसुस होगी ; हाजी गुलजार अध्यक्ष जमीयत पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो लाईव्ह :    अन्वरअली शेख  :  पिंपरी चिंचवड- जमियेत उलमा हिंद  महाराष्ट्र के अध्यक्ष हजरत मौलाना मुस्तकीम अहसन आजमी | साहब का कल  २० जून को सुबह की नमाज से कुछ वक्त पहले इंतकाल हो गया.  जनाजे की नमाज असर के बाद  नारियलवाडी कब्रस्तान मुंबई में अदा की गयी और उसी कब्रस्तान में सुपुर्द खाक किया गया. हजरत मौलाना मुस्तकीम साहब सदर महाराष्ट्र जमीयत के साथ समाजसेवा में ५६ साल से लगे रहे और आप उलेमाये दिन में एक बेहतरीन मुकर्रार थे. आपके पुणे शहर मे कई सफर हुवे हे. जमियेत के लिये आप का बहुत महत्व पूर्ण योगदान रहा है, आप जमीयत उलेमा के प्रोग्राम में २५-३० वर्षो से जुडे रहे. हाजी गुलजार अध्यक्ष पिंपरी चिंचवड जमियेत उलमा ने आपके इंतकाल पर दुख व्यक्त किया है और अल्लाह से दुआ कि है कि मरहूम को जन्नते फिरदौस आला मकाम अता फरमाएं.  

कारण मागे भट नावाचा उभा हिमालय आहे.....

  पुणे मेट्रो लाईव्ह : प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) “उष :काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली “… अशी क्रांतीज्योत मनात पेटवणाऱ्या सुरेश भट यांचा मंगळवार ता. १४ मार्च २०२३ रोजी विसावा स्मृतिदिन आहे.त्यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे झाला .आणि १४ मार्च २००३ रोजी ते नागपुरात कालवश झाले.सुरेश भट हे त्यांच्या मित्रपरिवारात, शिष्य परिवारात आणि साहित्यवर्तुळात” दादा ” या नावाने ओळखले जात असत.अर्थात ते खऱ्या अर्थाने दादा माणूसच होते .मराठी कवितेत त्यांनी दिलेले योगदान अनमोल स्वरूपाचे आहे .मेंदीच्या पानावर, आज गोकुळात रंग ,मलमली तारुण्य माझे, गे माय भू तुझे मी ,आता जगायाचे असे ,तरुण आहे रात्र अजुनी यासारखी शेकडो अजरामर गाणी ,कविता ,भावगीते , पोवाडे त्यांनी लिहिले .पण त्यांची खरी ओळख आहे ती म्हणजे मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती हीच आहे.एखाद्या प्रतिभावंत आणि रसिकमान्य कवीने एखाद्या काव्य प्रकाराबाबत संपूर्ण आयुष्य वाहून घेणे आणि त्यात नव्या पिढ्या निर्माण करण्याचे जिवनध्येयी काम करणे हे फार दुर्मिळ असते.सुरेश भट उर्फ दादा हे त्य...

शिवसेना पुणे शहर .... रास्ता रोको आंदोलन ... झुकेंगे नही ...

