Skip to main content

Posts

दौंड मध्ये मो. पैगंबर जयंती..साजरी करण्यात आली.

विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे मेट्रो लाईव्ह :   दौंड. : शाही आलमगीर मशीद येथे कब्रस्तान कमिटीच्या वतीने, शहरातील मदरसा, मशिदींमध्ये धार्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छोटीशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. धार्मिक शिक्षणामध्ये त्यांना शिकविल्या जाणाऱ्या शिक्षणाचे सादरीकरण यावेळी विद्यार्थ्यांनी केले.  या धार्मिक उपक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.  या कार्यक्रमाचे आयोजन कुमेल कुरेशी, राजू सय्यद, जहूर शेख, रियाज सय्यद, सैदू शेख, फैयाज सय्यद, वाहिद सय्यद, मुसा शेख, असरत शेख या सर्वांनी केले.

कुरान का संदेश धरती के समस्थ मानव जातिके हित मे प्यार समता बंधुता और भलाई के लिये

    पुणे मेट्रो लाईव्ह   अन्वरअली शेख पिंपरी चिंचवड़ दापोडी जमीयत उलमा हिंद दापोडी के तरफ से "कुरान मानवता के लिए प्रेम का एक दिव्य संदेश है" इस विषय पर एक व्याख्यान का आयोजन किया गया था जो मदरसा फैजुल उलूम और इकरा इंग्लिश स्कूल द्वारा आयोजित किया गया था।  हाजी गुलजार  अध्यक्ष जमीयत उलमा हिंद पिंपरी चिंचवड़ इस कार्यक्रम  में उपस्थित थे और कारी इदरीस जमीयत उल्मा हिंद पुणे जिला प्रदेश अध्यक्ष ने अपने ख्यालात का इजहार करते हूवे कहा कि आज मुस्लिम समुदाय को शिक्षा की जरूरत है, हम अपने घरों में छोटे और बड़े आयोजनों पर बहुत पैसा खर्च करते हैं. और जन्मदिन आदि पर खर्च से  बचकर बच्चों की पढ़ाई के लिए बचत करने की जरूरत है,  मौलाना अब्दुल शकूर ने कुराण पर  व्याख्यान देते समय काहा कुरान मानवता के प्रति प्रेम का संदेश है, मौलाना ने आगे कहा कि कुरान प्रेम, करुणा, समानता, भाईचारे और दया का एक दिव्य पैगाम है . जो सिर्फ  मुसलमानों के लिये ही नही बल्कि समस्थ विश्व के मानव जाती के कल्याण के लिए है। दापोडी के हिंदू समुदाय के गणमान्य व्यक्तियों, कार्यकर्...

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण

  शहराच्या विकासासाठी  लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील. पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : पाषाण-सूसला जोडणारा उड्डाणपूल हा हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्कच्या बाजूला होणाऱ्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार असून वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास बऱ्याच अंशी मदत होईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. शहराच्या विकासासाठी  लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.  राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर पुणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण  मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विलास कानडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेते गणेश बीडकर आदी उपस्थित होते.  चांदणी...

एड. अयुब शेख यांची अल्पसंख्याक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी फेर निवड .

पुणे मेट्रो लाईव्ह :   पुणे : लोणावळा येथे आरपीआय ( अ ) गटाची  महाराष्ट्राची  कार्यकारणीची मीटिंग संपन्न झाली . मीटिंग मध्ये मागील पाच वर्षांमध्ये सर्व स्तरावरील कामाचा आढावा घेण्यात आला . एड. अयुब शेख यांनी मागील पाच वर्षांमध्ये सामाजिक , शैक्षणिक , व राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले आहे , त्याचीच दखल घेऊन आरपीआय ( अ ) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदास आठवले यांनी अल्पसंख्याक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी  फेर निवड करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले .  त्यांच्या या निवडीने एड.अय्युब शेख यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. या बाबत एड.अय्युब शेख यांचे एम सी ई सोसायटीचे चेअरमन  डॉ. पी ए इनामदार यांनी  अभिनंदन केले .

अवामी महाज, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, दि मुस्लिम कॉ. ऑपरेटीव्ह बँक लि. पुणे तर्फे पाणी बॉटल वाटप करण्यात आले.

