Skip to main content

Posts

स्वतंत्र दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साह व आनंदमय वातावरणात कासारवाडी मदरसा येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

कासारवाडी मदरसातील विद्यार्थिनी देशाच्या स्वतंत्रतावर वकृत्वने उपस्थिततांचे लक्ष वेधले पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख   पिंपरी चिंचवड : कासारवाडीतील  मदरसा येथे   सन्माननीय इंजिनीयर वसीम अकरम यांच्या हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले.  यावेळी मदरसातील विद्यार्थिनी देशाच्या स्वतंत्रतावर वकृत्वने उपस्थिततांचे लक्ष वेधले पहीली ते दहावी पर्यंत शिक्षण घेणारे विध्यार्थीनी इंग्रजी तुन  भाषण करून सर्वाना मंत्र मुग्ध केले यात विशेष करुन दोन मुलांनी आपल्या मित्राकडे आपल्या घरातील पालकांनवर आपसात बोलताना म्हणतात कि माझे बाबा मला कुठे ही फिरण्यास घेऊन जात नाही ते मला वेळ ही देत नाही सकाळी जातात आणि मी झोपल्यावर घरी येतात त्यामुळे मी बाबांन वर खुप नाराज आहे, ते ऐकून त्याचा मित्र ही म्हणतो प्रत्येक घरात हीच बोंब परिस्थिती दिसते मित्रा, त्यामुळे मी ही आई बाबांनवर नाराज आहे तेवढ्यात एक अजून एक मित्र येतो तो दोघाची समजुत काढत म्हणतो तुम्ही आई बाबांन वर का ? नाराज होता नाराज होणे बरोबर नाही, तुम्हाला माहीत आहे का, बाबा किती कष्ट तुमच्यासाठी घेतात ते रोज धडपडत पैश...

देहूरोड शहरात मोठ्या उत्साहा व जल्लोषात ७५ वा स्वतंत्र दिवस अमृत महोत्सव साजरा

पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख  देहूरोड; दि.१५ ऑगस्ट ७५ वा स्वातंत्र्य दिवस अमृत महोत्सव मोठ्या उत्साहा आणि  जल्लोषात आनंदमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला, संपूर्ण देहूरोड शहर तिरंगामय झाला होता,ठीक ठिकाणी ध्वजारोहणचे कार्यक्रम संपन्न झाले, शहरात सामाजिक संघटन व राजनीतिक पक्षांकडून दुचाकी वरून भव्य-तिरंगा रॅली काढण्यात आली, तर जय भवानी रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा संस्था च्या वतीने ऐतिहासिक बाबासाहेब आंबेडकर  कमानी समोर रिक्षा स्टॅन्ड वर ध्वजारोहण करण्यात आले, तसेच शाळेकरी मुलांना मोठ्या प्रमाणात खाऊ वाटप या संस्थेच्या वतीने करण्यात आले.तसेच जय भवानी रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा या संस्थेने देहूरोड शहरातील ऐतिहासिक सुभाष चौक बाजारपेठेतून भव्य-रीक्षा तिरंगा रॅली चे आयोजन केले होते. भव्य-रिक्षा तिरंगा रॅली देहूरोड शहरवासीयांना आकर्षक करत होती. भारत माता की जय, भारतीय स्वतंत्र  75 व्या अमृत महोत्सव दिनाचा विजय असो च्या गर्जनांनी पूर्ण देहूरोड शहर दुंम-दूमुन गेले.  एड .कैलाश पानसरे ( देहूरोड छावणी प्रशासक ) यांनी रिक्षा प्रवासी वाहतूक सेवा संस्था यांच्या सामाजि...

कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड पेठ वडगाव व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व जूनियर कॉलेज पेठवडगाव, वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी व कॉलेज ऑफ फार्मसी पेठ वडगाव येथे "15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिना निमित्त" महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले...