पुणे मेट्रो लाईव्ह : शिवसेना नेते, खा संजय राऊत साहेब यांच्यावर राजकीय सुडाने केंद्र सरकारने ईडी मार्फत कारवाई केली. आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राऊत साहेबांची तपास व चौकशी सुरू होती. पहिली नोटीस दिड महिन्यापूर्वीच दिली, चौकशी केली मग तेव्हाच का अटक केली नाही ? भाजपच्या विरोधात बोलणार त्याच्यावर ईडीची कारवाई.. भाजप मधे प्रवेश केला आणि काहीही गुन्हा असो तरीपण नो कारवाई .. ही कुठली हिटलरशाही ...  पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख बाळा  ओसवाल, डाॅ अमोल देवळेकर, आनंद गोयल, भरत कुंभारकर, विधानसभाप्रमुख अशोक हरणावळ, विशाल धनवडे, राजेंद्र बाबर, उत्तम भुजबळ, अर्जुन जानगवळी, राजेश मोरे, दिलीप पोमण, रूपेश पवार, मारूती ननावरे, चेतन चव्हान, अक्षय माळकर शशिकांत,दिपक घुबे, सचिन जोगदंड, सुरज लोखंडे, गौरव पापळ ,मदन गाडे, नितिन निगडे, सनि गवते, अतुल दिघे, निरंजन कुलकर्णी, अनिकेत थोरात, शंकर साठे, स्वाती कथलकर, श्रुती नाझीरकर, सरोज कारवेकर, रोहीणी कोल्हाळ, सिमा मगर, सलमा भाटकर, सिमा गायकवाड, पद्मा सोरटे, गायत्री गरूड, मुकुंद लालबिगे, अनिल माझिरे, रोहीत सांडभोर,

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटची सर्वात मोठी अभिवादन मिरवणूक काढण्यात आली.

  शिवजयंतीदिनाची  अभिवादन मिरवणूक ठरली आहे .एकूण ९ हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे विशेष आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि. १९ फेब्रुवारी  २०२३ रोजी सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष तसेच 'डॉ.पी.ए. इनामदार विद्यापीठा 'चे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. एम.सी.ई सोसायटीचे सचिव प्रा. इरफान शेख , एस.ए. इनामदार, शाहीद इनामदार, वहाब शेख, साबीर शेख , असीफ शेख,शाहीद शेख, बबलू सय्यद,तसेच विश्वस्त, पदाधिकारी, प्राद्यापक -शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सेंटर, गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट, डेक्कन मुस्लीम इन्स्टिट्यूट अॅण्ड लायब्ररी, अवामी महाझ या संस्थांनी सहभाग घेतला.पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थी यांचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी शिवजयंतीदिनाची अभिवादन मिरवणूक ठरली आहे .एकूण...

लेखी पत्र दिल्यानंतर आमरण उपोषण आंदोलन स्थगित

लेखी पत्र दिल्यानंतर आमरण उपोषण आंदोलन स्थगित  पुणे मेट्रो लाईव्ह :  जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची त्रयस्त तपासणी चौकशी करून तपासणीचा अहवाल.पंधरा दिवसांमध्ये  देण्याचे व अहवालामध्ये कामाबाबत काही गंभीर त्रुटी निदर्शनास आलेस ठेकेदारावर निविदा अटी व शर्तीनुसार कारवाई करण्यात येईल असे लेखी पत्र करवीर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष जयसिंगराव कांबळे यांना दिल्यानंतर आमरण उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले यांनी केली .   यावेळी कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष अॅड . मुकुंद सनदे उपस्थित होते या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजय इंगळे, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख  समीर विजापुरे इचलकरंजी महानगर जिल्हा अध्यक्ष त्र्यंबक दातार आधी सहभागी होते

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये योगदिन उत्साहात साजरा

  श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये योगदिन उत्साहात साजरा इचलकरंजी : प्रतिनिधी :   21 जून हा दिवस संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये योगदिन साजरा करण्यात आला.  प्रारंभी मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर यांनी योगदिनाचे महत्त्व विषद केले. यावेळी राज्यस्तरीय योगासनपटू कु. हर्षदा करंबेळकर, कु. शर्वरी माळी व त्यांच्या सहकारी विद्यार्थिनींनी प्रार्थना, सूर्यनमस्कार, योगासने अशा क्रमाने प्रात्यक्षिके करीत उपस्थित मुलींकडून आसने करवून घेतली. यामध्ये प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर तसेच उपप्राचार्य आर. एस. पाटील, पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे, एस. व्ही. पाटील हे सारे स्वतः सहभागी झाले व त्यांनी सर्व योगासनेही केली. काही शिक्षक-शिक्षिकांनीही योगासने केली.  सौ. अर्चना रानडे यांनी कार्यक्रमाला साजेसे गीत सादर केले. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडाविभाग प्रमुख प्रा. शेखर शहा यांच्या नेतृत्वाखाली योगदिन प्रमुख आर. पी. कुलकर्णी यांनी केले.

