Skip to main content

Posts

एड. अयुब शेख यांची अल्पसंख्याक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी फेर निवड .

पुणे मेट्रो लाईव्ह :   पुणे : लोणावळा येथे आरपीआय ( अ ) गटाची  महाराष्ट्राची  कार्यकारणीची मीटिंग संपन्न झाली . मीटिंग मध्ये मागील पाच वर्षांमध्ये सर्व स्तरावरील कामाचा आढावा घेण्यात आला . एड. अयुब शेख यांनी मागील पाच वर्षांमध्ये सामाजिक , शैक्षणिक , व राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले आहे , त्याचीच दखल घेऊन आरपीआय ( अ ) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदास आठवले यांनी अल्पसंख्याक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी  फेर निवड करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले .  त्यांच्या या निवडीने एड.अय्युब शेख यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. या बाबत एड.अय्युब शेख यांचे एम सी ई सोसायटीचे चेअरमन  डॉ. पी ए इनामदार यांनी  अभिनंदन केले .

अवामी महाज, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, दि मुस्लिम कॉ. ऑपरेटीव्ह बँक लि. पुणे तर्फे पाणी बॉटल वाटप करण्यात आले.

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे :  अवामी महाज,  महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, दि मुस्लिम कॉ. ऑपरेटीव्ह बँक लि. पुणे तर्फे पाणी बॉटल वाटप करण्यात आले.   या कार्यक्रमाचे संयोजक मुशकुर अहमद शेख , फिरोज चांद खान , मोहम्मद गौस ( बबलू सय्यद )  रऊफ कुरेशी ,  उमर शरीफ मोहम्मद शेख ( बबलू ) .  या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती  इकबाल अन्सारी , इसाकभाई चावीवाले , वहाब मणियार ,वाहीद बियाबानी,  इकबाल शेख , यासीन शेख ,  इकबाल तांबोळी , खलील  खान , युसुफ शेख,  आरिफ सय्यद , हाजी इम्तियाज शाबिर शेख  , जमीर सय्यद ,  हारून सय्यद , इलियास शेख (इल्लू भाई )  साजिद खान पठाण  होते .  या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी ए इनामदार यांचे शुभ हस्ते दहा हजार पाणी बॉटल वाटप करून  मंडळाचा सत्कार सुद्धा करण्यात आला

नोंदणी भवनसाठी नवीन प्रशासकीय इमारती शेजारील जागा देण्यास शासनाने मान्यता दिली.

पुणे मेट्रो लाईव्ह : राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाचा विभाग असलेल्या नोंदणी व मुद्रांक विभागाला आता हक्काची इमारत मिळणार आहे. विधानभवनासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीच्या शेजारील जागेत राज्याचे “नोंदणी व मुद्रांक भवन’ उभारले जाणार आहे. नोंदणी व मुद्रांक भवनाची इमारत आठ मजली असून, 5 हजार 100 चौरस मीटर इतके बांधकाम आहे. ही इमारत पर्यावरणपूरक असून, 18 महिन्यांत बांधकाम पूर्ण होणार आहे. शुक्रवारी (दि. 2) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. पुणे : नोंदणी व मुद्रांक विभाग हा शासनाचा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाकडे जमा होणाऱ्या महसुलावरून राज्याच्या विकास कामांना निधी मिळतो. मागील आर्थिक वर्षात नोंदणी विभागाने सुमारे 35 हजार कोटींचा महसूल शासनाला जमा करून दिला होता. मागील अनेक वर्षांपासून नोंदणी भवन साकारण्याचे प्रयत्न सुरु होते. मागील दोन वर्षांत या विषयाला अधिक गती मिळाली आणि नोंदणी भवनसाठी नवीन प्रशासकीय इमारती शेजारील जागा देण्यास शासनाने मान्यता दिली. नोंदणी महानिरीक्षक यांचे कार्यालय सुर...

मार्केट यार्डातील शिवनेरी रस्त्यावर होणारी कोंडी सोडविण्यात बाजार समिती आणि महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला यश

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : सणासुदीत  मार्केट यार्डातील शिवनेरी रस्त्यावर होणारी कोंडी सोडविण्यात बाजार समिती आणि महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला यश आले. गजबजलेल्या शिवनेरी रस्त्यावर दुतर्फा बेकायदा किरकोळ व्यवसाय करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच दिवाळीत मार्केट यार्डातील शिवनेरी रस्त्यावर फुले, पूजा साहित्य विक्री करणारे विक्रेते ठाण मांडतात. किरकोळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे शिवनेरी रस्त्यावर कोंडी होती. सातारा रस्त्यावरील उत्सव हॉटेल चौक ते मार्केट यार्डातील मुख्य प्रवेशद्वारापर्यंत ठिकठिकाणी कोंडी होती. बाजारात खरेदीसाठी आलेल्या खरेदीदारांना कोंडीत अडकून पडावे लागते. शिवनेरी रस्त्यावरील अतिक्रमणांवर बाजार समिती आणि महापालिका प्रशासनाने यापूर्वी कारवाई केली होती. कारवाईत सातत्य ठेवल्याने यंदा गणेशोत्सवात शिवनेरी रस्त्यावरील कोंडी सोडविण्यात यश आले, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली. उत्सव हॉटेल ते मार्केट यार्डातील टपाल कार्यालय चौकापर्यंत वाहनचालकांना सणासुदीच्या काळात ...

