पुणे मेट्रो लाईव्ह
अन्वरअली शेख :
पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि बारामती येथे तीन आसनी रिक्षांची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
काही वृत्तपत्रामध्ये, डिजिटल मीडियावर पुणेकरांच्या खिशाला कात्रण या प्रकारे वृत्त प्रसारित झाले आहेत तर त्यावर प्रतिक्रिया देत एका रिक्षावाल्याने प्रश्न उपस्थित केला की रिक्षावाल्यांच्या भाड्यामध्ये किंचित वाढ होत आहे त्या वाढीबाबतही जर कुणाच्या डोळ्यात खुपत असेल असेल तर हे दुर्दैवच, हल्ली महागाई आभाळाला शिवत असताना रिक्षावाल्यांच्या भाड्यामध्ये किंचित वाढ झाली आहे परंतु हेही आनंददायी आहे.
नवे दर 1 ऑगस्टपासून लागू होणार असून, ज्या रिक्षा 1 ऑगस्टपासून मीटर पून:प्रमाणीकरण (meter callibaration) करून घेतील त्या रिक्षा चालकांनाच नव्याने भाडेवाढ घेण्याचा अधिकार असणार आहे. विविध रिक्षा संघटनांनी वाढलेल्या इंधनदराच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढीची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर तसेच खटुआ समितीच्या शिफारशीस अनुसरून सदर बैठकीमध्ये ऑटोरिक्षा भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नवीन भाडेवाढ 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार आहे.
बैठकीतील निर्णयानंतर पहिल्या दीड किलोमीटरसाठी नागरिकांना आता 23 रुपये मोजावे लागणार आहे. त्यापुढे प्रत्येक किलोमीटरसाठी 15 रुपये मोजावे लागणार. भाडेवाढीपूर्वी पहिल्या दीड किमीसाठी 21 रुपये मोजावे तर, त्या पुढील प्रत्येक किमीसाठी पूर्वी 14 रुपये मोजावे लागत होते.
अन्वरअली
पुणे मेट्रो लाईव्ह
Comments
Post a Comment