बेडकिहाळ येथे प्रभाग ७ ८ व ९ येथे विकास कामाना प्रारंभ.
गोपाळदादाचे स्वप्नपूर्ती होणारच .
पुणे मेट्रो लाईव्ह :
बेडकिहाळ, ता,20- ग्राम पंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून प्रभाग क्रमांक ७, ८, व ९ येथे मूलभूत सार्वजनिक सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने सीसी गटार योजनेसाठी २१ लाख व सिद्धार्थ नगर भागात जल शुद्धीकरण घटक कामासाठी ३ लाख ४० हजाराचा भरीव निधी तरतूद करण्यात आला असून या कानांचा शुभारंभ रविवार (ता १९) रोजी सिद्धार्थ नगर परिसरात युवा नेते दत्तकुमार पाटील, कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे सहकार्यदर्शी प्रमोदकुमार पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
जेसीबी यंत्राचे पूजन ग्राम पंचायतीच्या अध्यक्षा सविता पाटील, उपाध्यक्षा महादेवी यादव, सदस्या विद्या देसाई, सुवर्णा बत्ते, आशामा मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले तर जेष्ठ कार्यकर्ते ग्राम पंचायत माजी अध्यक्ष शंकर पाटील, युवा नेते ग्राम पंचायत सदस्य दत्तकुमार पाटील, तालुका पंचायत माजी सदस्य चांद मुल्ला, ताजुद्दिन मुल्ला, अण्णासाहेब नलवडे, दादासो पाटील, विक्रम शिंगाडे, यांनी या कामास चालना दिली.
या वेळी प्रमोदकुमार पाटील बोलताना म्हणाले दिवंगत जेष्ठ नेते गोपाळदादा पाटील यांच्या ग्राम विकास कार्याच्या स्वप्न पूर्तीसाठी आम्ही ग्राम पंचायतीच्या माध्यमातून सिद्धार्थ नगर परिसरातील गल्लोगल्लीतुन सीसी गटार योजना, त्याच बरोबर सार्वजनिक शौचालये, जल शुद्धीकरण घटक व रस्ते या कामना प्राधान्य देत आहोत. या साठी आम्हला माजी आमदार काकासाहेब पाटील, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर , विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, यांचे सहकार्य सतत राहणार आहे.
या वेळी ग्राम पंचायत अध्यक्षा सविता पाटील, सदस्य जीवन यादव यांनी हि आपले मनोगत व्यक्त करून आपण सर्वानी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून गांवचा विकास साध्य करू असे सांगितले.
या प्रसंगी ग्राम पंचायत सदस्य संजय पाटील, शिवानंद बिजले, यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब पाटील, पुरुषोत्तम भोजे पाटील, महेश सोनावणे, बालेचंद मुल्ला, हसन मुल्ला, मज्जीद मुल्ला, संजय देसाई, प्रकाश यादव, नारायण माळगे, अभिजित निकम, यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment