पुणे मेट्रो लाईव्ह :
रायगड जिल्हा : सुनील पाटील
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सरपंच ताई पवार यांना अपात्र म्हणून ठरवून पदावरुन हटविण्यात आल्याने सरपंचपद रिक्त होते. ग्रामपंचायतीच्या सरपंच बडतर्फ केले गेल्यामुळे त्या रिक्त असलेल्या जागी उपसरपंच काम करीत असलेल्या माधुरी भगवान जांभळे यांची प्रभारी सरपंच म्हणून निवड करण्यात आली.
ग्रुप ग्राम पंचायत वासांबे (मोहोपाडा ) प्रभारी सरपंच पदी सौ माधुरी भगवान जांभळे यांची निवड झाली त्यांचे अभिनंदन समवेत मा. सरपंच श्री लक्ष्मण शेठ पारंगे,श्री कृष्णा पारंगे सरपंच सौ ताई पवार, रायगड भूषण श्री अरविंद पाटील, श्री लक्ष्मण जांभळे, श्री शाम म्हसकर,श्री संजय कांबळे, श्री अशोक पारंगे, श्री उत्तम माळी श्री रतन गायकवाड, श्री नितीन पारंगे, श्री दिनकर पारंगे, श्री राम पारंगे, भगवान जांभळे, श्री पुंडलिक पवार, श्री जयंत पारंगे यावेळी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी सचिन कुराडे उपस्थित होते. प्रभारी सरपंचपदी माधुरी भगवान जांभळे यांची निवड झाल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या..
Comments
Post a Comment