पुणे मेट्रो लाईव्ह :   आज दिनांक 15ऑगस्ट 2022 रोजी श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड पेठ वडगाव व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व जूनियर कॉलेज पेठवडगाव, वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी व कॉलेज ऑफ फार्मसी पेठवडगाव  येथे "15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिना निमित्तमहाविद्यालयाच्या  प्रांगणात  ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण : श्री बाबासाहेब शिंदे .(माजी सैनिक अंबप.). यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजपूजन सुधाकर गजानन वाटेगावे व नितिन बळवंत ढमणगे रा,वाठार यांच्या हस्ते करण्यात आले.वृक्षारोपण  प्राचार्य निर्मळे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.ध्वजा रोहणानंतर सॅक्सोफोन वर "ए मेरे वतन के लोगो" हे गाणे कु. रिया जाधव ने उत्कृष्टरित्या सादर केले. तर कु. सुप्रिया दाभाडे ने "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" या विषयावर भाषण केले.   या वेळी'कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड) पेठ वडगावच्या  प्र.प्राचार्य सौ.निर्मळे आर्. एल् , इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज चे मुख्याध्यापक कोंडेकर सर, वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य जडगे सर, कॉलेज ऑफ फा...

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा आणि ध्वजारोहण एम. बी कॅम्प देहूरोड मधे मोठ्या उत्साह आणि जल्लोषात साजरा

पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख देहूरोड: दि.१५   भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा सोमवारी सर्वत्र मोठा उत्साह आणि जल्लोषात साजरा होत आहे. एम. बी. कॅम्प देहूरोड येथेही मलिक शेख युवा नेते काँग्रेस पक्ष असिफ सय्यद काँग्रेस पार्टी यांच्यासह मदद फाऊंडेशन देहूरोड याच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रम आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या आरंभास महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्चना राऊत पि. चिं. महिला उपाध्यक्ष रा.काँग्रेस पक्ष व माजी पोलीस अधिकारी अबू-बकर लांडगे, आयुब खान, सुनील तरस यांनी अर्पण केले,    प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित विलास तरस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य कंपास, व खाऊ  वाटण्यात आले.आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत मुन्ना कुरेशी यांनी केले तर सूत्रसंचालन अन्वरअली शेख यांनी केले, आलेल्या सर्व पाहुण्यांचे असिफ सय्यद यांनी आभार मानले  त्यावेळी बापू कातळे भावी नगर सेवक ,राजेंद्र तरस भावी नगर सेवक, गफुर भाई शेख मुस्लिम समाजातील ज्येष्ठ विचारवंत,सोनू श...

पिंपरी कालेवाडी मक्का मस्जिद मे स्वतंत्रता के अमृतमहोत्सव के अवसर पर 250 नमाजियो को तिरंगे निःशुल्क बांटे गये

पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख : पिंपरी चिंचवाड़ - ता.12, पिंपरी कालेवाडी मक्का मस्जिद मे  स्वतंत्रता के अमृतमहोत्सव के अवसर पर हाजी गुलजार जमियेत ऊलमा हिंद पिंपरी चिंचवड अध्यक्ष  के मार्गदर्शन में मस्जिद मे आने वाले सभी नमाजि नागरिकों को नि:शुल्क तिरंगा वितरित किया गया.   हाजी गुलजार अध्यक्ष जमियेत ऊलमा हिंद पिंपरी चिंचवड के नेतृत्व में सभी नमाजी भाईयो को अपने अपने घरों में तिरंगा फेहराने लिये मक्का मस्जिद मे आज बाद नमाजे मगरिब के 250 झंडे निःशुल्क  बांटा गया.  जमियेत अध्यक्ष हाजी गुलजार ने कहा कि इस देश की युवा पीढ़ी को भारतीय स्वतंत्रता संग्राम में लाखों शहीदों के समर्पण से अवगत कराने के लिए मक्का मस्जिद मे हम ये  तिरंगा अभियान चला रहे हे,इस कार्यक्रम मे  छावा संघटन के एलकर पाटील साहब,मक्का मस्जिद के नायबसदर हाजी उस्मान साहब, ज. सेकेट्री ताजुद्दीन तांबोळी, और मस्जिद सभी ट्रस्टी जिम्मेदार उहदे-दार मौजुद थे,  अन्वरअली शेख  पुणे मेट्रो लाईव्ह

