Skip to main content

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यास सज्ज व्हा- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन



पुणे मेट्रो लाईव्ह

रायगड जिल्हा : सुनील पाटील

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर त्याग आणि शिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे. पक्षाच्या आदेशानुसार काम करण्याच्या आपल्या सामर्थ्याच्या जोरावर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत आणि पक्ष संघटना मजबूत करायची आहे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी पनवेल येथे केले. 

      भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवार दिनांक २३ जुलै रोजी पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. यावेळी उद्धाटन सत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, प्रदेश सहप्रभारी जयभानसिंह पवय्या आणि ओमप्रकाश धुर्वे, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व विजया रहाटकर, चंद्रशेखर बावनकुळे, 

विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि आ. आशिष शेलार, रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, संजय कुटे, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी श्रीकांत भारतीय व्यासपीठावर उपस्थित होते. 

          चंद्रकांतदादा पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्याचे आवाहन केल्यानंतर उपस्थित प्रतिनिधींनी जागेवर उभे राहून टाळ्यांच्या कडकडाट उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात भाजपाने राज्यात विविध निवडणुका जिंकल्या व जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष केला. महाविकास आघाडी सरकारने भाजपाच्या कार्यकर्त्यांना चिरडण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण एकही कार्यकर्ता डगमगला नाही. कार्यकर्त्यांचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यात आघाडी सरकारच्या काळात हिंदु्त्व संकटात आले. नवे सरकार सत्तेवर येणे गरजेचे होते. अशा स्थितीत मा. एकनाथ शिंदे यांनी नेतृत्वाला आव्हान दिल्यानंतर भाजपाने त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला, असेही त्यांनी नमूद केले. तसेच या बैठकीच्या यशस्वी नियोजनासाठी विशेष प्रयत्न घेणारे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुकही त्यांनी आवर्जून केले. 

       सी. टी. रवी यांनी सांगितले की, राज्यातील राजकीय परिवर्तनामुळे केंद्र सरकारच्याच विचारांचे विकासाचे डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले आहे. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. राज्यात विकासवादी व हिंदुत्ववादी सरकार आले आहे. आगामी काळात कठोर परीश्रम करून संघटना आणखी मजबूत करायची आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभा निवडणुका जिंकायच्या आहेत. 

        शिवप्रकाशजी म्हणाले की, जनादेशचा सन्मान, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, सामान्यांची सुरक्षितता आणि हिंदुत्व यासाठी भाजपा शिवसेना सरकार सत्तेवर आले आहे. भाजपाला जनमत अनुकूल आहे. संघटनात्मक बांधणीत आता मोठी झेप घ्यायची आहे. प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. प्रदेश सरचिटणीस अतुल सावे यांनी शोकप्रस्ताव मांडला. तर भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी सर्वांचे स्वागत केले. 

ओबीसी आरक्षण परत मिळवून दिल्याबद्दल भाजपा-शिवसेना युती सरकारचे अभिनंदन; भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत ठराव

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळवून दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी- शिवसेना महायुती सरकारचे अभिनंदन करणारा ठराव शनिवारी पनवेल येथे झालेल्या  भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत मंजूर करण्यात आला.हिंदुत्वाचा विचार आणि जनादेशाचा सन्मान करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना व सहयोगी आमदारांचे अभिनंदनही बैठकीत करण्यात आले. पक्षशिस्तीचा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यकारिणी बैठकीत धन्यवाद देण्यात आले.

कार्यकारिणी बैठकीत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजकीय प्रस्ताव, प्रदेश सरचिटणीस आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षण विषयक तर किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी शेती विषयक प्रस्ताव मांडला.

      राजकीय प्रस्तावात म्हटले आहे की, २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने भाजपा -शिवसेना सरकारला १६१ जागांसह स्पष्ट बहुमत दिले होते.मात्र केवळ मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने भाजपा ची  साथ सोडत काँग्रेस- राष्ट्रवादी शी हातमिळवणी केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाडस करत हिंदुत्वाच्या विचारांचे सरकार सत्तेत यावे यासाठी पुढाकार घेतला.