गणपती विसर्जनापर्यंत वाहतूक व्यवस्थेत दहा दिवस तर काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला

पुणे मेट्रो लाईव्ह : पूणे : शहराचा  वैभवशाली गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्यासह देशातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यात करोनामुळे दोन वर्षे बाप्पाचा उत्सव झाला नाही. त्यामुळे यंदाचा उत्सव धुमधडाक्‍यात साजरा होणार हे निश्‍चित. त्यातच भाविकांची मोठी गर्दी शहरात होणार. यापूर्वी शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्‍वभुमीवर सुरक्षेची उपाययोजना तसेच वाहतूक कोंडी यामुळे विविध रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. दि.एक सप्टेंबरपासून गणपती विसर्जनापर्यंत वाहतूक व्यवस्थेत दहा दिवस तर काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. तात्पुरत्या स्वरूपातील बदल दुपारी तीन ते गर्दी संपेपर्यंत हा बदल राहिल. तात्पुरत्या स्वरूपातील वाहतूक बदल : शिवाजीनगरवरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी – स. गो. बर्वे चौक-जे. एम. रोड-अलका चौक-टिळक रोड किंवा शास्त्री रोडचा वापर करावा किंवा सिमला चौक-कामगार पुतळा चौक- शाहीर अमर शेख चौक – बोल्हाई चौक मार्गे नेहरु रोडचा वापर करुन स्वारगेटकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा. गर्दीची परिस्थीती पाहून पीएमपीएमएल बसेस या वरीलप्रमाणे वळविण्यात येतील. चा...

कोंढवा भागातील त्रस्त नागरीक थेट आमदार यांच्या निवासस्थानी पोहचले

पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : गेल्या अनेक वर्षा पासून रखडलेला मुद्दा सर्वे नंबर ४२ व आशीर्वाद बिल्डींग येथील डिपी रोड तसेच मार्केट यार्ड ते कोंढवा येथील डिपी रोड तसेच रोडवरील घरमालकांचे पुन्नरवसन या बाबत हडपसर मतदार संघाचे आमदार मा चेतनदादा तुपे यांना भेटण्याकरीता थेट पोहचले.यावेली मा आमदार साहेबांनी जवल जवल तासभर चर्चा केली यामध्ये हज हाऊस पासून ते ओटा मार्केट, प्रसुतीगृह,लायब्ररी पर्यन्त विस्तृत चर्चा झाली येथील माजी नगरसेवक/नगरसेवीका यांच्या कार्याचा आढावा देखील या वेली घेण्यात आला.यावेली नागरीकांची नाराजी उघडपणे मा आमदार समोर जेष्ठ समाजसेवक इब्राहिम शेख यांनी मांडली.इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप तर्फे असलम इसाक बागवान यांनी तर रहमत सोशलफौडेशन तर्फे अब्दुल बागवान यांनी विविध समस्या मांडल्या.जर राज्य सरकार आम्हाला निधी देतच नसेल तर आम्हि सरकार विरोधात असहकार चलवल उभी करू असे असलम इसाक बागवान यांनी सांगीतले.चर्चा खूपच यशस्वी झाली,बरेच नेते फक्त आश्वासन देतात परंतू मी कोंढव्याभागातील समस्या सोडविण्याकरीता पुर्ण प्रयत्न करील अशी ग्वाहि यावेली मा आमदार साहेबांनी दिली. यावेली उपस्थीत कोंढवा भाग...

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार वाहनाच्या नंबरप्लेटवर क्रमांक लिहिणे बंधनकारक ,

नंबरप्लेटवर क्रमांक न टाकता पोलीस, पत्रकार अथवा पक्षाचे चिन्ह टाकतात. अशा वाहनांवर पुणे वाहतूक पोलीसांची कारवाई  करण्यात येत आहे. पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे :   वाहनांच्या नंबरप्लेट आणि वाहनावर दादा, मामा, पोलीस, पत्रकार असे लिहिल्यास मोटर वाहन कायद्यानुसार अशा वाहनधारकांवर पोलीस दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. तसेच, अनेक जण नंबरप्लेटवर क्रमांकाव्यतिरिक्त दादा, नाना, काका यांसह पोलीस, पत्रकार, व्हीआयपी असे देखील लिहितात. मात्र, शासनाने निर्देशित केलेल्या क्रमांका शिवाय वाहनावर काहीही लिहिणे हा अपराध आहे. तरीदेखील सर्रास अशी वाहने आपल्याला सर्वत्र फिरताना दिसतात. मात्र, आता शहर वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर सध्या कारवाई करण्यात येत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार वाहनाच्या नंबरप्लेटवर क्रमांक लिहिणे बंधनकारक आहे. अनेक जण विशिष्ट प्रकारचे क्रमांक घेऊन नंबरप्लेटवर दादा, मामा, काका असे लिहितात. तसेच, नंबरप्लेटवर क्रमांक न टाकता पोलीस, पत्रकार अथवा पक्षाचे चिन्ह टाकतात. अशा वाहनांवर पुणे वाहतूक पोलीस कारवाई करीत असून, पहिल्यांदा पकडल्यावर 500 आणि दुसर्‍यांदा त्याच ...

