Skip to main content

Posts

पुणे : सुफी संत हजरत ऐनी शाह ( रहे.) यांचा गुरुवारी ऊर्स

पुणे : सुफी संत हजरत ऐनी शाह       ( रहे.)  यांचा गुरुवारी ऊर्स. पुणे मेट्रो लाईव्ह :  पुणे  :  सुफी संत हजरत सय्यदी पीर ऐनी शाह सहाब किब्ला ( रहे ) यांचा उर्स उर्दु ता. १६ व इंग्रजी महिना तारीख  १६ मार्च  वार गुरुवार  रोजी साजरा करण्यात येणार आहे. गेल्या सहा  वर्षापासून हजरत यांचा ऊर्स मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. हजरत यांची मजार शरीफ पुणे स्थित भवानी पेठ दुल्हा दुल्हन कब्रिस्तान येथे आहे. या ठिकाणीच उर्स साजरा करण्यात येतो .  सुफी संत हजरत ऐनी शहा  (रहे) यांचा ऊर्स हजरत यांचे वारसदार ( जानशिन) हजरत शाह नजीरूद्दीन कादरी उर्फ (मखदुमी) शाह यांचे मार्फतच  उरुसाचे सर्व नियोजन केले जाते. त्यांचे प्रमुख गुरू मौलांना गौसवी शहा सहाब (  हैदराबाद) यांचे पुर्व परवानगीने व त्यांचे आदेशा नुसार करतात. सुफी संत हजरत ऐनीशाह रहे. यांचे मुरीद (शिष्य) अखंड महाराष्ट्रभर आहेत. हजरत यांचे सर्व शिष्य हजर राहून उर्साचे सर्व कामकाज पाहतात. सायंकाळी असरच्या नमाज नंतर हजरत यांचे मजार शरीफ वर गिलाफ चादर चढवण्यात येतो व मजार शरी...

कोण होणार चिंचवडचा आमदार...? आज जाहीर होणार

  चिंचवड : सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या चिंचवड आणि कसबा पेठ  पोटनिवडणुकीची आज मतमोजणी पुणे मेट्रो लाईव्ह : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण :  मतमोजणी आज सकाळी 8 वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार असून मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी 14 टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी 1 टेबल असे एकूण 15 टेबल असणार आहेत. 18 पर्यवेक्षक, 18 सहायक आणि 18 सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संगणकीय प्रणालीने सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या टेबलवरील कामकाज त्या कर्मचाऱ्यांना सोपवले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तसेच मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया होईल. टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला टपाली आणि ईटीपीबीएसची मतमोजणी होईल....

आपल्या सर्वांचा जन्म शिवसेनेत झाला आहे, ट्यूब बेबी लोकांकडे लक्ष देऊ नका, .संजय राऊत

  आपल्या सर्वांचा जन्म शिवसेनेत झाला आहे, ट्यूब बेबी लोकांकडे लक्ष देऊ नका, .संजय राऊत पुणे मेट्रो लाईव्ह : मुरलीधर कांबळे :  कोल्हापूर : आपल्या सर्वांचा जन्म शिवसेनेत झाला आहे, त्यामुळे या टेस्ट ट्यूब बेबी लोकांकडे लक्ष देऊ नका, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्ला चढवला. ते म्हणाले की, जे महानाट्य सुरू केलेय ते यशस्वी होणार आहे. खासदार संजय राऊत शिवगर्जना मेळाव्यातून पुन्हा एकदा शिंदे गटावर हल्लाबोल केला. संजय पवार महाराष्ट्राला शिवसेनेवरच्या निष्ठेसाठी माहीत आहेत. आपल्या सर्वांचा जन्म शिवसेनेत झाला आहे, त्यामुळे या टेस्ट ट्यूब बेबी लोकांकडे लक्ष देऊ नका, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्ला चढवला. ते म्हणाले की, जे महानाट्य सुरू केलेय ते यशस्वी होणार आहे. कोल्हापूरची भूमी परिवर्तन करणारी भूमी आहे. बाळासाहेबांची महानता मोठी होती. त्यांनी माकडाची माणसे केली, माणसांचे सरदार केले आणि यातील काहींनी खंजीर खुपसला. या लोकांनी आपल्या आईला विकले. जे महाराष्ट्र आणि शिवसैनिक विसरणार नाही. ते पुढे म्हणाले की, संजय राऊत संपूर्ण देशाला माहीत आहेत हे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे. दिशा देण्यासाठी बा...

