Skip to main content

जिल्हा परिषद परिसरात तिरंगा ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे दि.५: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’उपक्रम १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान  राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत कार्यरत स्वयं सहाय्यता समूह, ग्रामसंघ यांच्याद्वारे जिल्हा परिषद परिसरात तिरंगा ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सचिन घाडगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.

       ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’निमित्त घरोघरी तिरंगा फडकवावा यासाठी अनेक ठिकाणी तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात येत आहे. तशी विक्री केंद्रेही विविध ठिकाणी सुरू करण्यात आली आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने बचतगटातील महिला भगिनींनी तिरंगा ध्वज  विक्री उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी या केंद्रावरून ध्वज घ्यावा आणि प्रत्येक घरावर तिरंगा फडकावून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी यावेळी केले. 

      आयुष प्रसाद म्हणाले, जिल्ह्यातील सर्व तालुक्यात महिला बचत गटाच्या माध्यमातून तिरंगा ध्वज  विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ग्रामपंचायत स्तरावरही ग्रामपंचायत तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अंत्योदय तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्याला ध्वज मोफत उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.  गावागावात जनजागृतीही सुरू आहे.  झेंड्यांची सर्वत्र उपलब्धता असण्यासाठी विविध ठिकाणी केंद्रे सुरू होत आहेत.

जिल्हा परिषदेच्या आवारात शिंदवणे ता.हवेली येथील अन्नपूर्णा महिला ग्राम संघाच्यावतीने झेंडा विक्री सुरू आहे. सुरुवातीला १५०० ध्वज विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.


Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीर व अवैध व्यवसाय धंदे , लोकांना होणारा त्रास व गुंडगिरीबाबत कठोर कारवाई होणे बाबत पुजारी मळा येथील नागरिकांचे निवेदन.

 संदेश राजाराम हत्तीकर, संतोष राजाराम हत्तीकर,राजाराम हरीबा हत्तीकर व अली खान यांचे वर कारवाई  करण्याची मागणी. पुणे मेट्रो लाईव्ह :  इचलकरंजी  येथील  श्री. संदेश राजाराम हत्तीकर, संतोष राजाराम हत्तीकर,राजाराम हरीबा हत्तीकर व अली खान यांनी पुजारी मळा, वॉ.नं. १७ शिवशक्ती चौक, झपाटे दवाखान्याजवळ, इचलकरंजी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर  पुजारी मळा परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने हत्तीकर यांचे सदर परिसरात दारूच्या बाटल्या स्वच्छ करणेचे केमिकल गोडाऊन असून सदर गोडाऊन मध्ये हत्तीकर कुंटूबिय बेकायदेशीर व्यवसाय धंदे करतात म्हणजेच अनाधिकृत पणे, विनापरवाना व बेकायदेशीर देशी, विदेशी स्वरुपाचे मद्य विक्री करणे तसेच  परिसरात बेकायदेशीर  अवैध जुगार, तीनपानी पत्ते पैसे लावुन खेळणे तसेच अनेक बेकायदेशीर  व्यवसाय,धंदे तसेच लोकांना होणारे त्रास व गुंडगिरीबाबत कठोर कायदेशीर कारवाई  करण्याची मागणी या परिसरातील महिला नागरीक  शांता बाबासाहेब धुमाळ , सरस्वती फाल्गुन पुजारी व पद्मजा  मुरारी नराते चंचंदा भिमराव नराटे. सौ. चंदाकिमराव नरोट ,रेखा संजय मुधाळ...

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये योगदिन उत्साहात साजरा

  श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये योगदिन उत्साहात साजरा इचलकरंजी : प्रतिनिधी :   21 जून हा दिवस संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये योगदिन साजरा करण्यात आला.  प्रारंभी मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर यांनी योगदिनाचे महत्त्व विषद केले. यावेळी राज्यस्तरीय योगासनपटू कु. हर्षदा करंबेळकर, कु. शर्वरी माळी व त्यांच्या सहकारी विद्यार्थिनींनी प्रार्थना, सूर्यनमस्कार, योगासने अशा क्रमाने प्रात्यक्षिके करीत उपस्थित मुलींकडून आसने करवून घेतली. यामध्ये प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर तसेच उपप्राचार्य आर. एस. पाटील, पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे, एस. व्ही. पाटील हे सारे स्वतः सहभागी झाले व त्यांनी सर्व योगासनेही केली. काही शिक्षक-शिक्षिकांनीही योगासने केली.  सौ. अर्चना रानडे यांनी कार्यक्रमाला साजेसे गीत सादर केले. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडाविभाग प्रमुख प्रा. शेखर शहा यांच्या नेतृत्वाखाली योगदिन प्रमुख आर. पी. कुलकर्णी यांनी केले.