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे :  अवामी महाज,  महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, दि मुस्लिम कॉ. ऑपरेटीव्ह बँक लि. पुणे तर्फे पाणी बॉटल वाटप करण्यात आले.   या कार्यक्रमाचे संयोजक मुशकुर अहमद शेख , फिरोज चांद खान , मोहम्मद गौस ( बबलू सय्यद )  रऊफ कुरेशी ,  उमर शरीफ मोहम्मद शेख ( बबलू ) .  या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती  इकबाल अन्सारी , इसाकभाई चावीवाले , वहाब मणियार ,वाहीद बियाबानी,  इकबाल शेख , यासीन शेख ,  इकबाल तांबोळी , खलील  खान , युसुफ शेख,  आरिफ सय्यद , हाजी इम्तियाज शाबिर शेख  , जमीर सय्यद ,  हारून सय्यद , इलियास शेख (इल्लू भाई )  साजिद खान पठाण  होते .  या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी ए इनामदार यांचे शुभ हस्ते दहा हजार पाणी बॉटल वाटप करून  मंडळाचा सत्कार सुद्धा करण्यात आला

नोंदणी भवनसाठी नवीन प्रशासकीय इमारती शेजारील जागा देण्यास शासनाने मान्यता दिली.

पुणे मेट्रो लाईव्ह : राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाचा विभाग असलेल्या नोंदणी व मुद्रांक विभागाला आता हक्काची इमारत मिळणार आहे. विधानभवनासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीच्या शेजारील जागेत राज्याचे “नोंदणी व मुद्रांक भवन’ उभारले जाणार आहे. नोंदणी व मुद्रांक भवनाची इमारत आठ मजली असून, 5 हजार 100 चौरस मीटर इतके बांधकाम आहे. ही इमारत पर्यावरणपूरक असून, 18 महिन्यांत बांधकाम पूर्ण होणार आहे. शुक्रवारी (दि. 2) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. पुणे : नोंदणी व मुद्रांक विभाग हा शासनाचा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाकडे जमा होणाऱ्या महसुलावरून राज्याच्या विकास कामांना निधी मिळतो. मागील आर्थिक वर्षात नोंदणी विभागाने सुमारे 35 हजार कोटींचा महसूल शासनाला जमा करून दिला होता. मागील अनेक वर्षांपासून नोंदणी भवन साकारण्याचे प्रयत्न सुरु होते. मागील दोन वर्षांत या विषयाला अधिक गती मिळाली आणि नोंदणी भवनसाठी नवीन प्रशासकीय इमारती शेजारील जागा देण्यास शासनाने मान्यता दिली. नोंदणी महानिरीक्षक यांचे कार्यालय सुर...

मार्केट यार्डातील शिवनेरी रस्त्यावर होणारी कोंडी सोडविण्यात बाजार समिती आणि महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला यश

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : सणासुदीत  मार्केट यार्डातील शिवनेरी रस्त्यावर होणारी कोंडी सोडविण्यात बाजार समिती आणि महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला यश आले. गजबजलेल्या शिवनेरी रस्त्यावर दुतर्फा बेकायदा किरकोळ व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच दिवाळीत मार्केट यार्डातील शिवनेरी रस्त्यावर फुले, पूजा साहित्य विक्री करणारे विक्रेते ठाण मांडतात. किरकोळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे शिवनेरी रस्त्यावर कोंडी होती. सातारा रस्त्यावरील उत्सव हॉटेल चौक ते मार्केट यार्डातील मुख्य प्रवेशद्वारापर्यंत ठिकठिकाणी कोंडी होती. बाजारात खरेदीसाठी आलेल्या खरेदीदारांना कोंडीत अडकून पडावे लागते. शिवनेरी रस्त्यावरील अतिक्रमणांवर बाजार समिती आणि महापालिका प्रशासनाने यापूर्वी कारवाई केली होती. कारवाईत सातत्य ठेवल्याने यंदा गणेशोत्सवात शिवनेरी रस्त्यावरील कोंडी सोडविण्यात यश आले, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली. उत्सव हॉटेल ते मार्केट यार्डातील टपाल कार्यालय चौकापर्यंत वाहनचालकांना सणासुदीच्या काळात ...