प्रवाशांची गैरसोय झाल्याने काॅंग्रेसने अधिका-यांना धरले धारेवर

  पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी : प्रतिनिधी :  शासन आपल्या दारी अभियानासाठी आज मुख्यमंत्र्याचा कोल्हापूर दौरा आहे. या कार्यक्रमासाठी इचलकरंजी बसस्थानकातून बहुतांश एसटी बसेस गेल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बसस्थानकात धाव घेऊन अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अधिकार्‍यांनी शासन आदेशानुसार बसेस नियोजित कार्यक्रमासाठी गेल्या असल्या तरी प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतल्याचे सांगितले. शासन अपल्या दारी या अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंगळवारी कोल्हापूर दौर्‍यावर आहेत. त्यामुळे शासन आदेशानुसार इचलकरंजी बसस्थानकातील बहुतांश एसटी बसेस या कार्यक्रमाला नागरीकांना ने- आण करण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज सकाळी 8 वाजल्यापासून बसस्थानकात प्रवाशांची गर्दी दिसत होती. अनेकांनी बसेसबाबत विचारणा केली असता बसेस नसल्याचे सांगण्यात अले. त्यामुळे लांब पल्यावरून आलेले प्रवाशी तसेच इचलकरंजी बसस्थानकातून पुढील प्रवास करण्यासाठी आलेल्या प्रवाशांतून संताप व्यक्त होता. याबाबत माहिती मिळताच कॉग्रेसचे पदाधिकारी, कार...

कोण होणार चिंचवडचा आमदार...? आज जाहीर होणार

  चिंचवड : सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या चिंचवड आणि कसबा पेठ  पोटनिवडणुकीची आज मतमोजणी पुणे मेट्रो लाईव्ह : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण :  मतमोजणी आज सकाळी 8 वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार असून मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी 1 टेबल असे एकूण 15 टेबल असणार आहेत. 18 पर्यवेक्षक, 18 सहायक आणि 18 सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संगणकीय प्रणालीने सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या टेबलवरील कामकाज त्या कर्मचाऱ्यांना सोपवले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तसेच मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया होईल. टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला टपाली आणि ईटीपीबीएसची मतमोजणी होईल....

दि.मुस्लिम को ऑप बँक पुणे शाखा श्रीरामपूर या शाखेचा कार्येक्रम डॉ. पी ए इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली व व्हाइस चेअरमन एस ए इनामदार ,सी ई ओ मोहम्मद शाहिद यांनी यशस्वीरिता पार पाडला

श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला . पुणे मेट्रो लाईव्ह :    पुणे : दि मुस्लिम को  ऑप बँक लि. शाखा श्रीरामपूर या शाखेमध्ये  नुकताच कार्येक्रमचे  संपन्न झाला .  या कार्यक्रमचे अध्यक्ष श्री गणी हाजी शेख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक , ज्येष्ठ वकील बाबा शेख , ज्येष्ठ वकील. युसुफ कादर शेख , नगरसेवक मुख्तार शाह साहेब , सी ए एजाज शेख , सय्यद मोहम्मद  गौस उर्फ बबलू सय्यद (संचालक  दि मुस्लिम को  ऑप बँक ) , अजमत फातिमा इंग्लिश स्कूल संचालक  मुबिन शेख , मतीन शेख व कुरेशी समाजाचे सदर मेहबूब कुरेशी , इंजि. सलीम मणियार , सलीम दस्तगीर , पि एस आय इब्राहीम शेख , इरफान शेख, इम्रान सय्यद आदी उपस्थित होते. या वेळी  श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला . सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रांच मॅनेजर शकील कुरेशी , स्टाफ एजाज सय्यद , वसीम  शेख , साजिद खान या सर्वांनी   विशेष परिश्रम घेतले. श...