Skip to main content

Posts

आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’चा साडेदहा लाख रुपयांचा साठा जप्त

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे, दि. २३: अन्न व औषध प्रशासन, पुणे कार्यालयातर्फे आरोग्यास अपायकारक ‘पफ वनस्पती’ विक्रेत्यांवर कारवाई करुन १० लाख ५८ हजार ३८० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.  मार्केट यार्ड पुणे येथे अचानक छापे टाकून घाऊक विक्रेत्यांकडून विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या वनस्पती हा अन्न पदार्थ आरोग्यास अपायकारक असल्याचा अहवाल प्राप्त होताच घाऊक विक्रेते व वितरकांकडील उर्वरित साठा जप्त करण्यात आला. पफ वनस्पती (ग्रेड शेफ ब्रँड) या अन्न पदार्थाचे घाऊक विक्रेत्याकडे तपासणी करुन नमुना घेऊन उर्वरित ३ लाख ५२९ रुपये किंमतीचा १ हजार २८८ किलो साठा, तसेच वनस्पती पफ (सेंच्युरी ब्रँड) चा ४ जाख ३७ हजार ९६६ रुपये किंमतीचा २ हजार ५३ किलो साठा असा एकूण ७ लाख ३८ हजार ४९५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.  त्याच दिवशी सदर वनस्पतीच्या वितरकाकडे तपासणी केल्यानंतर पफ वनस्पती (ग्रेड शेफ ब्रँड) चा नमुना घेवुन उर्वरित ६६ हजार ९७६ रुपये किंमतीचा ४७८ किलो साठा तसेच पफ (सेंच्युरी ब्रँड)चा २ लाख ५२ हजार ९०९ रुपये किंमतीचा १ हजार ८७३ किलो साठा असा ३ लाख १९ हजार ८८५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आल...

सांस्कृतिक सभागृहे उघडण्याचा निर्णय झाल्याने उपोषण मागे

 असलम इसाक बागवान यांच्या उपोषणाची सांगता  पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : कोंढव्यातील इमाम अबु हनिफा,डॉ. आंबेडकर सभागृहे नागरिकांच्या कार्यक्रमांना खुली करण्याची मागणी पुणे महानगरपालिकेच्या समाज  विकास विभागाने  मान्य केल्याने इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान आणि सहकाऱ्यांचे पालिकेसमोर सुरू असलेले उपोषण स्थगित करण्यात आले. २२ ऑगस्ट रोजी उपोषणाची सांगता पालिकेचे समाज विकास अधिकारी रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आली.   स्थानिक माजी नगरसेवकानी ही सभागृहे बंद ठेवण्यासाठी महानगर पालीका अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. त्यात माजी नगरसेवक रईस सुंडके यांचाही सहभाग होता.  ही सभागृहे उघडण्यासाठी  आणी शिवनेरीनगर येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हॉल  येथे गरीबांच्या हाताला रोजगार तसेच महिला रोजगार प्रशिक्षण केंद्र (लाईट हाऊस) सूरू करण्यासाठी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप गेली  दोन वर्ष प्रयत्न करीत होते . या प्रयत्नांना यश आले आहे.  उपोषणामध्ये असलम इसाक बागवान,इब्राहिम शेख, रियाज बंगाली,अब्दुल बागवान,सादिक पानसरे,अ...

पुणे : आज बेटी पढाव बेटी बचावचा कार्येक्रम अत्यंत थाटात संपन्न .

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे :  आज बेटी पढाव बेटी बचावचा कार्येक्रम  अत्यंत थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पी ए इनामदार होते एम सी ई सोसायटी  चेअरमन होते .  तर  डॉ. अजय दूबेजी, mrs  गुरमीत कौर मॅडम,  राहुलजी भंडारी , भगवान वैराठीजी , मुस्लिम बँकेचे संचालक मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद , हाजी सईद सय्यद , हाजी फयाज मोमीन , युसुफ शेख , मंतशा शेख , व रामभाऊ जगदाळे प्रमुख उपस्थिती म्हणून हजर होते.

वीज मीटर रीडिंग मधील अचूकतेसाठी महावितरणने अतिशय गांभीर्याने धडक उपाययोजना सुरू केल्या

वीजमीटर रीडिंग मध्ये हलगर्जपणा करणार्‍या एजन्सींविरुद्ध तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकार्‍यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : वीज  मीटर रीडिंग मध्ये हलगर्जपणा करणार्‍या एजन्सींच्या कामांचे मूल्यांकन करीत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारताच अस्पष्ट फोटोंचे प्रमाण 45 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात महावितरणला यश आले आहे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा नाहक मनस्ताप व वीजबिल दुरुस्तीच्या त्रासा सोबतच महावितरणच्या महसुलाचे नुकसान होत होते. हे लक्षात घेऊन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी राबविलेल्या मोहिमेमुळे महावितरणच्या वीजबिलांतील अचूकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एप्रिल ते जून 2022 या 3 महिन्यांत वीज विक्रीतही तब्बल 3 (825 द.ल.यु.) टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत वीज मीटरचे रीडिंग अचूकच झाले पाहिजे.वीज मीटर रीडिंग मधील अचूकतेसाठी महावितरणने अतिशय गांभीर्याने धडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अचूक रीडिंगसाठी सुधारणा न करणे, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही हेतुपुरस्सरपणे नादुरुस्तीचा (फॉल्टी) शेरा देणे, सरासरी क...

देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून उमेदवारी देऊन खासदार करावे,

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे: अखिल  भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून उमेदवारी देऊन खासदार करावे, अशी मागणी केली. त्यानंतर पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. त्यावर पुण्यातील भाजप खासदार गिरीश बापट यांनी मात्र सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांना खासदारकी दिली तर काहीच हरकत नसल्याचं त्यांनी माध्यामांशी बोलताना सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे हिरे आहेत. त्यांचं काम संपुर्ण महाराष्ट्राने जवळून पाहिलं आहे. गेले दोन महिने त्यांच्यात असलेली हिंमत देखील आपण सगळ्यांनीच अनुभवली. काही संघटनेकडून त्यांना पुण्याचे खासदार करा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी माझी काहीच हरकत नाही आहे. त्यांना खासदारकी दिली तर मला आनंदच होईल. कारण पुणे, पश्चिम महाराष्ट्राने त्यांच्या कामाची दृष्टी पाहिली आहे. त्यामुळे या गोष्टीचा आनंद असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पक्षाच्या कोणत्याच आदेशाच्या बाहेर आम्ही दोघेही नाही. त्यामुळे पक्षाचा निर्णय अंतिम असेल. पक्ष सांगेत त्याप्रमाणे पुढची वाटचाल करु. भाज...

स्टार्टअप यात्रेद्वारे युवकांना नावीन्यपूर्ण संकल्पनेची माहिती

  स्टार्टअप यात्रेद्वारे युवकांना नावीन्यपूर्ण संकल्पनेची माहिती पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : कौशल्य, रोजगार, उद्योजकता नावीन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रेअंतर्गत पुणे शहर, हवेली व शिरुर तालुक्यातील युवा विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण संकल्पना व त्याअनुषगांने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली. तालुकास्तरीय प्रचार प्रसिद्धी व जनजागृती अभियान अंतर्गत जिल्ह्यात मोबाईल व्हॅनद्वारे  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध, अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे,  जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ  हांडेवाडी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिरूर, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय अशा विविध ठिकाणी भेटी देण्यात आल्या.  तालुकानिहाय सत्राचे १९ ऑगस्ट रोजी पुरंदर, बारामती, वेल्हे व भोर, २३ ऑगस्ट रोजी इंदापूर व २९ ऑगस्ट रोजी जुन्नर आणि ३० ऑगस्ट रोजी खेड व आंबेगाव तालुक्यात आयोजन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी नवउद्योजकांनी  www.msins.in  किंवा www.mahastartupyatra.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. जिल्हयातील अधिकाधिक उमेदवारांनी ...

मशहूर कॉमेडियन राजू श्रीवास्तव की हालत बिगड़ गई है।

  पुणे मेट्रो लाईव्ह : राजू श्रीवास्तव की तबीयत काफी बिगड़ गई है, उनके बड़े भाई ने कॉमेडियन की हेल्थ का अपडेट दिया है।  मशहूर कॉमेडियन राजू श्रीवास्तव की हालत बिगड़ गई है। सूत्रों के मुताबिक उनकी हालत बेहद गंभीर है और वो 9 दिन से बेहोश हैं। जब से उन्हें हार्ट अटैक आया है तब से वो बेहोश हैं और दिल्ली के एम्स अस्पताल में उनका इलाज चल रहा है। फिलहाल कॉमेडियन वेंटिलेटर पर हैं। राजू की तबीयत पर उनके बड़े भाई सीपी श्रीवास्तव का रिएक्शन आया है। उन्होंने बताया कि  राजू श्रीवास्तव की तबीयत बेहद क्रिटिकल है और किसी को अंदर नहीं जाने दिया जा रहा है।

पुरस्कार:हाजी गुलजार अध्यक्ष जमीयेत ऊलमा हिंद पिं.चिं. को मिला सामाजिक सेवा के लिए पुरस्कार

