क्राईम न्यूज : भोसरीत पिस्टल विक्री साठी आलेल्या गुन्हेगाराला शिताफीने सापळ्यात जेरबंद त्याच्या ताब्यातून चार गावठी पिस्तूल व चार जीवंत राऊंड हस्तगत
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अकुंश शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे त्यांच्या सहकाऱ्यांची धाडसी कामगिरी
पुणे मेट्रो लाईव्ह
अन्वरअली शेख
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय शस्त्र विरोधी पथकातील पो.काॅ. प्रवीण मुळीक यांना गुप्त बातमीदारा कडुन इंद्रायणी नगर एमआयडीसी भोसरी या ठिकाणी एक गुन्हेगार पिस्तूल विक्री साठी येणार असल्याचे खबर मिळाली. प्रवीण मुळीक यांनी ती खबर शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांना सांगताच पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी त्यांचे पथकातील सहकारी पोलीस उप निरीक्षक बी. आर.गोसावी, पो.हे. काॅ. गवारी, पो.काॅ. मुळुक,पो.काॅ शेळके व सहकारी पथकाने तातडीने त्या ठिकाणी सापळा रचला. त्या सापळ्यात पिस्तूल विक्री साठी आलेला गुन्हे गाराला शिताफीने सापळ्यात जेरबंद केले.
चौकशीत त्या गुन्हेगाराने नाव वेदांत विलास माने वय वर्ष २५रा.साईधाम रूग्णालय मागे लांडेवाडी भोसरी असे सांगितले. त्याची अंग झडती घेतली असता अंग झडतीत कमरेला एक लपविलेला गावठी पोस्टल त्याचे पाठीवरील बॅगेत तीन गावठी पीस्टल चार जीवंत राऊंड असा १०२१०० रू मुद्देमाल मिळुन आला. पुढील पोलीस कारवाई साठी गुन्हेगार वेदांत माने याला भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. सदरची शिताफीची कारवाई पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, सहा.पोलीस उप आयुक्त पद्माकर घनवट, या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, पोलीस उप निरीक्षक बी. आर.गोसावी, सहाय्यक फौजदार लखनकुमार वाव्हळे,सहाय्यक फौजदार शिंदे, पो.हे . काॅ प्रीतम वाघ,पो. हे.काॅ.गवारी,पो.हे. काॅ. शेख,पो.काॅ. मुळुक, पो.काॅ शेळके, पो.काॅ अत्तार, सायबर गुन्हे शाखेचे पो.काॅ माळी यांनी कामगिरी केली.

Comments
Post a Comment