प्रा सौ प्रमोदिनी माने यांना पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आल

प्रा सौ प्रमोदिनी माने  यांना  पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले  पुणे मेट्रो लाईव्ह : सौ.प्रमोदिनी माने  कोडोली येथे  दिनांक ३१मे रोजी अहिल्या देवी होळकर जयंती निमित्त महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रतेक ग्राम पंचायत मधील दोन कर्तबगार महिलांचा सत्कार आयोजित केला होता .  कोडोली ग्रामपंचातमध्ये प्रा सौ प्रमोदिनी माने मॅडम यांनी तनिष्का ग्राहक पंचायत प्रविणा फोडेंशन या माध्यमातून समाजात महिलांसाठी अहोरात कोणताही मोबदला न घेता स्वखर्चाने सामाजिक कार्याची दखल घेतली व शासनाने जाहीर केलेला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर पुरस्कार त्यांना मिळाला .  याप्रसंगी ग्रामपंयात सर्व सदस्य सरपंच सौ भारती पाटील ग्रामविकास अधिकारी उपसंरपंच मा श्री प्रविण जाधव . अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात उपस्थीत होत्या या स्वीच्याउपस्थीत प्रा सौ प्रमोदिनि माने मॅडम व सौ शिर्के मॅडम यांना पुरस्कार देण्यात आला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ संध्या पाटील यांचे मार्गदर्शन लाभले माने मॅडम यांनी आपल्या सामाजिक कार्य...

निसर्ग कन्या अशी उपाधी मिळवणारी कु.अभिज्ञा वयाच्या अवघ्या सात व्या वर्षी निसर्ग प्रति...

 " अभिज्ञा  म्हणाली बाबा म्हणून मोठया प्रमाणात झाडं लावली पाहिजे"            कव्हर स्टोरी....       एका लहान मुलीची पर्यावरणाच्या  प्रती उत्तम कामगिरी अन्वरअली शेख पुणे मेट्रो लाईव्ह  देहूरोड दि.६ निसर्ग कन्या अशी उपाधी मिळवणारी कु.अभिज्ञा वयाच्या अवघ्या सात व्या वर्षी निसर्ग प्रति प्रेम भावना व निसर्ग निर्मितीच्या महान कार्यात मग्न अशी ही देहूरोड शहराच्या केंद्रीय विद्यालय नंबर १.तिसरी  मध्य शिकत असताना पर्यावरणाची काळजी घेतली आणि पर्यावरण संवर्धन, निसर्ग रक्षणाच्या बाबतीत,तेसच मानवतेच्या दृष्टीकोनातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तिला (नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थने ) कार्याची दखल घेऊन कु.अभिज्ञा पंकज तंतरपाळे यांना संस्थच्या वतीने प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले आहे.   कु अभिज्ञा ची निसर्ग प्रति प्रेमाची कहाणी मागील दोन वर्षांपूर्वी जन्माला आली संपूर्ण जग कोरोना या भयंकर महामारी-शी झुंजत होता भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली होती,अनेक निष्पाप लोकं या आजारा मुळे मरण पावले,र...

पुणे : येवलेवाडी येथे 63 वा महाराष्ट्र दिन वर्धापन सोहळा संपन्न

पुणे : येवलेवाडी येथे 63 वा महाराष्ट्र दिन वर्धापन सोहळा संपन्न पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे :  येवलेवाडी येथे आज दिनांक एक मे 2023 रोजी नवजीवन अंध अपंग कल्याण मंडळ संचालित प्रशिक्षण केंद्र येवलेवाडी येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रपती पदक विजेते माननीय श्री प्रकाश पाटील, ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री मुक्तार भाई सय्यद, सोल्जर आय यु फाउंडेशन माननीय श्री. तुषार बाळासाहेब कदम हे सन्माननीय पाहुणे उपस्थित होते.

प्रवाशांची गैरसोय झाल्याने काॅंग्रेसने अधिका-यांना धरले धारेवर

  पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी : प्रतिनिधी :  शासन आपल्या दारी अभियानासाठी आज मुख्यमंत्र्याचा कोल्हापूर दौरा आहे. या कार्यक्रमासाठी इचलकरंजी बसस्थानकातून बहुतांश एसटी बसेस गेल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बसस्थानकात धाव घेऊन अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अधिकार्‍यांनी शासन आदेशानुसार बसेस नियोजित कार्यक्रमासाठी गेल्या असल्या तरी प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतल्याचे सांगितले. शासन अपल्या दारी या अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंगळवारी कोल्हापूर दौर्‍यावर आहेत. त्यामुळे शासन आदेशानुसार इचलकरंजी बसस्थानकातील बहुतांश एसटी बसेस या कार्यक्रमाला नागरीकांना ने- आण करण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज सकाळी 8 वाजल्यापासून बसस्थानकात प्रवाशांची गर्दी दिसत होती. अनेकांनी बसेसबाबत विचारणा केली असता बसेस नसल्याचे सांगण्यात अले. त्यामुळे लांब पल्यावरून आलेले प्रवाशी तसेच इचलकरंजी बसस्थानकातून पुढील प्रवास करण्यासाठी आलेल्या प्रवाशांतून संताप व्यक्त होता. याबाबत माहिती मिळताच कॉग्रेसचे पदाधिकारी, कार...