वीजेचा लपंडाव, वीज मंडळ कर्मचाऱ्यांच्या अरेरावी विरोधात आंदोलन

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : कोंढवा परिसरातील वीजेचा लपंडाव, वीज मंडळ कर्मचाऱ्यांच्या अरेरावी विरोधात महावितरणच्या रास्ता पेठ येथील मुख्य कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.  इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप तसेच कोंढवाच्या स्थानिक नागरीकांच्या माध्यमातून महावितरण मुख्य कार्यालय पावर हाऊस रास्तापेठ येथे कोंढवा भागातील भाग्योदयनगर, मिठानगर, साईबाबानगर,नवाजिश पार्क आक्सा पार्क येथील विज लपंडाव तसेच वीजमंडळ कर्मचारी,लाईनमन,वायरमन यांच्या अरेरावी विरूध्द आंदोलन करण्यात आले . या आंदोलनाचे निवेदन देताना इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान, इब्राहिम शेख,रियाज बंगाली,इसाक शेख,शहबाज पंजाबी यांनी या भागातील समस्या मांडल्या .  यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता,कार्यकारी अभियंता,ग्राहक निवारण अधिकारी, सेंट मेरीज विभागाचे आभियंता उपस्थित होते. कार्यकारी अभियंता घुगे  यांनी तीन - चार दिवसात येथील समस्येचे निवारण करण्याचे,लाईनमन व वायरमन यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विविध संघटना,पक्ष कार्यकर्ता, स्थानिक नागरीक उपस्थित होते.

‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी’ वर्षानिमित्त प्रभात फेरी

बरसत्या जलधारांच्या साक्षीने हाती तिरंगा घेत पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे दि.१०- ‘वंदे मातरम्, वंदे मातरम्’ ... भारत माता की जय… हर घर तिरंगा'… अशा घोषणांमधून प्रकटणारी देशभक्तीची भावना.. युवक, महिला व लहानापासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या हाती असलेला तिरंगा…. देशभक्तीच्या भावनेला जोरदार पावसाच्या जलधारांनीही बरसत  दिलेली साथ....अशा उत्साहाच्या वातावरणात पुणेकर नागरिकांनी पावसात उत्साहाने प्रभात फेरीमध्ये सहभाग नोंदवला. विधानभवन येथे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत या प्रभात फेरीचा समारोप झाला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपविभागीय अधिकारी हवेली आणि त्याअंतर्गत हवेली, पुणे शहर तहसील कार्यालय आणि पंचायत समिती पुणेच्या सहकार्याने आज सकाळी मामलेदार कचेरी येथून शुभारंभ झालेल्या प्रभात फेरीला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रभात फेरीच्या मार्गावरील नागरिकही प्रभात फेरीत सहभागी होत गेल्याने रॅलीतील उत्साह वाढला. पावसातही हातात तिरंगा घेऊन नागरिक भारतमातेचा जयघोष करीत होते. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यका...