महाविकास आघाडी सरकारने नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवले. हे आरक्षण परत मिळावे यासाठी भारतीय जनता पार्टीने राज्यव्यापी आंदोलन केले.सत्तेत आल्याआल्या हे आरक्षण परत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी   तातडीने आवश्यक ती कार्यवाही केली, असे या संबंधीच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकरी पुरता उध्वस्त झाला.नैसर्गिक संकटाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, असे शेती विषयक प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

चौकट- 

महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीची बैठक आज पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. उत्कृष्ट आयोजन व यशस्वी नियोजन या बैठकीचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. पनवेल व आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण वातावरण भाजपमय पहायला मिळाले. बैठकीसाठी आलेल्या सर्व मान्यवर तसेच प्रतिनिधींचे स्वागत ते समारोप, निवास, पार्किंग, भोजन अशी सर्व  व्यवस्था उत्तम होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वांनी नियोजनाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि सहकाऱ्यांचे कौतुक केले. माजी मंत्री व विद्यमान आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर महाराष्ट्रातील दहा सर्वोत्कृष्ट आमदारांमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांचे कार्य आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीर व अवैध व्यवसाय धंदे , लोकांना होणारा त्रास व गुंडगिरीबाबत कठोर कारवाई होणे बाबत पुजारी मळा येथील नागरिकांचे निवेदन.

 संदेश राजाराम हत्तीकर, संतोष राजाराम हत्तीकर,राजाराम हरीबा हत्तीकर व अली खान यांचे वर कारवाई  करण्याची मागणी. पुणे मेट्रो लाईव्ह :  इचलकरंजी  येथील  श्री. संदेश राजाराम हत्तीकर, संतोष राजाराम हत्तीकर,राजाराम हरीबा हत्तीकर व अली खान यांनी पुजारी मळा, वॉ.नं. १७ शिवशक्ती चौक, झपाटे दवाखान्याजवळ, इचलकरंजी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर  पुजारी मळा परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने हत्तीकर यांचे सदर परिसरात दारूच्या बाटल्या स्वच्छ करणेचे केमिकल गोडाऊन असून सदर गोडाऊन मध्ये हत्तीकर कुंटूबिय बेकायदेशीर व्यवसाय धंदे करतात म्हणजेच अनाधिकृत पणे, विनापरवाना व बेकायदेशीर देशी, विदेशी स्वरुपाचे मद्य विक्री करणे तसेच  परिसरात बेकायदेशीर  अवैध जुगार, तीनपानी पत्ते पैसे लावुन खेळणे तसेच अनेक बेकायदेशीर  व्यवसाय,धंदे तसेच लोकांना होणारे त्रास व गुंडगिरीबाबत कठोर कायदेशीर कारवाई  करण्याची मागणी या परिसरातील महिला नागरीक  शांता बाबासाहेब धुमाळ , सरस्वती फाल्गुन पुजारी व पद्मजा  मुरारी नराते चंचंदा भिमराव नराटे. सौ. चंदाकिमराव नरोट ,रेखा संजय मुधाळ...

जमीयत उलमा हिंद महाराष्ट्र के अध्यक्ष हजरत मौलाना मुस्तकीम अहसन आजमी साहब का इंतकाल

आजमी साहब की कमी हमेशा मेहसुस होगी ; हाजी गुलजार अध्यक्ष जमीयत पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो लाईव्ह :    अन्वरअली शेख  :  पिंपरी चिंचवड- जमियेत उलमा हिंद  महाराष्ट्र के अध्यक्ष हजरत मौलाना मुस्तकीम अहसन आजमी | साहब का कल  २० जून को सुबह की नमाज से कुछ वक्त पहले इंतकाल हो गया.  जनाजे की नमाज असर के बाद  नारियलवाडी कब्रस्तान मुंबई में अदा की गयी और उसी कब्रस्तान में सुपुर्द खाक किया गया. हजरत मौलाना मुस्तकीम साहब सदर महाराष्ट्र जमीयत के साथ समाजसेवा में ५६ साल से लगे रहे और आप उलेमाये दिन में एक बेहतरीन मुकर्रार थे. आपके पुणे शहर मे कई सफर हुवे हे. जमियेत के लिये आप का बहुत महत्व पूर्ण योगदान रहा है, आप जमीयत उलेमा के प्रोग्राम में २५-३० वर्षो से जुडे रहे. हाजी गुलजार अध्यक्ष पिंपरी चिंचवड जमियेत उलमा ने आपके इंतकाल पर दुख व्यक्त किया है और अल्लाह से दुआ कि है कि मरहूम को जन्नते फिरदौस आला मकाम अता फरमाएं.  

शिवसेना पुणे शहर .... रास्ता रोको आंदोलन ... झुकेंगे नही ...