मा. सुप्रीम कोर्टाचा निकाल : डॉ .पी . ए. इनामदार मुस्लिम बँकेचे चेअरमनपदी कायम

  मा. सुप्रीम कोर्टाचा निकाल : डॉ .पी . ए. इनामदार मुस्लिम बँकेचे चेअरमनपदी कायम पुणे मेट्रो लाईव्ह :  पुणे : आज. दिनांक गुरुवार 23/02/2023 रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टच्या  मिटींग मध्ये डॉ पी. .ए. इनामदार यांचे भव्य  व जंगी स्वागत करून त्यांचे  अभिनंदन करण्यात आले. या वेळी सर्व डायरेक्टर ,व बँकेचे व्हाईस चेअरमन एस.ऐ. ईनामदार,  सी.ई.ओ. ऍडमिन ऑफीसर व बँकेचे सर्व स्टाफ यांनी पी. ए . ईनामदार साहेबांचे अभिनंदन करून सत्कार केला.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटची सर्वात मोठी अभिवादन मिरवणूक काढण्यात आली.

  शिवजयंतीदिनाची  अभिवादन मिरवणूक ठरली आहे .एकूण ९ हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते पुणे मेट्रो लाईव्ह : पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्याच्या भव्य अभिवादन मिरवणुकीचे विशेष आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि. १९ फेब्रुवारी  २०२३ रोजी सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे अध्यक्ष तसेच 'डॉ.पी.ए. इनामदार विद्यापीठा 'चे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. एम.सी.ई सोसायटीचे सचिव प्रा. इरफान शेख , एस.ए. इनामदार, शाहीद इनामदार, वहाब शेख, साबीर शेख , असीफ शेख,शाहीद शेख, बबलू सय्यद,तसेच विश्वस्त, पदाधिकारी, प्राद्यापक -शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सेंटर, गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट, डेक्कन मुस्लीम इन्स्टिट्यूट अॅण्ड लायब्ररी, अवामी महाझ या संस्थांनी सहभाग घेतला.पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील विद्यार्थी यांचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी शिवजयंतीदिनाची अभिवादन मिरवणूक ठरली आहे .एकूण...

दि.मुस्लिम को ऑप बँक पुणे शाखा श्रीरामपूर या शाखेचा कार्येक्रम डॉ. पी ए इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली व व्हाइस चेअरमन एस ए इनामदार ,सी ई ओ मोहम्मद शाहिद यांनी यशस्वीरिता पार पाडला

श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला . पुणे मेट्रो लाईव्ह :    पुणे : दि मुस्लिम को  ऑप बँक लि. शाखा श्रीरामपूर या शाखेमध्ये  नुकताच कार्येक्रमचे  संपन्न झाला .  या कार्यक्रमचे अध्यक्ष श्री गणी हाजी शेख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक , ज्येष्ठ वकील बाबा शेख , ज्येष्ठ वकील. युसुफ कादर शेख , नगरसेवक मुख्तार शाह साहेब , सी ए एजाज शेख , सय्यद मोहम्मद  गौस उर्फ बबलू सय्यद (संचालक  दि मुस्लिम को  ऑप बँक ) , अजमत फातिमा इंग्लिश स्कूल संचालक  मुबिन शेख , मतीन शेख व कुरेशी समाजाचे सदर मेहबूब कुरेशी , इंजि. सलीम मणियार , सलीम दस्तगीर , पि एस आय इब्राहीम शेख , इरफान शेख, इम्रान सय्यद आदी उपस्थित होते. या वेळी  श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला . सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रांच मॅनेजर शकील कुरेशी , स्टाफ एजाज सय्यद , वसीम  शेख , साजिद खान या सर्वांनी   विशेष परिश्रम घेतले. श...

सुदृढ समाज बांधणीचे काम साहित्यातून अभिप्रेत असते

 समाजवादी प्रबोधिनीच्या चर्चासत्रातील मत पुणे मेट्रो लाईव्ह : इचलकरंजी ता.५,साहित्य आणि समाज यांचे परस्पर सबंध जिव्हाळ्याचे असेल पाहिजेत.त्यासाठी इतिहासाच्या वस्तुनिष्ठ मांडणी बरोबरच समकालीन प्रश्नांची चर्चा आणि त्याच्या सोडवणुकीची दिशा साहित्यातून समाजाला दिली गेली पाहिजे. साहित्यातून राजकीय ,सामाजिक ,आर्थिक, सांस्कृतिक पर्यावरणाचा समतोल राखला जाणे फार महत्वाचे असते. सकस साहित्य हे सहीत नेणारे असते. ते वैश्विक आणि मानवतावादी  असते. धर्म आणि राजकारण यांच्या सरमिसळी प्रमाणेच साहित्य आणि संकुचित राजकारण यांची सरमिसळही सामाजिक ,सांस्कृतिक एकतेला बाधा पोहोचवून अध:पतनाकडे नेत असते. याचे भान साहित्य निर्मिती व साहित्य व्यवहारांतून ठेवले गेले पाहिजे. जात ,पात, धर्म ,पंथ या पलीकडे जाऊन माणसाचा माणूस म्हणून विचार आणि त्याच्या उत्थानाची मांडणी साहित्यातून झाली पाहिजे. साहित्यातील वास्तविकता आणि काल्पनिकता याचा अनुबंध माणूस जोडण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असतो. सुदृढ समाज बांधणीचे काम साहित्यातून अभिप्रेत असते ,असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. वर्ध...