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून नगरपरिषद करावी

    नागरिकांची मागणी ; सागर लांगे यांचा सातत्याने पाठपुरावा   पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख देहूरोड कॉंटमेंट बोर्ड ऐवजी नगरपरिषद होण्याबाबत मागील सहा महिन्यापूर्वी सागर कृष्णा लांगे (भाजप प्रणित: नवभारतीय शिव वाहतूक संघटना, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य) यांच्या माध्यमातून सर्वपक्षीय सर्वसामाजिक संस्था धार्मिक संघटना व देहूरोड मधील सर्व नागरिकांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन, विद्यमान मुख्यमंत्री, देहूरोड कँटोन्मेंट बोर्डा चे कार्यकारी अधिकारी स्थानिक खासदार श्रीरंग आप्पा बारणे स्थानिक आमदार तसेच शासकीय संबंधित खात्याचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते व त्याचा सागर लांगे , यांचे सहकारी यांच्या माध्यमातून वेळोवेळी सर्वांकडे पाठपुरावा करत आहेत मा. अध्यक्ष अल्पसंख्यांक आयोग, भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष  हाजी अराफत शेख यांच्या अध्यक्षतेखाली रंगशारदा सभागृह मुंबई या ठिकाणी *हर घर तिरंगा अभयानाअंतर्गत* कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमांमध्ये देहूरोड कॉंटमेंट बोर्डचे रूपांतर नगरपरिषदे मध्ये होण्याकरता कार्यक्रमांमध्ये उपस्थित ...

कोंढव्यातील सांस्कृतिक सभागृहे उघडण्यासाठी आंदोलन

  इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे उपायुक्तांना निवेदन  पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : स्थानिक सर्व माजी नगरसेवकांच्या वर्चस्वाच्या लढाईत पुणे महानगरपालिकेने बंद केलेली  कोंढवा खुर्द येथील साईबाबा नगर आणि शिवनेरी नगर मधील सांस्कृतिक सभागृहे (फंक्शन हॉल)पूर्ववत सुरु करण्याच्या मागणीसाठी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप आणि कोंढव्यातील नागरिकांनी पुणे महापालिकेसमोर आंदोलन केले आणि पालिकेच्या समाजकल्याण विभागाचे उपायुक्त आर.आर.चव्हाण यांना निवेदन दिले. इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम इसाक बागवान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सोमवारी दुपारी करण्यात आले.   पालिकेने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि लग्न समारंभाकरीता शिवनेरीनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह आणि साईबाबा नगर येथे इमाम अबू हनीफा नावाने सांस्कृतिक सभागृह (हॉल ) बांधण्यात आले आहेत. अल्प उत्पन्न गटातील नागरिक त्याचा वापर करतात. येथील स्थानिक माजी नगरसेवकांनी स्वतःच्या वर्चस्वासाठी सभागृहाचा वापर केला आणि किल्ली स्वतःजवळ ठेवून अडवणूक केली. पालिकेने प्रशासकीय काळात हि सभागृहे बंद करून ठेवली आहेत.त्यामुळे स्थानिक ...

अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे दि. ८ - अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यातील   खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ घरांवर धाडी टाकुन २ लाख १९ हजार ६०० रुपये किंमतीचा सुमारे ७ हजार ३१३ किलो भेसळयुक्त गुळ तर ८२ हजार ४४० रुपये किंमतीची २ हजार ७५० किलो भेसळयुक्त साखर जप्त करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनातर्फे मुदतबाह्य चॉकलेट, भेसळयुक्त गुळ व साखर वापरणाऱ्या गुळ उत्पादकावर  कारवाई करण्यात येत आहे.  जानेवारी २०२२ मध्ये दोन गुळ उत्पादकावर धाडी टाकुन ३ लाख ६७ हजार ९०० रुपये किंमतीचा सुमारे ७ हजार १६२ किलो गुळाचा साठा जप्त करण्यात आला होता. फेब्रुवारी २०२२ मध्ये हातवळण येथील गुळ उत्पादकावर धाडी टाकुन गुळ व भेसळीसाठी वापरली जाणारी साखर जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी घेण्यात आलेले घेण्यात आलेले नमुने असुरक्षित असल्याचे घोषीत करण्यात आल्याने त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. जप्त केलेली साखर नष्ट करण्यात आली आहे. जुलै २०२२ मध्ये गुऱ्हाळ घरांना भेसळीसाठी पुरविण्यात येणारी ७ लाख ७५ हजार रुपये किंमतीची सुमारे २५ हजार किलो साखर जप्त करण्यात आली ...