पुणे मेट्रो लाईव्ह : शिवसेना नेते, खा संजय राऊत साहेब यांच्यावर राजकीय सुडाने केंद्र सरकारने ईडी मार्फत कारवाई केली. आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राऊत साहेबांची तपास व चौकशी सुरू होती. पहिली नोटीस दिड महिन्यापूर्वीच दिली, चौकशी केली मग तेव्हाच का अटक केली नाही ? भाजपच्या विरोधात बोलणार त्याच्यावर ईडीची कारवाई.. भाजप मधे प्रवेश केला आणि काहीही गुन्हा असो तरीपण नो कारवाई .. ही कुठली हिटलरशाही ...  पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख बाळा  ओसवाल, डाॅ अमोल देवळेकर, आनंद गोयल, भरत कुंभारकर, विधानसभाप्रमुख अशोक हरणावळ, विशाल धनवडे, राजेंद्र बाबर, उत्तम भुजबळ, अर्जुन जानगवळी, राजेश मोरे, दिलीप पोमण, रूपेश पवार, मारूती ननावरे, चेतन चव्हान, अक्षय माळकर शशिकांत,दिपक घुबे, सचिन जोगदंड, सुरज लोखंडे, गौरव पापळ ,मदन गाडे, नितिन निगडे, सनि गवते, अतुल दिघे, निरंजन कुलकर्णी, अनिकेत थोरात, शंकर साठे, स्वाती कथलकर, श्रुती नाझीरकर, सरोज कारवेकर, रोहीणी कोल्हाळ, सिमा मगर, सलमा भाटकर, सिमा गायकवाड, पद्मा सोरटे, गायत्री गरूड, मुकुंद लालबिगे, अनिल माझिरे, रोहीत सांडभोर,

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटची सर्वात मोठी अभिवादन मिरवणूक काढण्यात आली.

  शिवजयंतीदिनाची  अभिवादन मिरवणूक ठरली आहे .एकूण ९ हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे विशेष आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि. १९ फेब्रुवारी  २०२३ रोजी सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष तसेच 'डॉ.पी.ए. इनामदार विद्यापीठा 'चे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. एम.सी.ई सोसायटीचे सचिव प्रा. इरफान शेख , एस.ए. इनामदार, शाहीद इनामदार, वहाब शेख, साबीर शेख , असीफ शेख,शाहीद शेख, बबलू सय्यद,तसेच विश्वस्त, पदाधिकारी, प्राद्यापक -शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सेंटर, गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट, डेक्कन मुस्लीम इन्स्टिट्यूट अॅण्ड लायब्ररी, अवामी महाझ या संस्थांनी सहभाग घेतला.पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थी यांचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी शिवजयंतीदिनाची अभिवादन मिरवणूक ठरली आहे .एकूण...

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये योगदिन उत्साहात साजरा

  श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये योगदिन उत्साहात साजरा इचलकरंजी : प्रतिनिधी :   21 जून हा दिवस संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये योगदिन साजरा करण्यात आला.  प्रारंभी मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर यांनी योगदिनाचे महत्त्व विषद केले. यावेळी राज्यस्तरीय योगासनपटू कु. हर्षदा करंबेळकर, कु. शर्वरी माळी व त्यांच्या सहकारी विद्यार्थिनींनी प्रार्थना, सूर्यनमस्कार, योगासने अशा क्रमाने प्रात्यक्षिके करीत उपस्थित मुलींकडून आसने करवून घेतली. यामध्ये प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर तसेच उपप्राचार्य आर. एस. पाटील, पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे, एस. व्ही. पाटील हे सारे स्वतः सहभागी झाले व त्यांनी सर्व योगासनेही केली. काही शिक्षक-शिक्षिकांनीही योगासने केली.  सौ. अर्चना रानडे यांनी कार्यक्रमाला साजेसे गीत सादर केले. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडाविभाग प्रमुख प्रा. शेखर शहा यांच्या नेतृत्वाखाली योगदिन प्रमुख आर. पी. कुलकर्णी यांनी केले.

कारण मागे भट नावाचा उभा हिमालय आहे.....