शिक्षा,आरोग्य,सामाजिक जनजागृती तथा कोरोना काल मे  उल्लेखनीय कार्य पुणे मेट्रो लाईव्ह : अन्वरअली शेख : पुणे शहर पिंपरी चिंचवड जामितुस्सोलिहात, फिदा-ए-मिल्लत स्कूल जमियेत उलमा हिंद महाराष्ट्रा के समारोह मे हाजी गुलजार (अध्यक्ष जमियेत उलमा हिंद पिंपरी चिंचवड) को उन के समाज सेवा लिये शहर का आदर्श समाज सेवी अवार्ड प्रदान किया गया है। उन्हें यह प्रतिष्ठित अवार्ड प्रदान किया गया है। दरअसल उन्हें ये सन्मान मोलाना असलम रिजवी अध्यक्ष शिया बोर्ड ऑफ महाराष्ट्रा  औंर पुणे शहर के मशहूर व मारुफ अलिमे दीन कारी इद्रिस सदर पुणे शहर के हाथ  पुणे शहर  में कोंढवा  मे होने वाले वार्षिक समारोह मे समाज सेवा के क्षेत्र में उल्लेखनीय कार्य के लिए यह सम्मान प्रदान किया गया है।  उनके निकट के सहयोगी व सामाजिक कार्यकर्ता कारी  इकबाल ने बताया कि समारोहपूर्वक आयोजित कार्यक्रम में उन को कोरोना काल मे,तथा अस्मानी संकट आपदा के समय नियोजनबध्द तरिको से  समाज सेवा  करने के लिये अवार्ड प्रदान किया। अवार्ड को पाने की खबर मिलते ही पिंपरी चिंचवड- जिले में उनके जानने वाले  एवं सा...

कोल्हापूर जिल्ह्यात पाऊसाची उघडीप..

पुणे मेट्रो लाईव्ह : कोल्हापूर :   कोल्हापूर जिल्ह्यात पाऊसाने उघडीप दिल्याने गेल्या आठ दिवसांपासून इशारा पातळीवर वाहत असलेली पंचगंगा नदी आज पात्रात परतण्याची शक्यता आहे. पंचगंगेची पातळी 32 फुटांवर आली आहे. जिल्ह्यातील बंधाऱ्यांवरील पाणी वेगाने कमी होत असून आता केवळ 29 बंधाऱ्यांवर पाणी आहे. गेल्या 24 तासांमध्ये सहा फुटाने खाली आली.  तर दुसरीकडे राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र.6 हा एकमेव खुला असून सध्या धरणातून 3028 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदी गेल्या आठ दिवसांपासून इशारा पातळीवर वाहत असल्याने महापूराची टांगती तलवार होती. मात्र, चार दिवसांपासून दिलेल्या उघडीपमुळे संकटातून सुटका झाली आहे. दुसरीकडे अलमट्टी धरणातून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग सुरु आहे. खालील बंधारे पाण्याखाली आहेत पंचगंगा नदी-शिंगणापूर,राजाराम,सुर्वे,रुई,इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ भोगावती नदी-हळदी,सरकारी कोगे,राशिवडे, शिरगांव,खडक कोगे कासारी नदी- यवलूज,पुनाळ तिरपण,ठाणे आळवे वेदगंगा नदी- बस्तवडे व चिखली वारणा नदी- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी दुधगंगा नदी- दत्तवाड...

स्वतंत्र दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साह व आनंदमय वातावरणात कासारवाडी मदरसा येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

कासारवाडी मदरसातील विद्यार्थिनी देशाच्या स्वतंत्रतावर वकृत्वने उपस्थिततांचे लक्ष वेधले पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख   पिंपरी चिंचवड : कासारवाडीतील  मदरसा येथे   सन्माननीय इंजिनीयर वसीम अकरम यांच्या हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले.  यावेळी मदरसातील विद्यार्थिनी देशाच्या स्वतंत्रतावर वकृत्वने उपस्थिततांचे लक्ष वेधले पहीली ते दहावी पर्यंत शिक्षण घेणारे विध्यार्थीनी इंग्रजी तुन  भाषण करून सर्वाना मंत्र मुग्ध केले यात विशेष करुन दोन मुलांनी आपल्या मित्राकडे आपल्या घरातील पालकांनवर आपसात बोलताना म्हणतात कि माझे बाबा मला कुठे ही फिरण्यास घेऊन जात नाही ते मला वेळ ही देत नाही सकाळी जातात आणि मी झोपल्यावर घरी येतात त्यामुळे मी बाबांन वर खुप नाराज आहे, ते ऐकून त्याचा मित्र ही म्हणतो प्रत्येक घरात हीच बोंब परिस्थिती दिसते मित्रा, त्यामुळे मी ही आई बाबांनवर नाराज आहे तेवढ्यात एक अजून एक मित्र येतो तो दोघाची समजुत काढत म्हणतो तुम्ही आई बाबांन वर का ? नाराज होता नाराज होणे बरोबर नाही, तुम्हाला माहीत आहे का, बाबा किती कष्ट तुमच्यासाठी घेतात ते रोज धडपडत पैश...