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू

पोलिसांनी याप्रकरणी मृत्यूची नोंद करुन घेत पुढील तपास सुरु केलाय. पुणे मेट्रो लाईव्ह : पु णे :  पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या मृत्यूने  त्याच्या कुटुंबीयांना तर मोठा धक्का बसलाच. शिवाय ज्या मित्रांसोबत हा तरुण पोहण्यासाठी गेला होता, त्या मित्रांच्याही पायाखालची जमीन सरकलीय. एक तरुण बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही  रेस्क्यू टीमसह घटनास्थळ गाठलं. त्यानंतर तरुणाच्या मृतदेहाचा शोध घेण्यात आला. अखेर तासाभराच्या प्रयत्नांनंतर तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोहण्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्यानं पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त केली जातेय. पोलिसांनी याप्रकरणी मृत्यूची नोंद करुन घेत पुढील तपास सुरु केलाय. बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव किसन शशिकांत बोराडे अ्सं आहे. किसन आपल्या चार मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. मावळ तालुक्यामधील डोणे येथे पोहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला. किसन बुडाल्यानं त्याच्या मित्रांचीही घाबरगुंडी उडाली होती. आपल्या घ...

बिल्किस बानो व इंद्र मेघवाल यांना न्याय द्या - अपना वतन संघटनेतर्फे " केंद्र " सरकारचा निषेध

  बलात्काऱ्यांना संरक्षण हेच का , मोदींचे महिला धोरण ? पुणे मेट्रो लाईव्ह : पिंपरी : बिल्कीस बानो प्रकरणातील गुन्हेगारांची माफी रद्द करून त्यांना तुरूंगात टाका तसेच राजस्थान ,सुराणा येथील इंद्र मेघवाल या मुलाची हत्या करणाऱ्या शिक्षकावर खटला जलदगती न्यायालयांमध्ये चालवा या मागणीसाठी रविवारी अपना वतन संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी येथील आंबेडकर पुतळा येथे निषेध आंदोलन करण्यात आले.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुट्टपी वृत्तीचा निषेध करण्यात आला . १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांच्या सुरक्षेविषयी ,हक्कांविषयी बोलले , परंतु त्याच दिवशी गुजरात मधील बिल्किस बानो प्रकरणात गुन्हेगार असलेल्या आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय  केंद्र सरकारने व गुजरात घेतला. हा देशातील सर्व स्त्रियांचा अवमान आहे. अशी भूमिका मान्यवरांनी मांडली.*  तसेच राजस्थान मधील सुराणा गावामध्ये  ९ वर्षाच्या बालकाला निष्ठुरपणे मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली . या दोन्ही घटना लोकशाहीला काळ...

विसर्जन घाटाची स्वछता करून मिरवणूक मार्गातील रस्त्यावरील खड्डे बुजवा

राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हा सरचिटणिस दीपक गुप्ता यांची फ प्रभाग अधिकरी सीताराम बहुरे यांच्याकडे मागणी पुणे मेट्रो लाईव्ह : कोरोनामुळे गेली दोन वर्षे गणेश उत्सव साजरा करण्यात आला नाही. यावर्षी गणेश उत्सव प्रथमच निर्बंधमुक्त मोठ्या थाटामाटात गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशा परिस्थितीत चिखली येथील विसर्जन घाटाची स्वच्छता करून विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्यात यावेत , अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस दीपक गुप्ता यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे फ प्रभाग अधिकार सीताराम बहुरे यांच्याकडे केली आहे. दीपक गुप्ता यांनी सांगितले की, चिखली परिसरातील सार्वजनिक घाटावरील असलेल्या कचरा तसेच राडारोडा काढून तो परिसर स्वच्छ करून या ठिकाणी फवारणी करून तो घाट स्वच्छ करावा. त्यामुळे येथे होणारी दुर्गंधी दूर होईल. कोरोनामुळे दोन वर्षे गणेश उत्सव साजरा करण्यात आला नसल्यामुळे या वर्षी निर्बंधमुक्त गणेश उत्सव शहरात मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहेत.विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे केली आहे. पडलेले आहेत. त्यामुळे गणेश भक्तांना विसर्जन घाटाक...