मराठा हायकर्सतर्फे पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहिम

पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी येथील मराठा हायकर्स यांच्यावतीने 16 व 17 जुलै रोजी राजस्तरीय शिवयोद्धा पावनभूमी म्हणून पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहिम आयोजित केली आहे. साधारण या मोहिमेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 400 च्या आसपास मोहिमवीर सामील होतील असा विश्‍वास आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी मराठा हायकर्स ऑफीस गांधी पुतळा, मंगळवार पेठ, चौंडेश्‍वरी मंदीर यांचेशी संपर्क साधावा. इच्छुकांनी 10 जुलैपर्यंत फॉर्म भरुन देणेचे  आहे.  तसेच युवती, महिलांकरिता स्वतंत्र सोय आहे. महिला प्रमुख म्हणून सौ. शितल जाधव, सौ. मनिषा खेुबुडे असून मोहीम प्रमुख म्हणून पंढरीनाथ फाटक, आनंदा थोरवत, खेबुडे, सागर जाधव आहेत. या मोहिमेत सहभागी होणार्‍या 15 वर्षाखालील मुला-मुलींनी पालकांची लेखी संमती घेऊनच फॉर्म भरणेचे आहेत. इतिहासाची जागृती तसेच निसर्गातील विविधतेची ओळख व्हावी या जाणिवेतून इचलकरंजीतील काही जाणकार मंडळी व युवकांनी मागील 29 वर्षापासून विविध गड, किल्ले, सागरी किनारा, जंगल ट्रॅक आयोजन केले जात आहे. गेले वर्षभरात त्यांनी रायरेश्‍वर, रांगणा, वासोटा किल्ला, तसेच दाजीपूर जंगल ट्रॅक, गणपतीपुळे ते रत्...

जमीयत उलमा हिंद महाराष्ट्र के अध्यक्ष हजरत मौलाना मुस्तकीम अहसन आजमी साहब का इंतकाल

आजमी साहब की कमी हमेशा मेहसुस होगी ; हाजी गुलजार अध्यक्ष जमीयत पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो लाईव्ह :    अन्वरअली शेख  :  पिंपरी चिंचवड- जमियेत उलमा हिंद  महाराष्ट्र के अध्यक्ष हजरत मौलाना मुस्तकीम अहसन आजमी | साहब का कल  २० जून को सुबह की नमाज से कुछ वक्त पहले इंतकाल हो गया.  जनाजे की नमाज असर के बाद  नारियलवाडी कब्रस्तान मुंबई में अदा की गयी और उसी कब्रस्तान में सुपुर्द खाक किया गया. हजरत मौलाना मुस्तकीम साहब सदर महाराष्ट्र जमीयत के साथ समाजसेवा में ५६ साल से लगे रहे और आप उलेमाये दिन में एक बेहतरीन मुकर्रार थे. आपके पुणे शहर मे कई सफर हुवे हे. जमियेत के लिये आप का बहुत महत्व पूर्ण योगदान रहा है, आप जमीयत उलेमा के प्रोग्राम में २५-३० वर्षो से जुडे रहे. हाजी गुलजार अध्यक्ष पिंपरी चिंचवड जमियेत उलमा ने आपके इंतकाल पर दुख व्यक्त किया है और अल्लाह से दुआ कि है कि मरहूम को जन्नते फिरदौस आला मकाम अता फरमाएं.  

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटची सर्वात मोठी अभिवादन मिरवणूक काढण्यात आली.

  शिवजयंतीदिनाची  अभिवादन मिरवणूक ठरली आहे .एकूण ९ हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे विशेष आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि. १९ फेब्रुवारी  २०२३ रोजी सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष तसेच 'डॉ.पी.ए. इनामदार विद्यापीठा 'चे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. एम.सी.ई सोसायटीचे सचिव प्रा. इरफान शेख , एस.ए. इनामदार, शाहीद इनामदार, वहाब शेख, साबीर शेख , असीफ शेख,शाहीद शेख, बबलू सय्यद,तसेच विश्वस्त, पदाधिकारी, प्राद्यापक -शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सेंटर, गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट, डेक्कन मुस्लीम इन्स्टिट्यूट अॅण्ड लायब्ररी, अवामी महाझ या संस्थांनी सहभाग घेतला.पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थी यांचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी शिवजयंतीदिनाची अभिवादन मिरवणूक ठरली आहे .एकूण...