  पुणे मेट्रो लाईव्ह : प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) “उष :काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली “… अशी क्रांतीज्योत मनात पेटवणाऱ्या सुरेश भट यांचा मंगळवार ता. १४ मार्च २०२३ रोजी विसावा स्मृतिदिन आहे.त्यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे झाला .आणि १४ मार्च २००३ रोजी ते नागपुरात कालवश झाले.सुरेश भट हे त्यांच्या मित्रपरिवारात, शिष्य परिवारात आणि साहित्यवर्तुळात” दादा ” या नावाने ओळखले जात असत.अर्थात ते खऱ्या अर्थाने दादा माणूसच होते .मराठी कवितेत त्यांनी दिलेले योगदान अनमोल स्वरूपाचे आहे .मेंदीच्या पानावर, आज गोकुळात रंग ,मलमली तारुण्य माझे, गे माय भू तुझे मी ,आता जगायाचे असे ,तरुण आहे रात्र अजुनी यासारखी शेकडो अजरामर गाणी ,कविता ,भावगीते , पोवाडे त्यांनी लिहिले .पण त्यांची खरी ओळख आहे ती म्हणजे मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती हीच आहे.एखाद्या प्रतिभावंत आणि रसिकमान्य कवीने एखाद्या काव्य प्रकाराबाबत संपूर्ण आयुष्य वाहून घेणे आणि त्यात नव्या पिढ्या निर्माण करण्याचे जिवनध्येयी काम करणे हे फार दुर्मिळ असते.सुरेश भट उर्फ दादा हे त्य...

दि.मुस्लिम को ऑप बँक पुणे शाखा श्रीरामपूर या शाखेचा कार्येक्रम डॉ. पी ए इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली व व्हाइस चेअरमन एस ए इनामदार ,सी ई ओ मोहम्मद शाहिद यांनी यशस्वीरिता पार पाडला

श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला . पुणे मेट्रो लाईव्ह :    पुणे : दि मुस्लिम को  ऑप बँक लि. शाखा श्रीरामपूर या शाखेमध्ये  नुकताच कार्येक्रमचे  संपन्न झाला .  या कार्यक्रमचे अध्यक्ष श्री गणी हाजी शेख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक , ज्येष्ठ वकील बाबा शेख , ज्येष्ठ वकील. युसुफ कादर शेख , नगरसेवक मुख्तार शाह साहेब , सी ए एजाज शेख , सय्यद मोहम्मद  गौस उर्फ बबलू सय्यद (संचालक  दि मुस्लिम को  ऑप बँक ) , अजमत फातिमा इंग्लिश स्कूल संचालक  मुबिन शेख , मतीन शेख व कुरेशी समाजाचे सदर मेहबूब कुरेशी , इंजि. सलीम मणियार , सलीम दस्तगीर , पि एस आय इब्राहीम शेख , इरफान शेख, इम्रान सय्यद आदी उपस्थित होते. या वेळी  श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला . सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रांच मॅनेजर शकील कुरेशी , स्टाफ एजाज सय्यद , वसीम  शेख , साजिद खान या सर्वांनी   विशेष परिश्रम घेतले. श...

प्रवाशांची गैरसोय झाल्याने काॅंग्रेसने अधिका-यांना धरले धारेवर

  पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी : प्रतिनिधी :  शासन आपल्या दारी अभियानासाठी आज मुख्यमंत्र्याचा कोल्हापूर दौरा आहे. या कार्यक्रमासाठी इचलकरंजी बसस्थानकातून बहुतांश एसटी बसेस गेल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बसस्थानकात धाव घेऊन अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अधिकार्‍यांनी शासन आदेशानुसार बसेस नियोजित कार्यक्रमासाठी गेल्या असल्या तरी प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतल्याचे सांगितले. शासन अपल्या दारी या अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंगळवारी कोल्हापूर दौर्‍यावर आहेत. त्यामुळे शासन आदेशानुसार इचलकरंजी बसस्थानकातील बहुतांश एसटी बसेस या कार्यक्रमाला नागरीकांना ने- आण करण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज सकाळी 8 वाजल्यापासून बसस्थानकात प्रवाशांची गर्दी दिसत होती. अनेकांनी बसेसबाबत विचारणा केली असता बसेस नसल्याचे सांगण्यात अले. त्यामुळे लांब पल्यावरून आलेले प्रवाशी तसेच इचलकरंजी बसस्थानकातून पुढील प्रवास करण्यासाठी आलेल्या प्रवाशांतून संताप व्यक्त होता. याबाबत माहिती मिळताच कॉग्रेसचे पदाधिकारी, कार...

कोण होणार चिंचवडचा आमदार...? आज जाहीर होणार

  चिंचवड : सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या चिंचवड आणि कसबा पेठ  पोटनिवडणुकीची आज मतमोजणी पुणे मेट्रो लाईव्ह : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण :  मतमोजणी आज सकाळी 8 वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार असून मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी 1 टेबल असे एकूण 15 टेबल असणार आहेत. 18 पर्यवेक्षक, 18 सहायक आणि 18 सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संगणकीय प्रणालीने सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या टेबलवरील कामकाज त्या कर्मचाऱ्यांना सोपवले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तसेच मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया होईल. टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला टपाली आणि ईटीपीबीएसची मतमोजणी होईल....