कसबा विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडी कडून अद्यापही लढविण्याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

पुणे मेट्रो लाईव्ह :  पुणे : कसबा  विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडी कडून  अद्यापही लढविण्याची  अधिकृत घोषणा झालेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील घटक पक्षांची संयुक्त बैठक झालेली नाही.त्यामुळे पोटनिवडणूक कोणता पक्षाचा उमेदवार असेल हे निश्चित न झाल्याने तिन्ही पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून वैयक्तिक पातळीवर तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे.  पक्षाची बैठक, इच्छुक उमेदवारांच्या नावांची चर्चा, इच्छुकांच्या मुलाखती असे प्रकार महाविकास आघाडीत सुरू झाले आहेत. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविली जाईल, अशी चर्चा तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असली तरी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तरी घोषणा न झाल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून भारतीय जनता पक्...

बेकायदेशीर व अवैध व्यवसाय धंदे , लोकांना होणारा त्रास व गुंडगिरीबाबत कठोर कारवाई होणे बाबत पुजारी मळा येथील नागरिकांचे निवेदन.

 संदेश राजाराम हत्तीकर, संतोष राजाराम हत्तीकर,राजाराम हरीबा हत्तीकर व अली खान यांचे वर कारवाई  करण्याची मागणी. पुणे मेट्रो लाईव्ह :  इचलकरंजी  येथील  श्री. संदेश राजाराम हत्तीकर, संतोष राजाराम हत्तीकर,राजाराम हरीबा हत्तीकर व अली खान यांनी पुजारी मळा, वॉ.नं. १७ शिवशक्ती चौक, झपाटे दवाखान्याजवळ, इचलकरंजी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर  पुजारी मळा परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने हत्तीकर यांचे सदर परिसरात दारूच्या बाटल्या स्वच्छ करणेचे केमिकल गोडाऊन असून सदर गोडाऊन मध्ये हत्तीकर कुंटूबिय बेकायदेशीर व्यवसाय धंदे करतात म्हणजेच अनाधिकृत पणे, विनापरवाना व बेकायदेशीर देशी, विदेशी स्वरुपाचे मद्य विक्री करणे तसेच  परिसरात बेकायदेशीर  अवैध जुगार, तीनपानी पत्ते पैसे लावुन खेळणे तसेच अनेक बेकायदेशीर  व्यवसाय,धंदे तसेच लोकांना होणारे त्रास व गुंडगिरीबाबत कठोर कायदेशीर कारवाई  करण्याची मागणी या परिसरातील महिला नागरीक  शांता बाबासाहेब धुमाळ , सरस्वती फाल्गुन पुजारी व पद्मजा  मुरारी नराते चंचंदा भिमराव नराटे. सौ. चंदाकिमराव नरोट ,रेखा संजय मुधाळ...

जमियेत ऊलमा हिंद इन्सानो के मदद लिये;हाजी गुलजारअध्यक्ष जमियेत पिंपरी चिंचवड

पुणे मेट्रो लाईव्ह  अन्वरअली शेख : पिंपरी चिंचवड शहर मे जमियेत ऊलमा का समाज सुधार अभियानद्वारा पिछले तीन महिनो मे शहर के अलग अलग इलाको को शिक्षा, देश प्रेम, रोजगार,आरोग्य, इन्सानोके प्रती प्यार,एकता,सद्भाव,भाईचारा, और कू प्रथा , देहज,तलाक, रस्मो रिवाज फिजुल खर्ची आदी.. के बारे मे समाज मे जागरूकता निर्माण करने ले लिये अभियान चलाया गया, समाज सुधार कार्यक्रम की इस साल का आखरी सभा पिंपरी काळेवाडी मक्का मस्जिद मे आयोजित की गयी थी. हाजी गुलजार  अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जमियेत ने अपना मनोगत व्यक्त करते हूवे कहा जमियेत ऊलमा हिंद सारी दुनिया के इन्सानो के मदद के लिये आगे आने वाली तंजीम हे. हम किसी भी प्रकार के जात-पात ,धर्म ,भेद ,भाव कीए बीना इंसानियेत के लिये काम करने मे विश्वास करते हे, और हम आने वाले समय मे भी इसी प्रकार से समाज सुधार के कामो मे लगे रहेंगे. इस कार्यक्रम मे शहर के विविध सामाजिक संघटनोने भाग लिया.समाज मे काम करने वाले बहुत से सामाजिक काम करने वालो और पत्रकारोंको गवरव पुरस्कार प्रदान किया ,  इस कार्यक्रम मे मुख्य अतिथी मौलाना हलीमुल्लाह कासमी ज. सेकेट्री जमियेत ऊ...