गणपती विसर्जनापर्यंत वाहतूक व्यवस्थेत दहा दिवस तर काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला

पुणे मेट्रो लाईव्ह : पूणे : शहराचा  वैभवशाली गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्यासह देशातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यात करोनामुळे दोन वर्षे बाप्पाचा उत्सव झाला नाही. त्यामुळे यंदाचा उत्सव धुमधडाक्‍यात साजरा होणार हे निश्‍चित. त्यातच भाविकांची मोठी गर्दी शहरात होणार. यापूर्वी शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्‍वभुमीवर सुरक्षेची उपाययोजना तसेच वाहतूक कोंडी यामुळे विविध रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. दि.एक सप्टेंबरपासून गणपती विसर्जनापर्यंत वाहतूक व्यवस्थेत दहा दिवस तर काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. तात्पुरत्या स्वरूपातील बदल दुपारी तीन ते गर्दी संपेपर्यंत हा बदल राहिल. तात्पुरत्या स्वरूपातील वाहतूक बदल : शिवाजीनगरवरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी – स. गो. बर्वे चौक-जे. एम. रोड-अलका चौक-टिळक रोड किंवा शास्त्री रोडचा वापर करावा किंवा सिमला चौक-कामगार पुतळा चौक- शाहीर अमर शेख चौक – बोल्हाई चौक मार्गे नेहरु रोडचा वापर करुन स्वारगेटकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा. गर्दीची परिस्थीती पाहून पीएमपीएमएल बसेस या वरीलप्रमाणे वळविण्यात येतील. चा...

कोंढवा भागातील त्रस्त नागरीक थेट आमदार यांच्या निवासस्थानी पोहचले

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : गेल्या अनेक वर्षा पासून रखडलेला मुद्दा सर्वे नंबर ४२ व आशीर्वाद बिल्डींग येथील डिपी रोड तसेच मार्केट यार्ड ते कोंढवा येथील डिपी रोड तसेच रोडवरील घरमालकांचे पुन्नरवसन या बाबत हडपसर मतदार संघाचे आमदार मा चेतनदादा तुपे यांना भेटण्याकरीता थेट पोहचले.यावेली मा आमदार साहेबांनी जवल जवल तासभर चर्चा केली यामध्ये हज हाऊस पासून ते ओटा मार्केट, प्रसुतीगृह,लायब्ररी पर्यन्त विस्तृत चर्चा झाली येथील माजी नगरसेवक/नगरसेवीका यांच्या कार्याचा आढावा देखील या वेली घेण्यात आला.यावेली नागरीकांची नाराजी उघडपणे मा आमदार समोर जेष्ठ समाजसेवक इब्राहिम शेख यांनी मांडली.इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप तर्फे असलम इसाक बागवान यांनी तर रहमत सोशलफौडेशन तर्फे अब्दुल बागवान यांनी विविध समस्या मांडल्या.जर राज्य सरकार आम्हाला निधी देतच नसेल तर आम्हि सरकार विरोधात असहकार चलवल उभी करू असे असलम इसाक बागवान यांनी सांगीतले.चर्चा खूपच यशस्वी झाली,बरेच नेते फक्त आश्वासन देतात परंतू मी कोंढव्याभागातील समस्या सोडविण्याकरीता पुर्ण प्रयत्न करील अशी ग्वाहि यावेली मा आमदार साहेबांनी दिली. यावेली उपस्थीत कोंढवा भाग...

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार वाहनाच्या नंबरप्लेटवर क्रमांक लिहिणे बंधनकारक ,

नंबरप्लेटवर क्रमांक न टाकता पोलीस, पत्रकार अथवा पक्षाचे चिन्ह टाकतात. अशा वाहनांवर पुणे वाहतूक पोलीसांची कारवाई  करण्यात येत आहे. पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे :   वाहनांच्या नंबरप्लेट आणि वाहनावर दादा, मामा, पोलीस, पत्रकार असे लिहिल्यास मोटर वाहन कायद्यानुसार अशा वाहनधारकांवर पोलीस दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. तसेच, अनेक जण नंबरप्लेटवर क्रमांकाव्यतिरिक्त दादा, नाना, काका यांसह पोलीस, पत्रकार, व्हीआयपी असे देखील लिहितात. मात्र, शासनाने निर्देशित केलेल्या क्रमांका शिवाय वाहनावर काहीही लिहिणे हा अपराध आहे. तरीदेखील सर्रास अशी वाहने आपल्याला सर्वत्र फिरताना दिसतात. मात्र, आता शहर वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर सध्या कारवाई करण्यात येत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार वाहनाच्या नंबरप्लेटवर क्रमांक लिहिणे बंधनकारक आहे. अनेक जण विशिष्ट प्रकारचे क्रमांक घेऊन नंबरप्लेटवर दादा, मामा, काका असे लिहितात. तसेच, नंबरप्लेटवर क्रमांक न टाकता पोलीस, पत्रकार अथवा पक्षाचे चिन्ह टाकतात. अशा वाहनांवर पुणे वाहतूक पोलीस कारवाई करीत असून, पहिल्यांदा पकडल्यावर 500 आणि दुसर्‍यांदा त्याच ...